शहरं
Join us  
Trending Stories
1
९ जुलैला भारत बंद, २५ कोटी कामगार संपावर; शाळा, कॉलेज, बँका आणि बाजारासह काय-काय बंद राहणार? जाणून घ्या
2
तिरुपतीला गेलेल्या अहिल्यानगरच्या तिघांचा दुर्वैवी मृत्यू; कार उलटल्याने झाला भीषण अपघात
3
'भारतासह ब्रिक्स देशांना द्यावा लागणार अतिरिक्त १० टक्के कर"; व्यापार करारापूर्वी ट्रम्प यांचे विधान
4
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
5
"रेल्वे कर्मचाऱ्याला तमीळ येत नव्हतं, म्हणून दुर्घटना घडली", आता तामिळनाडू रेल्वे-व्हॅन अपघातातही भाषेची एन्ट्री!
6
२ कोटींच्या विम्यासाठी मित्राला गाडीत जिवंत जाळलं; नऊ महिने सुरु होती प्लॅनिंग, पत्नीचाही सहभाग
7
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
8
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
9
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
10
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
11
महाराष्ट्रातील सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; विद्यार्थी हितासाठी निर्णय!
12
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
13
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
14
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
15
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
16
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
17
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
18
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
19
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
20
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण

लॉन्च झाला सर्वात स्वस्त Ai स्मार्टफोन, किंमत फक्त 5000 रुपये; पाहा फीचर्स...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2025 14:59 IST

यामध्ये 5000mAh बॅटरी, 128 स्टोरेज अन् 50MP चा कॅमेरा मिळतो.

AI+ ने भारतात दोन स्वस्त स्मार्टफोन (पल्स आणि नोव्हा 5G) लॉन्च केले आहेत. हे दोन्ही फोन फीचर फोनच्या किमतीत मिळतील. Realme चे माजी CEO आणि NextQuantum चे संस्थापक माधव सेठ यांनी हे दोन्ही फोन भारतात AI+ ब्रँड अंतर्गत लॉन्च केले असून, याची किंमत 4,999 रुपयांपासून सुरू होते. AI+ Pulse आणि Nova 5G मध्ये 5000mAh बॅटरी, 50MP कॅमेरासारखे फीचर्स आहेत.

सर्वात स्वस्त स्मार्टफोनAI+ Pulse आणि Nova 5G दोन स्टोरेज व्हेरिएंटमध्ये लॉन्च केले आहेत. हे दोन्ही फोन ई-कॉमर्स वेबसाइट Flipkart वरुन खरेदी करता येतील. AI+ Pulse 4GB RAM + 64GB आणि 6GB RAM + 128GB मध्ये सादर केले आहेत. याची सुरुवातीची किंमत 4,999 रुपये, तर टॉप व्हेरिएंट 6,999 रुपये आहे.

AI+ Nova 5G 6GB RAM + 128GB आणि 8GB RAM + 128GB मध्ये लॉन्च केला आहे. याची सुरुवातीची किंमत 7,999 रुपये आहे. तर, त्याचा टॉप व्हेरिएंट 9,999 रुपयांना येतो. AI+ च्या या दोन्ही फोनची खास गोष्ट म्हणजे तुम्हाला 10,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत AI फीचर्स मिळतील. या दोन्ही फोनची पहिली सेल 12 जुलै रोजी होणार आहे. कंपनी फोनच्या खरेदीवर 500 रुपयांची मर्यादित सूट देत आहे.

AI+Pulseहा स्वस्त स्मार्टफोन 6.745 इंचाचा HD+ डिस्प्लेसह येतो. हा 90Hz रिफ्रेश रेट आणि 450 निट्स पर्यंत पीक ब्राइटनेसला सपोर्ट करेल. हा फोन Unisoc T615 प्रोसेसर, 5000mAh पॉवरफुल बॅटरीसह येतो. हा 6GB पर्यंत रॅम आणि 128GB पर्यंत इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करेल. फोनचे स्टोरेज मायक्रोएसडी कार्डद्वारे 1TB पर्यंत वाढवता येते. फोनच्या मागील बाजूस AI ड्युअल कॅमेरा उपलब्ध आहे. यात 50MP चा मुख्य आणि एक सेकंडरी कॅमेरा आहे. सेल्फीसाठी 5MP चा कॅमेरा उपलब्ध आहे.

AI+ Nova 5Gया स्वस्त 5G स्मार्टफोनमध्ये 6.745-इंचाचा HD+ डिस्प्ले देखील आहे. तो 90Hz रिफ्रेश रेट आणि 450 nits पर्यंत पीक ब्राइटनेसला देखील सपोर्ट करेल. यात Unisoc T8200 5G प्रोसेसर आणि 5000mAh ची शक्तिशाली बॅटरी आहे. हे 8GB पर्यंत RAM आणि 128GB पर्यंत अंतर्गत स्टोरेजला सपोर्ट करेल. त्याचे स्टोरेज मायक्रोएसडी कार्डद्वारे 1TB पर्यंत वाढवता येते. त्याच्या मागील बाजूस AI ड्युअल कॅमेरा देखील असेल, ज्यामध्ये 50MP मुख्य आणि एक दुय्यम कॅमेरा असेल. सेल्फीसाठी यात 5MP कॅमेरा असेल.

टॅग्स :Smartphoneस्मार्टफोनFlipkartफ्लिपकार्टtechnologyतंत्रज्ञान