शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

फक्त फोटोच नाही, आता ChatGPT व्हिडिओही बनवून देणार; लवकरच नवीन अपडेट येणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2026 18:22 IST

ChatGPT Video Generation: OpenAI आपल्या लोकप्रिय एआय चॅटबॉट ChatGPT मध्ये लवकरच व्हिडिओ जनरेशन फीचर आणण्याच्या तयारीत आहे.

ChatGPT Video Generation: आर्टिफीशल इंटेलिजन्स (AI) क्षेत्रात मोठी झेप घेत OpenAI आपल्या लोकप्रिय एआय चॅटबॉट ChatGPT मध्ये लवकरच व्हिडिओ जनरेशन फीचर आणण्याच्या तयारीत आहे. रिपोर्ट्सनुसार, कंपनी आपले Sora व्हिडिओ जनरेशन टूल ChatGPT मध्ये इंटीग्रेट करण्याचा विचार करत आहे. या फीचरनंतर ChatGPT फक्त टेक्स्ट आणि इमेजच नाही, तर व्हिडिओ देखील तयार करू शकणार आहे.

या बदलामुळे ChatGPT ची क्षमता आणखी वाढेल, तसेच Sora टूल अधिक मोठ्या प्रमाणावर युजर्सपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. सध्या एआय चॅटबॉट क्षेत्रात कंपन्यांमध्ये तीव्र स्पर्धा सुरू असून अधिकाधिक फीचर्स देण्यावर भर दिला जात आहे.

टेक्स्ट प्रॉम्प्टवरून तयार होणार व्हिडिओ

OpenAI चे Sora मॉडेल टेक्स्ट प्रॉम्प्टच्या आधारे नवीन व्हिडिओ तयार करू शकते. युजर्स दिलेल्या सूचनांनुसार व्हिडिओ तयार करू शकतात, तसेच आधीच्या कंटेंटमध्ये बदल किंवा रिमिक्स देखील करू शकतात. याशिवाय, या प्लॅटफॉर्मवर युजर्सना पर्सनलाइज्ड फीडमध्ये नवीन AI क्रिएशन्स पाहण्याची सुविधा मिळते.

‘Cameos’ फीचरची खासियत

Sora चे एक विशेष फीचर म्हणजे Cameos, ज्यामध्ये युजर्स स्वतःला एआयद्वारे तयार केलेल्या दृश्यांमध्ये दाखवू शकतात. म्हणजेच एखाद्या AI जनरेटेड व्हिडिओमध्ये स्वतःचा समावेश करणे शक्य होते. हे अॅप Meta च्या ‘Vibe’ अॅपला स्पर्धा देण्यासाठी लॉन्च करण्यात आले होते.

सध्या स्वतंत्र अॅप आणि वेबसाइटवर उपलब्ध

सध्या Sora हे टूल स्वतंत्र अॅप आणि वेबसाइटद्वारे उपलब्ध आहे. मात्र अनेक फीचर्स असूनही ते ChatGPT इतके लोकप्रिय झालेले नाही. त्यामुळे OpenAI आता ते ChatGPT मध्ये समाविष्ट करण्याचा विचार करत आहे, ज्यामुळे हे फीचर अधिक वापरकर्त्यांपर्यंत पोहोचेल.

आधीच आले आहे इमेज जनरेशन फीचर

OpenAI ने गेल्या वर्षी ChatGPT मध्ये इमेज जनरेशन फीचर जोडले होते. त्यामुळे युजर्स प्लॅटफॉर्म सोडल्याशिवायच थेट चॅटबॉटवरून इमेज तयार करू शकतात. आता त्यात व्हिडिओ जनरेशनचा पर्याय जोडला जाणार आहे.

डीपफेकचा धोका वाढण्याची शक्यता

तज्ज्ञांच्या मते, AI आधारित व्हिडिओ जनरेशन फीचरमुळे डीपफेक व्हिडिओंचा धोका वाढू शकतो. AI तंत्रज्ञान आल्यानंतर इंटरनेटवर डीपफेक कंटेंटची संख्या वाढली आहे आणि अनेकदा खरा आणि बनावट व्हिडिओ ओळखणे कठीण झाले आहे. म्हणूनच या नव्या तंत्रज्ञानासोबत सुरक्षिततेच्या उपाययोजनांनाही तितकेच महत्त्व देण्याची गरज असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : ChatGPT to Generate Videos Soon, Integrating OpenAI's Sora Tool

Web Summary : OpenAI plans to integrate its Sora video generation tool into ChatGPT, enabling video creation from text prompts. Users can create, modify, and remix videos. Concerns arise about the potential increase in deepfake videos, emphasizing the need for safety measures.
टॅग्स :Artificial Intelligenceआर्टिफिशिअल इंटेलिजन्सtechnologyतंत्रज्ञान