ChatGPT Passed Exam: ChatGPT ची कमाल; MBA, मेडिकलसह 8 अवघड परीक्षा पास केला; गूगललाही मात दिली...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2023 06:04 PM2023-02-22T18:04:39+5:302023-02-22T18:05:37+5:30

ChatGPT Passed Exam: गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या ChatGPT ने परीक्षा पास करुन सर्वांनाच चकीत केले आहे.

ChatGPT Passed Exam: ChatGPT Passed 8 tough exams including MBA, Medical; Beat Google too | ChatGPT Passed Exam: ChatGPT ची कमाल; MBA, मेडिकलसह 8 अवघड परीक्षा पास केला; गूगललाही मात दिली...

ChatGPT Passed Exam: ChatGPT ची कमाल; MBA, मेडिकलसह 8 अवघड परीक्षा पास केला; गूगललाही मात दिली...

googlenewsNext

Exam Passed By ChatGPT:तंत्रज्ञानाच्या जगात धमाकेदार एन्ट्री घेणाऱ्या ChatGPT ची संपूर्ण जगात चर्चा सुरू आहे. गेल्या वर्षी OpenAI ने हे नवीन तंत्रज्ञान लॉन्च केले होते. चॅट जीपीटी एक आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (AI) चॅटबॉट आहे, जो GPT-3 लँग्वेज मॉडेलवर बेस्ड आहे. जगभरात या नवीन तंत्रज्ञानाचे समर्थक आणि विरोधक आहेत. याच्या क्षमतेमुळे टेक दिग्गजांची झोप उडाली आहे. विशेष म्हणजे, मायक्रोसॉफ्ट फंडेड या चॅटबॉटने MBA, लॉ, मेडिकलसह अनेक कठीण परीक्षा पास केल्या आहेत.

ChatGPT ची क्षमता जाणून घेण्यासाठी लोक विविध प्रयोग करत आहेत. यामध्ये ChatGPT द्वारे जगातील सर्वात कठीण परीक्षा दिल्या जात आहेत. रिपोर्ट्सनुसार, चॅटजीपीटीने मेडिकल, एमबीए, लॉसह जगभरातील 8 अवघड परीक्षा पास केल्या आहेत. या परीक्षा पास करण्यासाठी लोकांना अनेक वर्षे कठीण मेहनत करावी लागते.

ChatGPT ने या 8 परीक्षा पास केल्या

  • MBA Exam: चॅटजीपीटीद्वारे परीक्षा पास केल्या जाऊ शकतात, याची माहिती तेव्हा मिळाली, जेव्हा याने यूनिव्हर्सिटी ऑफ पेन्सिलवेनियातील बिझनेस एग्झाम पास केले. 
  • Law Exam: एआय चॅटबॉटने यूनिव्हर्सिटी ऑफ मिनिसोटाची लॉ परीक्षादेखील पास केली. 
  • Medical Exam: यूनायटेड स्टेट्स मेडिकल लायसेन्सिंग एग्झामिनेशन जगातील सर्वात अवघड मेडिकल एग्झामपैकी एक आहे. या चॅटबॉने ही परीक्षादेखील पास केली.
  • Multistate Bar Exam: चॅटजीपीटीने लॉ परीक्षेसह मल्टीस्टेट बार एग्झाम (MBE)मध्येही आपली महारथ दाखवली. 
  • Microbiology Quiz: बिग थिंकच्या एक्झीक्यूटिव्ह एडिटर आणि सायंस जर्नलिस्ट एलेक्स बेरेजोनुसार चॅटजीपीटीने मायक्रोबायोलॉजी क्विज टेस्टदेखील पास केली. 
  • AP English Essay: चॅटजीपीटीने 12th क्लासचा एपी लिटरेचर क्लास टेस्टदेखील पास केला. एआय चॅटबॉटने 500 ते 1000 शब्दांचा निबंध लिहिला.
  • Google Coding Interview: चॅटजीपीटीने गूगलचा कोडिंग इंटरव्ह्यूदेखील पास केला. 
  • Scholastic Assessment Test (SAT): कअनेक रिपोर्टमध्ये दावा केला जात आहे की, चॅटजीपीटीने SAT पास केली. ही परीक्षा अमेरिकेतील कॉलेजमध्ये अॅडमिशन मिळवण्यासाठी घेतली जाते.

 

Web Title: ChatGPT Passed Exam: ChatGPT Passed 8 tough exams including MBA, Medical; Beat Google too

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.