तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान

By जयदीप दाभोळकर | Updated: December 22, 2025 12:12 IST2025-12-22T12:12:02+5:302025-12-22T12:12:55+5:30

गेल्या काही काळापासून तुम्ही पाहिलं असेल, जेव्हा तुम्ही मोबाइल विकत घ्यायला जाता, तेव्हा काही कंपन्या आपल्या मोबाइलसोबत त्याचा चार्जर देत नाही. काही नामांकित कंपन्यांनी सुरू केलेली ही पद्धत आता एक ट्रेंड बनत चाललाय.

charger you are using is not FAKE or original How to identify the original charger you can avoid damage to your mobile bis rating | तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान

तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान

मोबाइल हा आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनलाय. आजकाल आपण आपली अनेक कामं मोबाइलच्या माध्यमातून पूर्ण करतो. पण गेल्या काही काळापासून तुम्ही पाहिलं असेल, जेव्हा तुम्ही मोबाइल विकत घ्यायला जाता, तेव्हा काही कंपन्या आपल्या मोबाइलसोबत त्याचा चार्जर देत नाही. काही नामांकित कंपन्यांनी सुरू केलेली ही पद्धत आता एक ट्रेंड बनत चाललाय. आयफोन असो किंवा सॅमसंग, अनेक कंपन्या बॉक्समध्ये चार्जर देत नाहीत. यामुळे आपण फोन तर घेतो, पण चार्जर मात्र बाहेरून स्वस्तात विकत घेतो. मात्र, स्वस्त किंवा बनावट चार्जर वापरणं तुमच्या महागड्या फोनसाठी अत्यंत धोकादायक ठरू शकते.

बनावट चार्जरचे धोके

ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर अनेक बनावट चार्जर्स उपलब्ध आहेत, जे दिसायला अगदी ओरिजिनल चार्जरसारखेच दिसतात. जर तुम्ही आयफोनचा चार्जर पाहिला, तर बनावट चार्जरही तसाच दिसेल, पण घरी आणून बारकाईनं पाहिल्यावर त्यावरील अक्षरांमध्ये तफावत म्हणजेच ते मिसमॅच असल्याचं दिसून येतं. असे चार्जर्सचा तुमच्या ७०-८० हजार रुपयांच्या फोनचं मोठं नुकसान करू शकतात. यामुळे फोनचं नुकसान होऊ शकते, बॅटरी खराब होऊ शकते आणि फोन जास्त गरम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट

चार्जर ओरिजनल आहे का नाही कसा पाहाल?

तुम्ही घेतलेला चार्जर ओरिजनल आहे की नाही याबद्दल जर तुम्हाला शंका असेल तर तुम्ही स्वत: ते त पासून पाहू शकता. भारत सरकारच्या 'ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स'च्या (BIS) वेबसाईटवर जाऊन तुम्ही चार्जरची सत्यता पडताळू शकता. प्रत्येक चार्जरवर एक 'R' नंबर असतो. हा नंबर वेबसाईटवर टाकल्यावर त्याला सरकारनं मान्यता दिली आहे का नाही किंवा तो ड्युप्लिकेट आहे याबाबत माहिती मिळेल. जर तुम्ही थर्ड पार्टी चार्जर वापरत असाल तर, अशा प्रकारे तुमचा चार्जर तपासून पाहणं हे आवश्यक आहे. तुम्ही अशा प्रकारे तुमचा चार्जर ओरिजनल आहे की नाही हे पाहून, तुमच्या मोबाइलचं होणारं नुकसान टाळून काही रुपयांसाठी तुमच्या खिशावर येणारा भार टाळू शकता.

बाजारातील काही चर्चेतले पर्याय

Samsung 25 W Quick Charge 3 A Wall Charger for Mobile

CMF by Nothing 65 W GaN 3 A 3 Port Mobile Charger

Spigen 35 W GaN Wall Charger for Mobile

Belkin Dual USB-C GaN Wall Charger with PPS 65W

CMF by Nothing 33 W Quick Charge 3 A Wall Charger for Mobile

Web Title : नकली चार्जर से सावधान! असली पहचानें और अपने फोन को सुरक्षित रखें

Web Summary : नकली चार्जर का उपयोग आपके फोन की बैटरी और प्रदर्शन को नुकसान पहुंचा सकता है। 'आर' नंबर के लिए बीआईएस वेबसाइट पर जांच करके असली चार्जर पहचानें। चार्जर की प्रामाणिकता सत्यापित करके अपने डिवाइस को सुरक्षित रखें।

Web Title : Beware Fake Chargers: How to Identify Originals and Protect Your Phone

Web Summary : Using fake chargers can severely damage your phone's battery and overall performance. Learn to identify original chargers by checking the BIS website for the 'R' number. Protect your valuable device from potential harm by verifying charger authenticity.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.