मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2015 23:58 IST2015-05-28T23:58:49+5:302015-05-28T23:58:49+5:30
पुणे : येत्या ४८ तासांत मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे. दरम्यान, आज राज्याच्या तापमानात थोडी घट झाली. पण विदर्भात उष्णतेची लाट कायम होती.

मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता
प णे : येत्या ४८ तासांत मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे. दरम्यान, आज राज्याच्या तापमानात थोडी घट झाली. पण विदर्भात उष्णतेची लाट कायम होती.राज्यात आज सर्वाधिक ४६ अंश सेल्सिअस तापमान राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरमध्ये आणि चंद्रपूरमध्ये नोंदविले गेले. त्यापाठोपाठ ४५.८ अंश सेल्सिअस तापमान वर्ध्यात नोंदविले गेले. मध्य महाराष्ट्राच्या तापमानात घट झाली आणि काही शहरे सोडता इतर शहरांचे तापमान चाळीस अंशाच्या आत आले. विदर्भातील तापमान आजही चढेच होते. ते सरासरीपेक्षा २ ते ४ अंशांनी वाढलेलेच होते. पुढील दोन दिवस तरी विदर्भात आलेली उष्णतेची लाट कायम राहिल, असा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे.प्रमुख शहरांमधील कमाल तापमान पुढीलप्रमाणे (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३७.७, जळगाव ४३.४, कोल्हापूर ३५.४, महाबळेश्वर ३०.१, मालेगाव ४३, नाशिक ३७.६, सांगली ३७.६, सातारा ३८, सोलापूर ४१.१, मुंबई ३५.७, अलिबाग ३५.४, रत्नागिरी ३४.४, डहाणू ३६.२, उस्मानाबाद ४०.९, औरंगाबाद ४१.६, परभणी ४३.९, नांदेड ४३, अकोला ४५.१, अमरावती ४२.८, बुलडाणा ४१, चंद्रपूर ४६, नागपूर ४६, वाशिम ४२, वर्धा ४५.८, यवतमाळ ४४.४.