शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
2
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
3
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
4
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
5
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
6
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
7
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
8
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
9
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
10
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
11
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
12
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
13
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
14
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
15
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
16
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
17
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
18
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
19
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
20
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल

कार्बन टिटॅनियम फ्रेम्स एस7 : जाणून घ्या सर्व फीचर्स

By शेखर पाटील | Updated: January 17, 2018 14:55 IST

कार्बन मोबाइल्स कंपनीने कार्बन टिटॅनियम फ्रेम्स एस७ हा नवीन स्मार्टफोन बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली असून याचे मूल्य ६,९९९ रूपये आहे.

कार्बन मोबाइल्स कंपनीने कार्बन टिटॅनियम फ्रेम्स एस७ हा नवीन स्मार्टफोन बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली असून याचे मूल्य ६,९९९ रूपये आहे. कार्बन कंपनीने एंट्री लेव्हल बाजारपेठेवर आपले लक्ष केंद्रीत केल्याचे आधीच स्पष्ट झाले आहे. या अनुषंगाने कार्बन टिटॅनियम फ्रेम्स एस७ हे मॉडेलदेखील याच वर्गवारीतील आहे. यातील ५.५ इंच आकारमानाचा २.५ डी वक्राकार ग्लासयुक्त आयपीएस डिस्प्ले हा फुल एचडी क्षमतेचा (१९२० बाय १०८० पिक्सल्स) असेल. यात क्वॉड-कोअर प्रोसेसर दिलेला आहे. याची रॅम ३ जीबी आणि ३२ जीबी इनबिल्ट स्टोअरेज असून ते १२८ जीबीपर्यंत वाढविण्याची सुविधा दिलेली आहे. यात कृत्रिम बुद्धीमत्तेने युक्त असणारा निक्की हा व्हाईस कमांडवर कार्यान्वित होणारा डिजीटल असिस्टंट प्रदान करण्यात आला आहे.

याच्या मदतीने विविध चॅनल पार्टनर्सच्या माध्यमातून तिकिटांची बुकींग, रिचार्ज आदी कामे करता येतील. तसेच यातील दुसरे लक्षणीय फिचर म्हणजे १३ मेगापिक्सल्सचा फ्रंट कॅमेरा होय. यात एचडीआर, प्रो कॅप्चर, फेस डिटेक्शन, ब्युटी मोड आदी विविध फिचर्स असून याच्या मदतीने दर्जेदार सेल्फी प्रतिमा घेता येतात. तर यातील मुख्य कॅमेरादेखील १३ मेगापिक्सल्सचाच असेल. यातील बॅटरी ३,००० मिलीअँपिअर क्षमतेची असून हे मॉडेल अँड्रॉइडच्या नोगट या अद्ययावत आवृत्तीवर चालणारे आहे. यात फोर-जी व्हिओ-एलटीई नेटवर्क सपोर्टसह ब्ल्यू-टुथ, वाय-फाय, जीपीएस, मायक्रो-युएसबी, युएसबी-ओटीजी आदी फिचर्स असतील. तसेच यात फिंगरप्रिंट स्कॅनरसह अ‍ॅक्सलेरोमीटर, गायरोस्कोप, ग्रॅव्हीटी, अँबिअंट लाईट सेन्सर्सदेखील प्रदान करण्यात आले आहेत. कार्बन टिटॅनियम फ्रेम्स एस७ हे मॉडेल ग्राहकांना शॉपक्लुज या शॉपींग पोर्टलवरून खरेदी करता येणार आहे. यासोबत कंपनीने काही ऑफर्सदेखील देऊ केल्या आहेत. यात या स्मार्टफोनसोबत एयरटेलची सेवा घेणार्‍या युजरला एकंदरीत २,००० रूपयांचा कॅशबॅक मिळणार आहे. इंड्युसइंड अथवा स्टँडर्ड अँड चार्टर्ड बँकांच्या क्रेडिट अथवा डेबीट कार्डावरून हे मॉडेल खरेदी करणार्‍याला १० टक्के सवलत मिळणार आहे. तर मोबीक्विकवरून याची खरेदी करणार्‍याला २,१०० रूपयांची सुपरकॅश मिळेल.

टॅग्स :technologyतंत्रज्ञानMobileमोबाइल