शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

फक्त 800 रुपयांमध्ये तुमचा 4G फोन अपग्रेड करा 5G वर; अशी आहे भन्नाट ऑफर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2022 17:59 IST

Flipkart Offers: अनेकजण 5G स्मार्टफोन घेण्याचा विचार करत आहेत, जे महाग आहेत. परंतु 16 हजारांचा 5जी फोन फक्त 800 रुपयांमध्ये विकत घेता आला तर?

यावर्षीच्या अखेरपर्यंत देशातील अनेक शहरांमध्ये 5G चा शिरकाव होणार आहे. त्यामुळे अनेकजण 5G स्मार्टफोन घेण्याचा विचार करत आहेत, जे महाग आहेत. परंतु 16 हजारांचा 5जी फोन फक्त 800 रुपयांमध्ये विकत घेता आला तर? POCO M3 Pro 5G स्मार्टफोनवर ही अविश्वसनीय संधी ई-कॉमर्स वेबसाईट फ्लिपकार्ट देत आहे. चला जाणून घेऊया ही ऑफर. 

जुना 4G फोन करा अपग्रेड 

POCO M3 Pro 5G च्या 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज मॉडेल 15 टक्के डिस्काउंटनंतर 13,499 रुपयांमध्ये विकत घेता येईल. परंतु जर तुम्ही तुमचा जुना फोन एक्सचेंज केला तर तुम्हाला फ्लिपकार्टवर 12,700 रुपयांची सूट मिळेल. त्यामुळे POCO M3 Pro 5G ची किंमत फक्त 799 रुपये होईल. सोबत Flipkart Axis Bank क्रेडिट कार्डवरील मध्ये 5 टक्के अनलिमिटेड कॅशबॅक देखील दिला जात आहे.  

POCO M3 Pro 5G चे स्पेसिफिकेशन्स  

पोकोनं या फोनसाठी मीडियाटेक डायमेंसिटी 700 चिपची निवड केली आहे, या प्रोसेसरला माली G57 GPU ची जोड देण्यात आली आहे. फोनमध्ये 64GB किंवा 128GB स्टोरेजसह 4GB किंवा 6GB RAM मिळेल. या पोको फोनमध्ये पावर बॅकअपसाठी 5,000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे, जी बॅटरी 18W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येते. फोन अँड्रॉइड 11 वर आधारित MIUI 12 वर चालतो.  

पोकोचा हा नवीन फोन पंच-होल डिस्प्लेसह लाँच झाला आहे. हा डिस्प्ले 20:9 अस्पेक्ट रेशियोला सपोर्ट करतो. तसेच या फुलएचडी+ एलसीडी डिस्प्लेचा आकार 6.5 इंच इतका आहे. हा फोन 90हर्ट्ज रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो.  

फोटोग्राफीसाठी POCO M3 Pro च्या मागील बाजूस ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या सेटअपमध्ये 48 मेगापिक्सलच्या मुख्य कॅमेरासोबत दोन 2MP चे कॅमेरे (मॅक्रो आणि डेप्थ) देण्यात आले आहात. फोनच्या समोरच्या बाजूस 8MP चा सेल्फी शुटर आहे. 

हे देखील वाचा:

टॅग्स :Smartphoneस्मार्टफोनAndroidअँड्रॉईडFlipkartफ्लिपकार्ट