शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

मोबाईल, टीव्ही, AC स्वस्त होणार? बजेटमध्ये गॅजेट इंडस्ट्रीला 'बूस्टर डोस', होतील 'हे' मोठे फायदे

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2026 10:08 IST

Budget 2026 : भारतीय इलेक्ट्रॉनिक घटक उत्पादन क्षेत्राला बळकटी मिळेल आणि देशांतर्गत सप्लाय चेन अधिक मजबूत होईल.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत आर्थिक वर्ष २०२६-२७ चा अर्थसंकल्प सादर केला. भारत सरकारने 'इलेक्ट्रॉनिक घटक उत्पादन योजने'अंतर्गत (Electronics Components Manufacturing Scheme) खर्चात मोठी वाढ केली आहे. या योजनेसाठीची तरतूद जवळपास २३ हजार कोटी रुपयांवरून वाढवून आता ४० हजार कोटी रुपये करण्यात आली आहे.

या भरघोस निधीमुळे भारतीय इलेक्ट्रॉनिक घटक उत्पादन क्षेत्राला बळकटी मिळेल आणि देशांतर्गत सप्लाय चेन अधिक मजबूत होईल. या निर्णयामुळे परदेशी कंपन्यांना भारतात त्यांचे युनिट्स उभारण्यासाठी आणि गुंतवणूक करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल.

स्मार्टफोन, टीव्ही, एसीला होणार फायदा

या योजनेमुळे स्मार्टफोन, लॅपटॉप, मायक्रोवेव्ह, फ्रीज आणि टोस्टर यांसारख्या घरगुती उत्पादनांच्या निर्मितीसाठी परदेशांवरील अवलंबित्व कमी होईल. उत्पादनं स्वस्त होतील की नाही, हे येणारा काळच सांगेल, परंतु जर उत्पादकांना स्वस्त दरात सुटे भागमिळाले, तर भविष्यात भारतात स्वस्त गॅजेट्स उपलब्ध होऊ शकतात. तसेच या क्षेत्रात रोजगाराच्या नवीन संधीही निर्माण होतील.

अर्थमंत्र्यांनी सांगितलं की, ही योजना एप्रिल २०२५ मध्ये २२,९१९ कोटी रुपयांच्या निधीसह सुरू करण्यात आली होती. मात्र, मिळालेले गुंतवणुकीचे प्रस्ताव आणि उद्दिष्टे लक्षात घेता सरकारने हा निधी वाढवून ४०,००० कोटी रुपये करण्याचा प्रस्ताव मांडला आहे.

मोठ्या गुंतवणुकीची आणि रोजगाराची अपेक्षा

केंद्रीय मंत्रिमंडळाने मार्चमध्ये या योजनेला मंजुरी दिली होती. यातून ४.५६ लाख कोटी रुपयांचं उत्पादन आणि सुमारे ५९,३५० कोटी रुपयांची अतिरिक्त गुंतवणूक मिळण्याची अपेक्षा आहे.

आतापर्यंत ४६ अर्जांना मंजुरी 

यामध्ये एकूण ५४,५६७ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे प्रस्ताव आहेत. यामुळे सुमारे ५१,००० लोकांना थेट रोजगार मिळण्याची शक्यता आहे.

गेल्या महिन्यातच Foxconn, Tata Electronics, Samsung, Dixon Technologies आणि Hikalco Industries सारख्या कंपन्यांच्या २२ अर्जांना मंजुरी देण्यात आली आहे.

या इलेक्ट्रोनिक्स पार्ट्सच्या उत्पादनाला मिळणार चालना

सरकार या योजनेअंतर्गत विशेषतः खालील इलेक्ट्रॉनिक पार्ट्सच्या निर्मितीला प्रोत्साहन देत आहे:

डिस्प्ले मॉड्यूल

सब-असेम्बली कॅमेरा मॉड्यूल

प्रिंटेड सर्किट बोर्ड असेंब्ली (PCBA)

लिथियम सेल एनक्लोजर

रेझिस्टर

कॅपेसिटर

फेराइट्स

PLI पेक्षा ही योजना वेगळी कशी?

ही योजना सरकारच्या पूर्वीच्या 'प्रॉडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह' (PLI) योजनेपेक्षा वेगळी आहे. PLI मध्ये सबसिडी ही उत्पादनावर आधारित असते, तर या नवीन योजनेत प्रोत्साहन (Incentives) खालील तीन निकषांवर दिले जाईल: 

१. वार्षिक रोजगार निर्मिती २. भांडवली खर्च (Capex) ३. वार्षिक उत्पादन

Apple आणि Samsung सारख्या कंपन्यांनी भारतात असेम्बली युनिट्स सुरू केले असले तरी, सध्या देशातील व्हॅल्यू ॲडिशन केवळ १५-२०% आहे. सरकारला हे प्रमाण वाढवून ३०-४०% पर्यंत न्यायचं आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Gadgets Cheaper? Budget Boosts Electronics Industry, Big Benefits Expected

Web Summary : Government increases electronics manufacturing scheme funding to ₹40,000 crore, boosting domestic production. This aims to reduce reliance on imports for smartphones, TVs, and appliances, potentially lowering gadget prices and creating jobs. Scheme focuses on components like displays and PCBs.
टॅग्स :Budgetअर्थसंकल्प २०२६MobileमोबाइलSmartphoneस्मार्टफोनtechnologyतंत्रज्ञानIndiaभारत