शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
2
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
3
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
4
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
5
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
6
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
7
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
8
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
9
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
10
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
11
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
12
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
13
भयंकर! बॉयफ्रेंडसाठी नवऱ्यासह मुलाला सोडलं, 'त्याने'च तिला संपवलं, अंगावर काटा आणणारी घटना
14
बंपर गिफ्ट...! या मल्टीबॅगर कंपनीनं १-२ नव्हे, वाटले तब्बल 24 बोनस शेअर, लोकांना केलं मालामाल; दिलाय 6100% हून अधिक परतावा
15
"विवाहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
16
महालक्ष्मी रेसकोर्सवर साकारणार भव्यदिव्य सेंट्रल पार्क; आराखड्याचे महापालिकेकडून सादरीकरण
17
"मतदार याद्यांमधले घोळ आम्हीही दाखवले, पण..."; महापालिका निवडणुकांच्या घोषणेवर CMचे विधान
18
रेखा झुनझुनवालांकडे या कंपनीचे तब्बल ५ कोटींहून अधिक शेअर; ₹३०० पार जाणार स्टॉक, एक्सपर्ट्सचा दावा
19
Photo: 'या' वर्षातील बेस्ट बजेट स्मार्टफोन, किंमत १५ हजारांपेक्षा कमी, यादीत मोठे ब्रँड्स
Daily Top 2Weekly Top 5

BSNL फ्लावर नहीं फायर है... 'या' प्लॅनमुळं Jio-Airtel चं वाढलं टेन्शन!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2024 20:39 IST

स्वस्त रिचार्ज प्लॅनमुळे लाखो Jio आणि Airtel युजर्स BSNL कडे वळले आहेत.

नवी दिल्ली : भारत संचार निगम लिमिटेड म्हणजेच बीएसएनएलच्या (BSNL)  स्वस्त रिचार्ज प्लॅनमुळे जिओ (Jio), एअरटेल (Airtel) आणि व्होडाफोन-आयडियाचे (Vi) टेन्शन वाढत आहे. BSNL ने आपल्या पोर्टफोलिओमध्ये असे अनेक स्वस्त प्लॅन ऑफर केले आहेत, ज्यात फ्री कॉलिंग, डेटा सारखे शानदार बेनिफिट्स दिले जात आहेत. 

स्वस्त रिचार्ज प्लॅनमुळे लाखो Jio आणि Airtel युजर्स BSNL कडे वळले आहेत. अलीकडेच, BSNL ने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरून पोस्ट केले होते की, जुलै महिन्यापासून अवघ्या चार महिन्यांत 55 लाखांहून अधिक नवीन युजर्स जोडले गेले आहेत. Jio, Airtel आणि Vi चे युजर्स प्लॅन्स महाग असल्यामुळे कमी होत आहेत. तर BSNL कडे वळले आहेत. त्यामुळे BSNL सध्या चर्चेत आहे.

Jio, Airtel आणि Vi ने आपल्या प्लॅनच्या किमती वाढवल्यापासून, BSNL सतत स्वस्त प्लॅन ऑफर करून संधीचा फायदा घेत आहे. महागडे प्लॅन टाळण्यासाठी युजर्स आता स्वस्त आणि दीर्घ वैधता शोधत आहेत. BSNL ने यादीत असा प्लॅन आणला आहे, ज्यामुळे Jio आणि Airtel चे टेन्शन अनेक पटींनी वाढले आहे. दरम्यान, तुम्ही BSNL चे सिम वापरत असाल तर हा नवीन प्लॅन तुम्हाला मोठा दिलासा देऊ शकतो.

BSNL चा शानदार प्लॅनBSNL या रिचार्ज प्लॅनची वैधता 395 दिवस आहे. याचा अर्थ, जर तुम्ही हा प्लॅन घेतला तर तुम्ही एका वर्षाहून अधिक काळ रिचार्जच्या तणावातून मुक्त व्हाल. BSNL या 13 महिन्यांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये ग्राहकांना सर्व नेटवर्कवर मोफत कॉलिंग दिले जाते. यासह, तुम्हाला सर्व नेटवर्कसाठी दररोज 100 विनामूल्य एसएमएस देखील दिले जातात. दरम्यान, हा प्लॅन घेण्यासाठी तुम्हाला फक्त 2399 रुपये खर्च करावे लागतील.

जास्त ब्राउझिंग किंवा ओटीटी स्ट्रीमिंग करणाऱ्यांसाठी BSNL चा हा प्लॅन खास आहे. यामध्ये 395 दिवसांसाठी एकूण 790GB हाय स्पीड डेटा मिळतो. तुम्ही दररोज 2GB पर्यंत हाय स्पीड डेटा वापरू शकता. दैनिक डेटा मर्यादा संपल्यानंतर, तुम्हाला प्लॅनमध्ये 40Kbps इंटरनेट स्पीड मिळेल. या प्लॅनमध्ये, BSNL युजर्स Hardy Games, Challenger Arena Games, Gameon & Astrotell, Gameium, Zing Music आणि WOW Entertainment चे मोफत सबस्क्रिप्शन देखील देते.

टॅग्स :BSNLबीएसएनएलMobileमोबाइलtechnologyतंत्रज्ञान