शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
4
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
5
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
6
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
7
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
8
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
9
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
10
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
11
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
12
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
13
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
14
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल
15
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
16
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
17
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
18
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
19
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
20
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप

BSNL ने आणला नवीन प्लॅन; 187 रुपयांमध्ये अनलिमिटेड कॉलिंग अन् दररोज 1.5 GB डेटा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2025 17:59 IST

खाजगी टेलिकॉम कंपन्यांशी स्पर्धा करण्यासाठी BSNL नवनवीन प्लॅन्स लॉन्च करत आहे.

BSNL Recahrge Plan: खासगी टेलिकॉम कंपन्यांनी आपल्या रिचार्ज प्लॅन्सच्या किमती वाढवल्यामुळे लाखो युजर्स BSNL कडे वळत आहेत. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे, कंपनीने देऊ केलेले स्वस्त रिचार्ज प्लॅन्स. खाजगी टेलिकॉम कंपन्यांशी स्पर्धा करण्यासाठी BSNL नवनवीन प्लॅन्स लॉन्च करत आहे. आता कंपनीने 200 रुपयांपेक्षा कमी किमतीचा एक मंथली प्लॅन लॉन्च केला आहे. 

BSNL चा नवीन प्लॅन     या प्लॅनमध्ये तुम्हाला अमर्यादित कॉलिंग आणि दररोज 1.5 जीबी डेटा मिळेल. बीएसएनएलने त्यांच्या एक्स अकाउंटवर या नवीन प्लॅनची ​​माहिती दिली आहे. या प्लॅनची किंमत फक्त 187 रुपये आहे. या प्लॅनमध्ये तुम्ही रोमिंगमध्ये मोफत कॉल करू शकता. तुम्हाला 100 मोफत एसएमएसची सुविधादेखील मिळेल. जिओ, एअरटेल आणि VI देखील असाच प्लॅन ऑफर करते, पण त्यांची किंमत थोडी जास्त आहे.

मोफत लाईव्ह टीव्हीचा आनंद हा प्लॅन 28 दिवसांच्या वैधतेसह येतो. जर तुम्हाला तुमच्या फोनवर टीव्हीचा आनंद घ्यायचा असेल, तर या प्लॅनमध्ये तुम्हाला BiTV चे मोफत सबस्क्रिप्शन मिळते. यात तुम्ही 400 हून अधिक मोफत लाइव्ह टीव्ही चॅनेलचा आनंद घेऊ शकता. यासोबतच तुम्हाला OTT अॅप्सचे सबस्क्रिप्शन देखील मिळेल. 

खाजगी टेलिकॉम कंपन्यांचे मंथली प्लॅनजिओएअरटेल आणि VI देखील असे अनेक प्लॅन ऑफर करते, ज्यात सारखेच फायदे मिळतात, परंतु त्यांची किंमत थोडी जास्त आहे. जिओबद्दल बोलायचे झाले तर, 199 रुपयांचा प्लॅन आहे, ज्यामध्ये तुम्हाला दररोज 1.5 जीबी डेटा, अमर्यादित व्हॉइस कॉल आणि 100 एसएमएसची सुविधा मिळते, तर एअरटेलचा 28 दिवसांचा सर्वात स्वस्त प्लान 299 रुपयांचा आहे. तथापि, यामध्ये दररोज फक्त 1 जीबी डेटा उपलब्ध आहे. तर VI प्लॅनची ​​किंमत देखील 299 रुपये आहे.

टॅग्स :BSNLबीएसएनएलAirtelएअरटेलJioजिओVodafone Ideaव्होडाफोन आयडिया (व्ही)Smartphoneस्मार्टफोन