शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

BSNL ने लॉन्च केला 499 रुपयांत मोबाइल, एक वर्ष कॉलिंगची ऑफर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2017 20:44 IST

मोबाइलचं उत्पादन करणारी भारतीय कंपनी डीटेल (Detel) सोबत मिळून BSNL ने एक मोबाइल लॉन्च केला आहे. या मोबाइलचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे त्याची किंमत आहे. या मोबाइलची किंमत फक्त 499 रुपये इतकी आहे.

ठळक मुद्देभारतीय कंपनी डीटेल (Detel) सोबत मिळून BSNL ने मोबाइल लॉन्च केला आहेया मोबाइलची किंमत फक्त 499 रुपये इतकी आहेDetel D1 हा सर्वात स्वस्त फिचर मोबाइल असल्याचा दावा कंपनी करत आहे

मुंबई - मोबाइलचं उत्पादन करणारी भारतीय कंपनी डीटेल (Detel) सोबत मिळून BSNL ने एक मोबाइल लॉन्च केला आहे. या मोबाइलचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे त्याची किंमत आहे. या मोबाइलची किंमत फक्त 499 रुपये इतकी आहे. Detel D1 हा सर्वात स्वस्त फिचर मोबाइल असल्याचा दावा कंपनी करत आहे. या मोबाइलमध्ये BSNL कनेक्शन असणार आहे. पहिल्या रिचार्जची वैधता 365 दिवसांसाठी असणार आहे. मोबाइल फोनमध्ये एका वर्षापर्यंत इनकमिंग आणि आऊटगोईंग कॉलची सुविधा देण्यात येत आहे. याशिवाय 103 रुपयांचा टॉकटाइमही दिला जात आहे. बीएसएनएल टू बीएसएनएल कॉलसाठी प्रती मिनिट 0.15 पैसे आणि इतर नेटवर्कवर कॉल करण्यासाठी 0.40 पैसे प्रती मिनिट आकारण्यात येणार आहे. Detel D1 फीचर फोनबद्दल बोलायचं झाल्यास यामध्ये 1.44 इंच मोनोक्रोम डिस्प्ले देण्यात आला आहे. हा मोबाइल  GSM 2G नेटवर्कवर काम करेल. मात्र या मोबाइलमध्ये एकच सीमकार्ड वापरु शकणार आहात. पॉवर बॅकअपसाठी मोबाइलमध्ये 650mAH बॅटरी देण्यात आली आहे. सोबतच टॉर्चलाइटदेखील देण्यात आली आहे. याशिवाय मोबाइलमध्ये फोन बूक आणि लाऊडस्पीकरची सुविधा असणार आहे.

रिलायन्स जिओने फ्री फोन लॉन्च केल्यापासून सर्वच कंपन्या स्वस्त मोबाइल आणण्याच्या स्पर्धेत आहेत. रिलायन्स जिओने आतापर्यंत एकदाच बुकिंग केली आहे. पहिल्याच वेळेत कंपनीकडे इतक्या ऑर्डर आल्या आहेत की, दुस-यांदा बुकिंग सुरुच करु शकले नाहीत. जिओचा फ्री फोन घ्यायचा असल्यास एक अट आहे ती म्हणजे, 1500 रुपये सेक्युरिटी म्हणून भरावे लागणार आहेत. हे पैसे कंपनी तीन वर्षानंतर परत करणार आहे. पण हे पैसे परत हवे असल्यास युजरला वर्षाला 1500 रुपयांचा रिचार्ज करणं अनिवार्य आहे. म्हणजेच तीन वर्षात 4500 रुपयांचा रिचार्ज करावा लागणार आहे. 

टॅग्स :BSNLबीएसएनएलMobileमोबाइल