BSNL कडून प्रजासत्ताक दिनाची विशेष ऑफर; नवीन प्लान लॉन्च, वैधताही वाढवली

By देवेश फडके | Published: January 23, 2021 05:20 PM2021-01-23T17:20:28+5:302021-01-23T17:23:26+5:30

भारतीय दूरसंचार निगम लिमिटेडने (BSNL) ग्राहकांसाठी विशेष ऑफर आणली आहे. प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून BSNL ने एक नवीन प्लान लॉन्च केला आहे.

bsnl launch new 398 rupees plan in republic day 2021 offer and validity extension for two plans | BSNL कडून प्रजासत्ताक दिनाची विशेष ऑफर; नवीन प्लान लॉन्च, वैधताही वाढवली

BSNL कडून प्रजासत्ताक दिनाची विशेष ऑफर; नवीन प्लान लॉन्च, वैधताही वाढवली

googlenewsNext
ठळक मुद्देBSNL ची विशेष Republic Day 2021 Offerएक नवीन प्लान लॉन्च आणि दोन प्लानची वैधता वाढवलीयुझर्ससाठी फुल टॉक टाइमची सुविधाही उपलब्ध

नवी दिल्ली : भारतीय दूरसंचार निगम लिमिटेडने (BSNL) ग्राहकांसाठी विशेष ऑफर आणली आहे. प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून BSNL ने एक नवीन प्लान लॉन्च केला आहे. BSNL ने आपल्या २३९९ आणि १९९९ या प्लानची वैधता वाढवली असून, ३९८ रुपयांचा नवा प्लान सादर केला आहे. 

BSNL ने व्हॉइस कॉलवरून एफयूव्ही मर्यादा हटवली आहे. यापूर्वी कंपनीच्या सर्व प्लानमध्ये ही मर्यादा २५० मिनिटांपर्यंतची होती. 'बीएसएनएल'ने आता १२० रुयपांहून जास्त सर्व टॉप प्लान्सवर फुल टॉकटाइम व्हॅल्यू देण्याची घोषणा केली आहे.

१९९९ रुपयांचा प्लान

BSNL ने आपल्या १९९९ रुपयांच्या वार्षिक प्लानची वैधता २१ दिवसांनी वाढवली आहे. 'रिपब्लिक डे २०२१ ऑफर' अंतर्गत आता या प्लानची वैधता ३८६ दिवसांची झाली आहे. मात्र, ही अतिरिक्त वैधतेची ऑफर केवळ ३१ जानेवारी २०२१ पर्यंत आहे. या प्लानमध्ये देशात कुठेही आणि कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा आहे. याशिवाय युझर्सना इरोस नाउचे एक वर्षासाठी मोफत सब्सक्रिप्शन मिळते.

२३९९ रुपयांचा प्लान

BSNL ने 'रिपब्लिक डे २०२१ ऑफर' अंतर्गत २३९९ रुपयांच्या प्लानची वैधता ७२ दिवसांनी वाढवली असून, आता या प्लानची वैधता ४३७ दिवसांची झाली आहे. BSNL युझर्ससाठी ३१ मार्च २०२१ पर्यंत ही ऑफर लागू असेल. या प्लानमध्ये अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग, दररोज १०० एसएमएस, प्रतिदिन ३ जीबी डेटा आणि इरोस नाउचे सब्सक्रिप्शन मोफत देण्यात येत आहे. 

३९८ रुपयांचा नवा प्लान

BSNL ने ३९८ रुपयांचा नवा प्लान लॉन्च केला आहे. विशेष म्हणजे या प्लानमध्ये दररोज १०० एसएमएस आणि अनलिमिटेड डेटा युझर्सना देण्यात येतो. तसेच BSNL च्या १२० रुपये, १५० रुपये, २०० रुपये, २२० रुपये, ३०० रुपये, ५०० रुपये, १ हजार रुपये, ११०० रुपये, दोन हजार रुपये, ती हजार रुपये, पाच हजार रुपये आणि सहा हजार रुपयांच्या प्लानमध्ये फुल टॉकटाइमचा फायदा मिळू शकतो.

Web Title: bsnl launch new 398 rupees plan in republic day 2021 offer and validity extension for two plans

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.