बीएसएनएलने रिलायन्स जिओ, एअरटेल, व्होडाफोन-आयडिया या सर्व टेलिकॉम कंपन्यांवर कडी केली आहे. केवळ १ रुपयांत बीएसएनएलने ३० दिवसांसाठी ४जी डेटा देणारा फ्रिडम प्लॅन लाँच केला आहे. अर्थात हा स्वातंत्र्य दिनानिमित्त असल्याने तो काही काळापुरताच उपलब्ध असणार आहे. परंतू, १ रुपयांत आज काय येते? बीएसएनएल महिनाभराचा डेटा देणार आहे.
बीएसएनएलने देशभरात स्वदेशी ४ जी नेटवर्क लाँच केले आहे. 1 रुपयांत ग्राहकांना अमर्यादित लोकल आणि एसटीडी कॉलिंग, दररोज २ जीबी हाय-स्पीड डेटा, १०० एसएमएस/दिवस आणि एक मोफत बीएसएनएल सिम देखील दिले जाणार आहे.
देर आए, दुरस्त आए प्रमाणे बीएसएनएल देशभरात फोर जी नेटवर्क स्थापन करत आहे. बीएसएनएल देशभरात १ लाख ठिकाणी ४जी नेटवर्क उभारत आहे. बीएसएनएलचे रिचार्जचे दर हे सर्वात स्वस्त आहेत. परंतू, सेवा खराब आहे. परवडते या एकाच फायद्यातून बीएसएनएलची सेवा करोडो लोक वापरत आहेत. सध्या सिमकार्ड सुरु ठेवण्यासाठी दर महिन्याला रिचार्ज करावे लागते. अडीचशे ते साडे तीनशे रुपये यासाठी महिन्याचा खर्च आहे. अनेकांकडे आधीपासूनची दोन सिमकार्ड आहेत. ती सुरु ठेवण्यासाठी ५०० ते ७०० रुपये खर्च करावे लागतात. बीएसएनएल केवळ १४७ रुपयांत डेटा, कॉलिंग आणि मेसेज देत आहे. ज्याच्या ग्राहकांना फायदा होत आहे. बीएसएनएल लवकरच फाईव्ह जी नेटवर्कही देणार असल्याचे सांगितले जात आहे.