BSNL 5G : सरकारी टेलिकॉम कंपनी BSNL ने त्यांच्या 5G सेवेची तयारी पूर्ण केली आहे. कंपनीने त्यांच्या 5G सेवेचे नाव जाहीर केले आहे. कंपनीने अलीकडेच त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर ग्राहकांना 5G सेवेसाठी नाव सुचवण्यास सांगितले होते. त्यानुसार, आता कंपनीने 5G सेवेला Q-5G म्हणजेच Quantum 5G असे नाव दिले आहे. भारत संचार निगम लिमिटेडने त्यांच्या एक्स हँडलवरून याची घोषणा केली आहे.
BSNL ने आपल्या पोस्टमध्ये सांगितले की, BSNL यापुढे कंपनीच्या 5G सेवेला Q-5G नावाने ओळखले जाईल. यासाठी कंपनीने सर्व युजर्सचे आभारही मानले. दरम्यान, BSNL ची 5G सेवा लॉन्च झाल्यानंतर खासगी टेलिकॉम कंपन्यांचे टेन्शन वाढणार आहे. याचे कारण म्हणजे, सरकारी टेलीकॉम कंपनीचे प्लॅन्स खासगी कंपन्यांपेक्षा खूप स्वस्त आहेत.
1 लाख नवीन मोबाईल टॉवर केंद्रीय संचार राज्य मंत्री चन्द्रशेखर पेम्मासानी यांनी अलीकडेच सांगितले होते की, 1 लाख मोबाईल टॉवर बसवण्याचे काम यशस्वीरित्या पूर्ण झाले आहे. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळाकडून अतिरिक्त 1 लाख नवीन 4जी/5जी मोबाईल टॉवर बसवण्यासाठी मंजुरीची वाट पाहत आहोत. नवीन 1 लाख नवीन मोबाईल टॉवर बसवल्यानंतर कोट्यवधी ग्राहकांना चांगली कनेक्टिव्हिटी मिळेल.
स्वदेशी तंत्रज्ञानावर विश्वासमे 2023 मध्ये बीएसएनएलने एरिक्सनला टेलिकॉम उपकरणे बसवण्याचे कंत्राट दिले. याशिवाय, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस आणि तेजस नेटवर्कला मोबाईल टॉवर बसवण्याचे काम देण्यात आले. सरकारी दूरसंचार कंपनीने पुढील 10 वर्षांसाठी त्यांच्या नवीन 4G मोबाईल टॉवर्सच्या देखभालीसाठी 13 हजार कोटी रुपये गुंतवले आहेत. सध्या देशभरात कंपनीचे 70 हजारांहून अधिक टॉवर्स सुरू आहेत.