शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

सततच्या चार्जिंगला कंटाळलायत?; ४० तासांपर्यंत चालणार हे स्वस्त आणि मस्त Earbuds

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2022 15:41 IST

Boult Audio AirBass Y1 : कंपनीनं गुरुवारी लाँच केले, सर्वाधिक बॅटरी लाईफ देणारे स्वस्त आणि मस्त Earbuds. 

Boult Audio AirBass Y1 : वारंवार Earbuds चार्ज करुन कंटाळला आहात? आणि जर तुम्ही असे इयरबड्स शोधत असाल जे तुम्हाला सतत चार्च करावे लागणार नाहीत, तर Boult चे इयरबड्स तुम्हाला नक्कीच फायद्याचे ठरतील. कंपनीने गुरुवारी त्यांचे नवीन Boult Audio AirBass Y1 इयरबड्स भारतात लॉन्च केले आहेत. नवे AirBass Y1 TWS इयरबड्स देशात कंपनीच्या TWS इयरफोन लाइनअपमध्ये लेटेस्ट एडिशन आहेत आणि ४० तास बॅटरी, तसंच फास्ट चार्जिंग ही त्याची खासीयत आहे.

कंपनीनं दिलेल्या माहितीनुसार ग्राहकांना सिंगल-चॅनल ऑडिओसोबत सिंगल इयरबडवर कॉलिंग आणि गाण्याचाही आनंद लुटता येणार आह. नवे इयरबड्स एक अँगल्ड डिझाइनला सपोर्ट करतात. तसंच वॉटर आणि स्वेट रेझिस्टन्ससाठी त्याला IPX5 रेटिंग देण्यात आलंय. Boult AirBass Y1 ची किंमत केवळ १२९९ रुपये इतकी आहे. ब्लॅक आणि व्हाईट कलर ऑप्शनमध्ये हे इयरबड्स उपलब्ध असतील. तसंच सध्या फ्लिपकार्टच्या माध्यमातून हे खरेदी करता येऊ शकतात. याशिवाय Boult AirBass Y1 वर ज्यांच्याकडे अॅक्सिस बँकेचं क्रेडिट कार्ड असेल त्यांच्यासाठी ५ टक्के सूटही मिळणार आहे.

Boult Audio AirBass Y1 चे बेसिक स्पेक्सइयरबड्समध्ये अँगल्ड डिझाईन आणि ABS बॉडी मिळते. कंपनीनं AirBass Y1 यात वापरण्यात आलेल्या ड्रायव्हर्सबद्दल कोणताही खुलासा केलेला नाही. वायरलेस इयरबड्स चार्जिंगसह ४० तासांपर्यंत प्लेबॅक देतं. तसंच केवळ १० मिनिटं चार्ज केल्यानंतर यात १०० मिनिटांचा प्लेबॅक मिळत असल्याचा दावाही करण्यात आला आहे. याशिवाय हे इयरबड्स मोनोपॉड मोडवरही वापरता येऊ शकतात.

हे मीडिया प्लेबॅक आणि कॉल घेण्यासोबतच ब्लूटूथ ५.१ सपोर्ट आणि टच कंट्रोलसह येतात. याशिवाय TWS इयरबड्स ट्रिपल टॅप जेस्चरसह गुगल असिस्टंस आणि सिरीही सपोर्ट करत असल्याचं कंपनीनं म्हटलंय.

टॅग्स :technologyतंत्रज्ञानIndiaभारत