Bluetooth Headphones: 60 तासांच्या जबराट बॅटरी लाईफसह Boat Rockerz 660 लाँच; जाणून घ्या किंमत 

By सिद्धेश जाधव | Published: November 22, 2021 07:22 PM2021-11-22T19:22:48+5:302021-11-22T19:23:45+5:30

Bluetooth HeadPhones Boat Rockerz 660: Boat Rockerz 660 हेडफोन 60 तासांपर्यंतची बॅटरी लाईफ देतात, असा दावा कंपनीने केला आहे. हेडफोन आता फ्लिपकार्टवर खरेदीसाठी उपलब्ध आहेत. 

Boat rockerz 660 bluetooth headphones launched in india with 60 hours of battery life   | Bluetooth Headphones: 60 तासांच्या जबराट बॅटरी लाईफसह Boat Rockerz 660 लाँच; जाणून घ्या किंमत 

Bluetooth Headphones: 60 तासांच्या जबराट बॅटरी लाईफसह Boat Rockerz 660 लाँच; जाणून घ्या किंमत 

Next

Boat ने आज आपल्या Boat Rockerz 660 या नव्या Headphones ची घोषणा केली आहे. हे हेडफोन्स 40mm ड्रायव्हर, Fast Charging आणि Bluetooth 5.0 कनेक्टिव्हिटीसह बाजारात आले आहेत. परंतु यापेक्षाही जास्त या हेडफोन्सचा बॅटरी बॅकअप जास्त आकर्षक आहे. बोट रॉकर्ज 660 हेडफोन 60 तासांपर्यंतची बॅटरी लाईफ देतात, असा दावा कंपनीने केला आहे.  

Boat Rockerz 660 चे स्पेसिफिकेशन्स  

Boat Rockerz 660 एका ईयर कुशन आणि अर्गोनोमिक डिजाइनसह बाजारात आले आहेत. त्यामुळे दिर्घकाळ वापर देखील त्रासदायक वाटत नाही. हे हेडफोन्स बंबलबी ब्लू, फेरी मरून आणि अ‍ॅक्टिव्ह ब्लॅक असा तीन रंगात विकत घेता येतील.  

Boat Rockerz 660 मध्ये कंपनीने 40mm ड्रायव्हरचा वापर केला आहे. त्यामुळे यात ड्युअल EQ मोड्स - बास आणि बॅलन्स मिळतो. बोट हेडफोन ब्लूटूथ v5.0 आणि ऑक्स अशा दोन कनेक्टिविटी ऑप्शनसह सादर करण्यात आले आहेत. त्यामुळे चार्ज संपल्यानंतर देखील हे हेडफोन्स वापरता येतात. हेडफोन्समधील फंक्शन्स कंट्रोल करण्यासाठी यात इंटिग्रेटेड कंट्रोल मिळतात.  

अन्य फीचर्समध्ये हेडफोन वियर डिटेक्शन, व्हॉइस असिस्टंट सपोर्ट, 102db + 3db सेन्सेटिव्हिटी आणि ड्युअल पेयरिंगचा समावेश आहे. यातील 1,000mAh ची बॅटरी सिंगल चार्जवर 60 तासांचा बॅटरी बॅकअप देते. टाईप सी पोर्टसह येणारे हे हेडफोन्स एक तासात फुल चार्ज होतात. तसेच 10 मिनिटांच्या क्विक चार्जने 8 तासांची बॅटरी लाईफ मिळते.  

Boat Rockerz 660 ची किंमत  

Boat Rockerz 660 हे हेडफोन आता फ्लिपकार्टवर खरेदीसाठी उपलब्ध आहेत. या हेडफोन्सची किंमत 2,499 रुपये ठेवण्यात आली आहे.  

Web Title: Boat rockerz 660 bluetooth headphones launched in india with 60 hours of battery life  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app