शहरं
Join us  
Trending Stories
1
अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरणात न्याय झाला; मुख्य आरोपी अभय कुरुंदकरला जन्मठेप 
2
'सिस्टममध्ये मोठी गडबड, निवडणूक आयोगानेही तडजोड केली', राहुल गांधींनी अमेरिकेत मांडला महाराष्ट्र निवडणुकीचा मुद्दा
3
"ठाकरे बंधूंनी एकत्र यावे ही जनभावना’’, संजय राऊतांचं मोठं विधान, उद्धव ठाकरेंचा संदेशही सांगितला 
4
Astro Tips: स्वत:ची गाडी, बंगला हे प्रत्येकाचंच स्वप्नं; पण नशिबात ते नसेल तर उपाय कोणते? वाचा!
5
पत्नीने मिरची पावडर टाकली, नंतर चाकूने हल्ला केला; माजी डीजीपींच्या हत्या प्रकरणात मोठा खुलासा
6
LIC च्या 'या' स्कीममध्ये गुंतवणूक करून मुलीचं भविष्य करू शकता सुरक्षित, १२१ रुपये वाचवून जमेल लाखोंचा फंड
7
बीडची बिहारच्या दिशेनं वाटचाल, माजलगावात बिलाच्या कारणावरून ढाबा मालकाची हत्या
8
तुम्हालाही व्हॉट्सअपवर Hi, Hello चा मेसेज आलाय का? १५० रुपये मिळतील; पण नंतर काय कराल...
9
मनीषा डॉक्टरांच्या घरची मेंबर झाली; बघता बघता रुग्णालयात टॉपवर गेली, अटक केलेली महिला कोण?
10
पुणे-मुंबई महामार्गावर भीषण अपघात: ट्रकची ५ वाहनांना धडक; बाप-लेकीचा मृत्यू, १२ जण जखमी
11
चिनी कंपनीमुळे मस्क गुडघ्यावर? 'टेस्ला'ला वाचवण्यासाठी भारताकडे धाव, टाटासह ३ कंपन्यांकडे मागितली मदत
12
इकडे आड...! अमेरिकेसोबत व्यापारी करार केलात तर याद राखा; चीनची जगाला धमकी
13
पंतप्रधान जनधन योजनेनं आपलाच विक्रम मोडला, डिपॉझिटची रक्कम उच्चांकी स्तरावर; खातेधारकही वाढले
14
भारतात उभारलं जाणार जगातील पहिले अक्षय्य ऊर्जेवर चालणारे शहर? कशा असतील अत्याधुनिक सुविधा?
15
कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये 'या' चार मराठी सिनेमांची झाली निवड, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची घोषणा
16
Maharashtra Politics :"दोन ‘बंधू’ एकत्र येणार, त्यामुळे अनेकांच्या पोटात भीतीचा गोळा..."; सामनातून विरोधकांना डिवचले, संकेतही दिले
17
झारखंडच्या बोकारोमध्ये चकमक! सुरक्षा दलांनी ६ नक्षलवाद्यांना ठार केले
18
सरकारी टेलिकॉम कंपनी MTNL नं ₹८,३४६ कोटींचं कर्ज केलं डिफॉल्ट; 'या' ७ बँकांकडून घेतलंय लोन
19
वानखेडेवर १७ वर्षांच्या आयुष म्हात्रेची तुफानी फटकेबाजी, सामना पाहणाऱ्या भावाला आनंदाश्रू अनावर, व्हिडीओ होतोय व्हायरल 
20
राज्य सरकार हिंदीचा प्रचार का करतंय?; २२ शैक्षणिक संघटनांचा हिंदी सक्तीला विरोध

boAt नं लॉन्च केलं जबरदस्त स्मार्टवॉच; कॉलिंग फीचरसह मिळणार ७०० हून अधिक मोड्स, किंमतही कमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2024 12:37 IST

गुरुवारी कंपनीनं Boat Lunar Oasis हे स्मार्टवॉच लॉन्च केलं आहे. या स्मार्टवॉचमध्ये १.४३ इंचाचा AMOLED ऑलवेज ऑन डिस्प्ले देण्यात आलेला आहे. पाहूया यासह स्मार्टवॉचमध्ये कोणते आहे जबरदस्त फीचर्स.

देशातील हेडफोन्स आणि गॅजेट्स उत्पादक कंपनी बोट बद्दल माहित नसेल अशी कोणीही व्यक्ती नसेल. बोट ही कंपनी सातत्यानं नवनवी उत्पादनं सादर करत असतं. आता गुरुवारी कंपनीनं Boat Lunar Oasis हे स्मार्टवॉच लॉन्च केलं आहे. या स्मार्टवॉचमध्ये १.४३ इंचाचा  AMOLED ऑलवेज ऑन डिस्प्ले देण्यात आलेला आहे. याशिवाय या स्मार्टवॉचच्या मदतीनं तुम्ही कॉलिंगही करू शकता.  हे वॉच IP68 रेटेड वॉटर रेझिस्टंससह येतं. 

Boat Lunar Oasis मध्ये ७०० पेक्षा अधिक अॅक्टिव्ह मोड्स देण्यात आले असून यामध्ये युझर्सना ७ दिवसांपर्यंतचा बॅटरी बॅक अप मिळतो. या स्मार्टफोनची किंमत ३,२९९ रुपये इतकी आहे. हे स्मार्टवॉच तीन स्ट्रॅप ऑप्शनसह येतं. ग्राहक हे स्मार्टवॉच ऑनलाइन खरेदी करू शकतात. हे स्मार्टवॉच एका वर्षाच्या वॉरंटीसह येतं. 

Boat Lunar Oasis या नव्याकोऱ्या स्मार्टवॉचचे फीचर्स पाहण्यासाठी आणि ते खरेदी करण्यासाठी इथे क्लिक करा >> https://amzn.to/3RXrGXj

काय आहेत फीचर्स?

बोट लूनर ओएसिसमध्ये १.४३ इंचाचा अमोलेड डिस्प्ले (४६६×४६६ पिक्सल) देण्यात आला असून त्याचा ब्राइटनेस ६०० निट्स आहे. यासह यात २.५ डी सर्क्युलर स्क्रीन असून तो ऑलवेज-ऑन सपोर्टसह आणि UP द्वारे नेव्हिगेट करण्याच्या क्राऊनसह येतो. हे स्मार्टवॉच Cres+ OS वर चालतं आणि हे बोटच्या इन-हाऊस X1 प्रोसेसरसह सुसज्ज आहे. याशिवाय स्मार्टवॉचमध्ये MapmyIndia टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन सपोर्ट, DIY वॉच फेस स्टुडियोचा समावेश करण्यात आला आहे. DIY वॉच फेस स्टुडियोच्या माध्यमातून युझर्सना त्यांच्या मूड आणि आऊटफिट्सनुसार कस्टमाईज्ड फेस तयार करता येणार आहेत.

बोट क्रेस्ट अ‍ॅपसह, बोट लूनर ओएसिसचा वापर ब्लड ऑक्सिजन सॅच्युरेशन (SpO2) रेट आणि हार्ट रेट ट्रॅक करण्यासाठी केला जाऊ शकतो. स्लीप आणि स्ट्रेस मॉनिटर करण्यासाठी आवश्यक सेन्सरही या स्मार्टवॉचमध्ये देण्यात आलाय. याशिवाय या वियरेबल डिव्हाइसमध्ये अ‍ॅक्टिव्हिटी ट्रॅकरदेखील देण्यात आला आहे. अ‍ॅपच्या माध्यमातून युझर्स फिटनेस प्रेमींना जोडता येऊ शकतं आणि कस्टम रन प्लॅन तयार करू शकतात. 

टॅग्स :technologyतंत्रज्ञान