अरे व्वा! उंचावरून पडल्यावर देखील तुटणार नाही हा गेमिंग स्मार्टफोन; एका चार्जमध्ये 8 तास गेमिंग टाइम
By सिद्धेश जाधव | Updated: July 26, 2021 18:50 IST2021-07-26T18:49:31+5:302021-07-26T18:50:39+5:30
Blackview BL5000 Launch: आपल्या रगेड स्मार्टफोन्ससाठी ओळखल्या जाणाऱ्या Blackview कंपनीने Blackview BL5000 नावाचा गेमिंग स्मार्टफोन लाँच केला आहे.

अरे व्वा! उंचावरून पडल्यावर देखील तुटणार नाही हा गेमिंग स्मार्टफोन; एका चार्जमध्ये 8 तास गेमिंग टाइम
Blackview कंपनी आपल्या रगेड स्मार्टफोन्ससाठी ओळखली जाते. आता कंपनीने Blackview BL5000 स्मार्टफोन बाजारात आणला आहे. हा पहिला रगेड गेमिंग स्मार्टफोन आहे जो 5G सपोर्टसह सादर करण्यात आला आहे. या फोनमध्ये अनेक पावरफुल गेमिंग फीचर्स देण्यात आले आहेत, ज्यात कूलिंग सिस्टमसह 3D कूलिंग पाइपचा समावेश आहे. हा फोन Banggood वर 359 डॉलर्स म्हणजे सुमारे 30,300 रुपयांमध्ये लिस्ट करण्यात आला आहे.
Blackview BL5000 चे स्पेसिफिकेशन्स
Blackview BL5000 मध्ये 6.36 इंचाचा फुल एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे, हा डिस्प्ले 1080 x 2300 पिक्सल रिजोल्यूशन, 60Hz रिफ्रेश रेट, 400ppi पिक्सल डेंसिटी आणि 120Hz टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करतो. या फोनमध्ये मीडियाटेक 700 प्रोसेसर देण्यात आला आहे, या प्रोसेसरला 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेजची जोड देण्यात आली आहे.
ब्लॅकव्यू बीएल5000 स्मार्टफोनमधील ड्युअल रियर कॅमेरा सेटअपमध्ये 12 मेगापिक्सलचा मुख्य सेन्सर आणि 16 मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाईड-अँगल कॅमेरा आहे. हा फोन 16 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनमध्ये 5,065mAh ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे, जी 30 वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. हा फोन एकदा फुल केल्यास 8 तास गेमिंग टाइम देतो, असा दावा कंपनीने केला आहे. हा फोन IP68 आणि IP69K रेटेड वॉटर अँड डस्ट रेजिस्टन्ससह सादर करण्यात आला आहे.