शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

आसूसला टक्कर देण्यासाठी शाओमी सज्ज; Black Shark 4S गेमिंग फोन 13 ऑक्टोबरला होणार लाँच 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2021 19:04 IST

Black Shark 4S ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपसह सादर करण्यात येईल. हा फोन व्हाइट कलर व्हेरिएंटमध्ये सादर केला जाऊ शकतो.

शाओमी Black Shark या आपल्या ब्रँड अंतर्गत गेमिंग फोन लाँच करते. या ब्रँड अंतर्गत कंपनी Black Shark 4S हा गेमिंग फोन सादर करणार आहे. याची माहिती स्वतः कंपनीने चिनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून दिली आहे. Black Shark 4S गेमिंग स्मार्टफोन चीनमध्ये 13 ऑक्टोबरला दुपारी 12.30 वाजता लाँच केला जाईल. 

कंपनीने या लाँच इव्हेंटचा एक पोस्टर सोशल मीडियावर शेयर केला आहे. या पोस्टरमधून या स्मार्टफोनच्या डिजाईनची माहिती समोर आली आहे. त्यानुसार Black Shark 4S ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपसह सादर करण्यात येईल. हा फोन व्हाइट कलर व्हेरिएंटमध्ये सादर केला जाऊ शकतो. तसेच या फोनची डिजाईन मोठ्याप्रमाणावर Black Shark 4 सारखी असेल.  

Black Shark 4S चे संभाव्य स्पेसिफिकेशन्स 

Black Shark 4S स्मार्टफोन Qualcomm Snapdragon 888+ SoC सह सादर केला जाऊ शकतो. कंपनी या फोनमध्ये 120W फास्ट चार्जिंग सपोर्ट असलेली बॅटरी देऊ शकते, अशी माहिती लीक आणि रिपोर्ट्समधून समोर आली आहे. या फोनमध्ये 6.67-इंचाचा अ‍ॅमोलेड डिस्प्ले मिळू शकतो. हा डिस्प्ले 144Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल. हा डिवाइस 16GB पर्यंत रॅम आणि 512GB स्टोरेजसह बाजारात येऊ शकतो. या फोनमधील मुख्य कॅमेरा 64MP चा असू शकतो. हे लीक स्पेक्स आहेत त्यामुळे ठोस स्पेसिफिकेशन्ससाठी 13 ऑक्टोबरची वाट बघावी लागेल.  

टॅग्स :xiaomiशाओमीSmartphoneस्मार्टफोनAndroidअँड्रॉईडtechnologyतंत्रज्ञान