शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

1,114 व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपचा एकच अ‍ॅडमिन, जाणून घ्या कोण आहे 'तो'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2019 13:36 IST

एक अशी व्यक्ती जी एक, दोन नव्हे, तर 1114 व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपची अ‍ॅडमिन आहे.

कोलकाता- एक अशी व्यक्ती जी एक, दोन नव्हे, तर 1114 व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपची अ‍ॅडमिन आहे. ऐकून धक्का बसला ना, पण हे खरंच आहे. भाजपा आयटी सेलचे पदाधिकारी दीपक दास हे 1,114 व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपचे अ‍ॅडमिन आहेत. भाजपा रॅली, पक्ष कार्यालयातील बैठक, घरीसुद्धा दोन मोबाइल कायम त्यांच्या जवळच असतात. तसेच स्टँडबायसाठी एक बॅटरी चार्जरही ठेवलेला असतो.दीपक हे भाजपाच्या आयटी सेलचे कुचबिहारमधले जिल्हा पदाधिकारी आहेत. ते 1 हजार 114 व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपचे अ‍ॅडमिन आहेत. 36 वर्षीय दीपक भाजपाचं फेसबुक आणि ट्विटरचं पेजही सांभाळतात. दीपक सांगतात मी एकटाच नव्हे, तर अनेक कार्यकर्ते पक्षासाठी मतदारांपर्यंत पोहोचण्याचं काम करत आहेत. सोशल मीडियाही हे सध्या दुधारी अस्त्र आहे. तृणमूल काँग्रेसचं पश्चिम बंगालमध्ये असलेलं वर्चस्व आणि दहशतीमुळे भाजपाचा प्रचार करणं बरंच अवघड आहे. मी एका नंबरवर 229 व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपचा अ‍ॅडमिन आहे. तर दुसऱ्या नंबरवरून 885 व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपचा अ‍ॅडमिन आहे.प्रत्येक ग्रुपमध्ये कमीत कमी 30 जण आणि जास्तीत जास्त 250 जण असतात. दरदिवशी संख्या बदलत असते. कारण काही जण ग्रुप सोडतात, तर काही जण अ‍ॅड केले जातात. सकाळी सहा वाजल्यापासून माझ्याकडे रिकामी असा वेळच नसतो. पाकिस्तानमध्ये एअर स्ट्राइक केल्यानंतर आम्ही 24 तास काम केलं आहे. पक्षातर्फे प्रत्येकाच्या घराघरात जाऊन राष्ट्रीय ऑनलाइन सदस्यतेचं अभियान सुरू केलं होतं. मी 12वीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं आहे. परंतु पुढे आर्थिक कारणास्तव शिकता आलेलं नाही. 2014मध्ये मोदींच्या प्रचारासाठी मी भाजपामध्ये सहभागी झालो. त्यानंतर मला ब्लॉक महासचिव बनवण्यात आलं. 2015ला मी अँड्राइड फोन विकत घेतला आणि प्रचाराला सुरुवात केली. या वर्षी पक्षानं 10 हजार रुपयांचा स्मार्टफोन आणि एक पोर्टेबल चार्जरही दिला आहे. तसेच पक्षाकडून माझ्या प्रवासाचाही खर्च केला जातो. दास यांनी कोलकाता भाजपाच्या आयटी सेलद्वारे प्रशिक्षण देण्यात आलं आहे. तसेच त्यांनी हावडामध्ये अमित शाहांच्या अध्यक्षतेखालील एका सत्रात भागही घेतला होता. तिथेच अमित शाहांनी त्यांना काय करायचं आहे आणि काय करायचं नाही, याचं बौद्धिक दिलं. 

टॅग्स :WhatsAppव्हॉटसअ‍ॅप