शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

प्रदूषणाला रोखण्यासाठी चीनमध्ये सर्वात मोठी मशीन!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2018 10:12 IST

वाढत्या प्रदूषणासोबत दोन हात करण्यासाठी चीनने जगातलं सर्वात मोठं एअर प्युरिफायर तयार केलं आहे.

वाढत्या प्रदूषणासोबत दोन हात करण्यासाठी चीनने जगातलं सर्वात मोठं एअर प्युरिफायर तयार केलं आहे. १०० मीटर लांब उंच या प्यूरिफायरने प्रदूषणामुळे खराब होणारी हवा स्वच्छ करण्यास मदत होणार आहे. हे प्यूरिफायर चीनच्या शांक्शी प्रांतातील झियान शहरात एका टॉवरवर लावण्यात आलं आहे. 

चीनच्या इन्स्टिट्यूट ऑफ अर्थ एन्वायर्नमेंटच्या अभ्यासकांनी दावा केला आहे की, या टॉवरने शहराच्या १० किमी क्षेत्रातील हवा स्वच्छ करण्यास मदत मिळेल. याचा अर्थ हा की, याने पूर्ण शहरातील हवा स्वच्छ करण्यासोबतच शहराच्या आजूबाजूच्या परिसरातीलही हवा स्वच्छ होईल. या प्यूरिफायरने रोज १ कोटी घनमीटर हवा स्वच्छ केली जाते. इतकेच नाही तर हे प्यूरिफायर हवा स्वच्छ करण्यासोबतच स्मॉगही १५ ते २० टक्के कमी करते.

एका रिपोर्टनुसार, चीनमध्ये स्मॉगमुळे १.८ मिलियनपेक्षा जास्त लोक मृत्यूमुखी पडले आहे. इंस्टिट्यूट इकोनॉमिक्स अॅंड फाइनॅंशिअल अॅनालिसिसनुसार, चीनने क्लीन एनर्जी प्रोजेक्टवर २००५ मध्ये ७.५ अरब डॉलर तर २०१५ मध्ये १०१ अरब डॉलरची गुंतवणूक केली आहे. सध्या दिल्लीसह देशातील आणखीही काही शहरांमध्ये प्रदूषणाचा विळखा वाढला आहे. प्रदूषणावर जागतिक आरोग्य संघटनेचा रिपोर्ट धक्कादायक आहे. WHOच्या रिपोर्टनुसार, गेल्यावर्षी विषारी हवेमुळे भारतात जवळपास १ लाख मुलांचा मृत्यू झाला होता. तर दिल्ली एनसीआरमध्ये प्रदूषणामुळे दरवर्षी साधारण ३० हजार लोकांना आपला जीव गमवावा लागतो. 

टॅग्स :air pollutionवायू प्रदूषणchinaचीन