मार्केटमध्ये IRCTC चे बनावट अ‍ॅप; रेल्वे तिकीट बुकिंग करतेवेळी सावध व्हा, अन्यथा...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2023 11:54 AM2023-08-16T11:54:42+5:302023-08-16T12:01:53+5:30

IRCTC ने लोकांना बनावट अ‍ॅपपासून सावध राहण्याचा सल्ला दिला आहे.

beware fake irctc mobile app know how to check original rail connect application | मार्केटमध्ये IRCTC चे बनावट अ‍ॅप; रेल्वे तिकीट बुकिंग करतेवेळी सावध व्हा, अन्यथा...

मार्केटमध्ये IRCTC चे बनावट अ‍ॅप; रेल्वे तिकीट बुकिंग करतेवेळी सावध व्हा, अन्यथा...

googlenewsNext

नवी दिल्ली : आयआरसीटीसी (IRCTC) म्हणजेच इंडियन रेल्वे कॅटरिंग आणि टुरिझममुळे सर्वसामान्यांना ऑनलाइन तिकीट बुक करणे खूप सोपे झाले आहे. IRCTC चे एक मोबाइल अ‍ॅप देखील आहे, जे लोकांना आपल्या स्मार्टफोनद्वारे रेल्वे तिकीट बुक करण्याची सुविधा देते. मात्र, सध्या IRCTC चे एक बनावट अ‍ॅप देखील सोशल मीडियात दिसून येत आहे, ज्याद्वारे लोकांची फसवणूक होत असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे IRCTC ने लोकांना बनावट अ‍ॅपपासून सावध राहण्याचा सल्ला दिला आहे.

लोकांनी बनावट अ‍ॅपबाबत सावधान राहावे. फसवणूक होण्यापासून किंवा कोणत्याही फसवणुकीपासून स्वतःला वाचवा. तसेच, तुम्ही IRCTC चे ओरिजनल अ‍ॅप देखील ओळखू शकता. याबाबत IRCTC कडून अ‍ॅडव्हायझरी जारी करण्यात आली आहे. IRCTC ने आपल्या अ‍ॅडव्हायझरीत म्हटले आहे की, IRCTC चे बनावट मोबाइल अ‍ॅप लोकांची फसवणूक करण्याच्या उद्देशाने मार्केटमध्ये आले आहे. 

काही फसवणूक करणारे यापेक्षा मोठ्या स्तरावर लोकांना नुकसान पोहोचवणाऱ्या लिंक्स पाठवत आहेत. हे लोक बनावट 'IRCTC Rail Connect' मोबाईल अ‍ॅप डाउनलोड करण्याच्या बहाण्याने लोकांची फसवणूक करत आहेत, असेही अ‍ॅडव्हायझरीमध्ये म्हटले आहे. दरम्यान, IRCTC म्हणणे की ग्राहकांनी IRCTC मोबाईल अ‍ॅप Google च्या Play Store किंवा Apple च्या App Store वरून डाउनलोड करावे. इतर कोणत्याही लिंकवरून अ‍ॅप डाउनलोड केल्याने ग्राहकांचे नुकसान होऊ शकते.

असे तपासावे ओरिजनल अ‍ॅप... 
IRCTC चे ओरिजनल अ‍ॅप ओळखण्यासाठी तुम्हाला Google Play Store किंवा Apple App Store वर जावे लागेल. येथे तुम्हाला IRCTC Rail Connect अ‍ॅप शोधावे लागेल. डाउनलोड करण्यापूर्वी, तुम्ही अ‍ॅपचे डेव्हलपर 'IRCTC ऑफिशियल' आहे का? ते तपासावे. दरम्यान, IRCTC ही भारतीय रेल्वेची एक वेगळी कंपनी आहे. शेअर बाजारात लिस्टेड असलेल्या या सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीकडे रेल्वे तिकिटांचे ऑनलाइन बुकिंग तसेच भारतीय रेल्वेमध्ये खानपान आणि पर्यटन सेवा देण्याची जबाबदारी आहे.

Web Title: beware fake irctc mobile app know how to check original rail connect application

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.