शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
4
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
5
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
6
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
7
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
8
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
9
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
10
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
11
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
12
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
13
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
14
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
15
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
16
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
17
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
18
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
19
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
20
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे

Android Q अँड्रॉइडचं नवं व्हर्जन

By अनिल भापकर | Updated: March 16, 2019 13:37 IST

गुगलला टेक्नोसॅव्ही पिढी कल्पवृक्ष असे म्हणते कारण गुगलकडे जे काही मागाल (अर्थात माहिती )ते तुम्हाला काही क्षणात गुगल देते. आपल्या युझर्सला नेहमी नवनवीन सुविधा देण्यात गुगलचा हात कोणीच धरू शकत नाही.

(Image Credit : Android Community)

अनिल भापकर 

गुगलला टेक्नोसॅव्ही पिढी कल्पवृक्ष असे म्हणते कारण गुगलकडे जे काही मागाल (अर्थात माहिती )ते तुम्हाला काही क्षणात गुगल देते. आपल्या युझर्सला नेहमी नवनवीन सुविधा देण्यात गुगलचा हात कोणीच धरू शकत नाही. जेव्हापासून गुगलने अँड्रॉइडच्या माध्यमातून स्मार्टफोनमध्ये शिरकाव केला तेव्हापासून तर गुगल सर्वसामान्यांच्या सुद्धा ओळखीचे झाले आहे.आजघडीला स्मार्टफोनमध्ये अँड्रॉइडला येऊन जवळपास दहा वर्षाहून अधिक काळ लोटला. या दरम्यान अँड्रॉइडचे अनेक व्हर्जन आली. अँड्रॉइडच्या प्रत्येक नवीन व्हर्जनमध्ये युझर्ससाठी काहीतरी नवीन फीचर्स असतात. त्यामुळे जगभरातील टेक्नोसॅव्ही लोकांमध्ये अँड्रॉइडचे पुढचे व्हर्जन कधी येणार आणि त्याचे नाव काय असणार याविषयी प्रचंड कुतूहल असते. आज जगभरातील बहुतांश स्मार्टफोन हे गुगलच्या अँड्रॉइड या ऑपरेटिंग सिस्टमवर चालतात. गूगल नेहमी अँड्रॉइडच्या व्हर्जन्सची नावं विविध डेझर्ट्सवरून ठेवत असतं उदा. कपकेक, डोनट, फ्रोयो(2.0), जिंजरब्रेड(2.3), हनीकोंब (3.0), आईसक्रीम सँडविच(4.0), जेली बीन(4.1), किटकॅट(4.4), लॉलीपॉप(5.0), मार्शमेलो(6.0), नुगट(7.0), ओरीओ(8.0) ,पाय (९.०) आता नव व्हर्जन म्हणजेच अँड्रॉइड क्यू.

नुकतंच गुगलने डेव्हलपर्स साठी आपले अँड्रॉइड क्यू  बीटा व्हर्जन उपलब्ध करून दिले आहे.तसं पाहिले तर मागील वर्षी आलेले अँड्रॉइड पाय अजूनपर्यंत बऱ्याच लोकांपर्यंत नीटसं पोहोचलेले देखील नाही. तरी देखील गुगलने अँड्रॉइडचे पुढील व्हर्जन अर्थात अँड्रॉइड क्यू चे बीटा व्हर्जन उपलब्ध केले आहे. सध्यातरी फक्त डेव्हलपर्स साठी अँड्रॉइड क्यू उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. जसे यापूर्वीचे अँड्रॉइड पाय अँड्रॉइड नऊ या नावाने देखील ओळखल्या जाते तसेच अँड्रॉइड क्यू अँड्रॉइड दहा या नावाने ओळखल्या जाईल. तरी सुद्धा अँड्रॉइड क्यू मधील क्यू म्हणजे नेमके काय याचा सस्पेन्स अजून कायम आहे. मात्र याचे नाव क्यू वरूनच असेल हे नक्की .सध्यातरी हे व्हर्जन फक्त पिक्सेल फोन्स साठीच उपलब्ध असेल. 

काय असेल अँड्रॉइड क्यू मध्ये 

गुगलच्या अँड्रॉइड क्यू मध्ये काय फीचर्स असतील या विषयी उत्सुकता आहे. मात्र प्राप्त माहितीनुसार यामध्ये प्रायव्हसी सिक्युरिटी बाबत अधिक काम करण्यात आले आहे. जसे कि आता तुमच्या स्मार्टफोन चे लोकेशन एखाद्या ऍप ला कळू द्यायचे कि नाही हे तुम्ही ठरू शकाल. 

किंवा फक्त ते अ‍ॅप चालू असतानाच तुमचे लोकेशन त्यांना कळू शकेल असे हि यात असेल . तसेच तुमच्या स्मार्टफोनचा आयएमईआय नंबर,सिरीयल नंबर यासह तुमची वैयक्तिक माहिती सहज कुणाला उपलब्ध होणार नाही याचीही काळजी यात घेण्यात येणार आहे. तसेच तुमच्या स्मार्टफोन मधील फोटो ,व्हिडीओ तसेच अन्य फाईल्स चा अक्सेस एखाद्या ऍपला द्यायचा किंवा द्यायचा नाही हे ठरविण्याचा अधिकार देखील युझर्सला असणार आहे. अँड्रॉइड क्यू मध्ये फोल्डेबल फोनला सुद्धा सपोर्ट असणार आहे.त्यामुळे युझर्सला मोठ्या स्क्रीनचा फायदा घेता येणार आहे.यासह अजूनही अनेक फीचर्स यात असणार आहेत.

anil.bhapkar@lokmat.com

टॅग्स :Androidअँड्रॉईडMobileमोबाइलSocial Mediaसोशल मीडियाgoogleगुगल