शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

अलर्ट! स्मार्टफोन अपडेट करताय? वेळीच व्हा सावध अन्यथा चोरी होऊ शकतो संपूर्ण डेटा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2021 15:15 IST

Smartphone System Update : सिक्योरिटी रिसर्चर्सने एका नव्या आणि धोकादायक मालवेअरची माहिती दिली असून हा मालवेअर अँड्रॉईड युजर्सला टार्गेट करत असल्याची माहिती मिळत आहे. 

नवी दिल्ली - स्मार्टफोनचा वापर हा मोठ्या प्रमाणात केला जातो. जर तुम्ही अँड्रॉईड स्मार्टफोन युजर असाल आणि तुम्हाला तुमचा फोन अपडेट करायचा असेल तर वेळीच सावध व्हा. सिस्टम अपडेट करण्यावेळी फोनमध्ये व्हायरस येण्याचा धोका आहे. सिक्योरिटी रिसर्चर्सने एका नव्या आणि धोकादायक मालवेअरची माहिती दिली असून हा मालवेअर अँड्रॉईड युजर्सला टार्गेट करत असल्याची माहिती मिळत आहे. 

डेटा चोरी होण्याचा धोका 

रिपोर्टनुसार, सर्वात महत्त्वाची आणि चिंताजनक बाब म्हणजे हा मालवेअर एक सिस्टम अपडेट (System Update) Applications रुपात लपलेला आहे, त्यामुळेच त्याची ओळख होणं थोडं कठीण आहे. हे सिस्टम अपडेट एकदा फोनमध्ये इन्स्टॉल झाल्यानंतर हा व्हायरस अँड्रॉईड फोन आपल्या कंट्रोलमध्ये घेतो. तसेच युजर्सचा डेटा, मेसेजेस आणि फोटोही चोरी होण्याची शक्यता आहे.

संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार, एकदा फोनमध्ये हा मालवेअर आल्यानंतर हॅकर्स ऑडिओ आणि फोन कॉल रेकॉर्ड करू शकतात, फोटो काढू शकतात. Whatsapp मेसेज वाचू शकतात, मेसेज चोरी करू शकतात. तसंच डिफॉल्ट ब्राऊजरचे बुकमार्क आणि सर्चही पाहू शकतात. फोनमधील फाईल्स, कॉन्टॅक्ट नंबर्स, नोटिफिकेशन्स, फोनमध्ये असलेले इन्स्टॉल Apps पाहू शकतात. फोटो, व्हिडीओ चोरी करू शकतात. तसंच जीपीएस लोकेशनही ट्रॅक करू शकतात.

असा करा बचाव

सिस्टम अपडेट नावाचं हे बनावट App गुगल प्ले स्टोरवर उपलब्ध नाही. म्हणजेच जर फोन अपडेट करण्यासाठी तुम्ही गुगल प्ले स्टोरच्या एखाद्या App चा वापर करत असाल, तर घाबरण्याची गरज नाही. तसेच नेहमी फोन अपडेट करताना, फोनमध्ये दिलेल्या सिस्टम अपडेट सेटिंग्जमध्ये जाऊनच स्मार्टफोन अपडेट करा. सिस्टम अपडेटसाठी कोणत्याही बाहेरच्या, थर्ड पार्टी Appचा वापर करू नका. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

अरे व्वा! ...तर 5G सारखा होईल तुमच्या 4G इंटरनेटचा स्पीड; जाणून घ्या नेमकं कसं? 

स्मार्टफोन युजर्सच्या संख्येत मोठी वाढ होत तर दुसरीकडे स्मार्टफोनवर डेटाचा वापर करण्यासाठी कंपन्या एका पेक्षा एक जबरदस्त डेटा प्लॅन्स ऑफर करत आहेत. तसेच युजर्सना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी आणि आपल्या नेटवर्कला मजबूत करण्यासाठी कंपन्या अनेक प्रोजेक्ट्सवर काम करत आहेत. अनेक कंपन्या आपल्या स्मार्टफोनला 4G VoLTE सपोर्टसह लाँच करत आहेत. मात्र तरीही काही ठिकाणी नेटवर्कची समस्या वाढते आहे. त्यामुळे इंटरनेट स्पीडमध्ये काम करत नाही. इंटरनेट स्पीड कमी असल्याची अनेकांची तक्रार असते. मात्र काही सोप्या पद्धतीने फोनचा इंटरनेट स्पीड वाढवता येतो.

टेक, गॅजेटच्या लेटेस्ट बातम्यांसाठी इथे क्लिक करा....

https://www.lokmat.com/tech/

 

टॅग्स :Smartphoneस्मार्टफोनtechnologyतंत्रज्ञान