BGMI खेळून 6 लाख मिळवण्याची संधी; Battlegrounds Mobile India 'लाँच पार्टी' इव्हेंट उद्यापासून सुरु 

By सिद्धेश जाधव | Updated: July 7, 2021 19:01 IST2021-07-07T19:00:45+5:302021-07-07T19:01:41+5:30

BGMI लाँच पार्टी इव्हेंट दोन दिवस चालणार असून यात 18 संघ सहभागी होतील, यातून जिंकणाऱ्या संघाला 6 लाख रुपयांचे बक्षीस देण्यात येईल.  

Battlegrounds mobile india launch party event will put 18 teams head to head for rs 6 lakh prize  | BGMI खेळून 6 लाख मिळवण्याची संधी; Battlegrounds Mobile India 'लाँच पार्टी' इव्हेंट उद्यापासून सुरु 

BGMI खेळून 6 लाख मिळवण्याची संधी; Battlegrounds Mobile India 'लाँच पार्टी' इव्हेंट उद्यापासून सुरु 

Battlegrounds Mobile India ने देशात 8 जुलै ते 9 जुलै दरम्यान लाँच पार्टीचे आयोजन केले आहे. डेव्हलपर Krafton ने अधिकृत यूट्यूब चॅनेलवरून या इव्हेंटचा एक टीजर व्हिडीओ शेयर केला आहे. दोन दिवसांच्या या इव्हेंटमध्ये 18 संघ सहभागी होतील, यातून जिंकणाऱ्या संघाला 6 लाख रुपयांचे बक्षीस देण्यात येईल.  

गेल्याच आठवड्यात बॅटलग्राउंड मोबाईल इंडियाने भारतात पुनरागमन केले आहे. हा गेम 2 जुलै रोजी भारतात अधिकृतपणे लाँच करण्यात आला आहे. या लाँचच्या निमित्ताने Krafton ने दोन दिवसांच्या लाँच पार्टीचे आयोजन केले आहे. हा इव्हेंट 8 जुलै ते 9 जुलै दरम्यान आयोजित केला जाईल. या इव्हेंटमध्ये 18 संघ सहभागी होतील, विजेत्या संघाला 6 लाख रुपये जिंकण्याची संधी आहे.  

सहभागी संघांमध्ये Dynamo, Mortal, K18, Kronten, Godnixon, Ghatak, Shreeman Legend, Maxtern, Bandookbaz, Clash Universe इत्यादी प्रसिद्ध स्ट्रीमर्सचा समावेश आहे. तुम्ही या संघांमध्ये होणारे सामने Battlegrounds Mobile India च्या फेसबुक आणि यूट्यूब चॅनेलवरून बघू शकता. हे सामने किती वाचता सुरु केले जातील याची माहिती मात्र Krafton ने अजूनतरी दिलेली नाही. लवकरच ही माहिती समोर येईल अशी अपेक्षा आहे.  

Web Title: Battlegrounds mobile india launch party event will put 18 teams head to head for rs 6 lakh prize 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.