TikTok प्रेमींसाठी 'बॅड न्यूज'; मद्रास उच्च न्यायालयाकडून बंदीचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2019 02:04 PM2019-04-04T14:04:38+5:302019-04-04T14:06:00+5:30

TikTok हे एक चीनचे अ‍ॅप असून आक्षेपार्ह व्हिडिओंना प्रोत्साहन देत असल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.

'Bad News' for TikTok Lovers; Madras High Court orders ban | TikTok प्रेमींसाठी 'बॅड न्यूज'; मद्रास उच्च न्यायालयाकडून बंदीचे आदेश

TikTok प्रेमींसाठी 'बॅड न्यूज'; मद्रास उच्च न्यायालयाकडून बंदीचे आदेश

Next

नवी दिल्ली : कमी काळात कमालीचे लोकप्रिय ठरलेले चायनीज अॅप टीकटॉक (TikTok) ला मोठा झटका बसला आहे. मद्रास उच्च न्यायालयाने सरकारला टीकटॉकवर बंदी आणण्याचे आदेश दिले आहेत. 


TikTok हे एक चीनचे अ‍ॅप असून आक्षेपार्ह व्हिडिओंना प्रोत्साहन देत असल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. मद्रास उच्च न्यायालयात टीकटॉकविरोधात एक याचिक दाखल करण्य़ात आली होती. यामध्ये म्हटले होते की, जी मुले या अ‍ॅपचा वापर करतात, ती यौन उत्पिडनसंबंधी व्यक्तींच्या संपर्कात आरामात येऊ शकतात. असे बरेच व्हिडिओ TikTokवर व्हायरल होत आहेत. ही बाब न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आली. यानंतर न्यायालयाने आक्षेपार्ह व्हिडिओंमुळे TikTok चा वापर करणे धोक्यापेक्षा कमी नसल्याचे म्हटले आहे. 


TikTok हे अ‍ॅप बिजिंगची कंपनीने बनविले आहे. यावर युजर आपले छोटे-छोटे व्हिडिओ बनवून शेअर करू शकतात. भारतात हे अ‍ॅप खूपच लोकप्रिय झाले आहे. या अ‍ॅपद्वारे बॉलिवूडचे डायलॉग, जोक्सवर युजर व्हिडिओ बनवितात. तसेच लिप-सिंकसह लोकप्रिय संगितावर डान्सचेही व्हिडिओ टाकले जातात. 


फेब्रुवारीमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना तामिळनाडूच्या माहिती प्रसारण मंत्र्यांनी सांगितलेले की या अ‍ॅपवर काही कंटेंट पाहण्यालायक नसतो. भाजपाशी संबंधीत एका संघटनेनेही या अ‍ॅपवर बंदी आणण्याची मागणी केली होती. याच्या उलट भाजपाच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालविय यांनी सांगितलेले की, पक्षाने काही TikTok व्हिडिओ पाहिले, हा चांगला क्रिएटीव्ह प्लॅटफॉर्म आहे.

Web Title: 'Bad News' for TikTok Lovers; Madras High Court orders ban

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.