शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

मार्क झुकरबर्गच्या तीन वाईट सवयी ज्यामुळे लोक Facebook सोडताहेत; तज्ज्ञांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2022 15:01 IST

हार्वर्ड युनिव्हर्सिटीचे फेलो बिल जॉर्ज यांनी 'मेटा'चे सीईओ मार्क झुकरबर्ग यांच्यावर मोठे आरोप केले आहेत.

हार्वर्ड युनिव्हर्सिटीचे फेलो बिल जॉर्ज यांनी 'मेटा'चे सीईओ मार्क झुकरबर्ग यांच्यावर मोठे आरोप केले आहेत. जॉर्ज यांच्या दाव्यानुसार कामाच्या ठिकाणी तुम्हाला बॉसच्या पाच वाईट सवयी आढळतील आणि झुकरबर्ग त्यापैकी एक बॉस आहे. ते म्हणाले की झुकरबर्गकडे नेतृत्व क्षमता कमी आहे आणि तो वारंवार आपल्या निर्णयांनी META ला डबघाईला आणण्याचं काम करत आहे. झुकरबर्गमुळे लोक कंपनी सोडत आहेत. जॉर्जच्या म्हणण्यानुसार, जोपर्यंत झुकरबर्ग 'मेटा'चा सीईओ राहील तोपर्यंत कंपनी अपयशी ठरत राहील.

हार्वर्ड फेल आणि मेडिकल टेक्नोलॉजी कंपनी Medtronic चे माजी सीईओ जॉर्ज यांच्या दाव्यानुसार META यापुढील काळातही अपयशीच ठरत राहील. "मला वाटतं जोपर्यंत मार्क झुकरबर्ग मेटामध्ये सीईओ आहे तोपर्यंत फेसबुक चांगलं काम करू शकणार नाही. लोकांचा कंपनीबद्दल भ्रमनिरास होण्यामागे झुकरबर्ग हेच एक कारण आहे. तो खरोखरच भरकटला आहे'', असं बिल जॉर्ज यांनी त्यांच्या True North: Leading Authentically in Today's Workplace, Emerging Leader Edition या पुस्तकात म्हटलं आहे.

1. Rationalizing Mistakes: चुका मान्य न करणेकामापेक्षा स्टाईलवर जास्त भर देणारे कर्मचारी मार्क झुकरबर्ग कामावर ठेवतात, असा आरोप जॉर्ज यांनी केला आहे. तसंच तो चुकांची जबाबदारी घेऊन तो त्याच्यातून शिकण्याचा प्रयत्न करत नाही. उदाहरण देताना, जॉर्ज यांनी एक गोष्ट निदर्शनास आणून दिली. जेव्हा 'मेटा'ने बाजार मूल्य फेब्रुवारीमध्ये 232 अब्ज डॉलरपेक्षा जास्त गमावलं तेव्हा झुकरबर्गने या अपयशाचं खापर अॅपलच्या गोपनीयतेवर आणि टिकटॉक सारख्या प्लॅटफॉर्मच्या आव्हानांवर फोडलं.

2. Resistant to Counsel: सल्ला घेण्यास नकार देणेझुकरबर्गची एक विशेष गोष्ट म्हणजे तो एकटं राहणं पसंत करतो आणि इतरांचा सल्ला घेण्यास नकार देतो. त्याच्यावर कुणी टीका केली किंवा प्रतिक्रिया दिली तरी तो ती सकारात्मकतेनं घेत नाही, असंही जॉर्ज यांनी म्हटलं आहे. तसंच  त्याच्या जवळच्या व्यक्तीनं उद्भवणाऱ्या धोक्यांचा इशारा दिला तरी तो त्याकडे दुर्लक्ष करतो, असंही त्यांनी नमूद केलं आहे. उदाहरणार्थ, रॉजर मैनामी या फेसबुकच्या सुरुवातीच्या गुंतवणूकदारानं त्याला Facebook वर डेटा गोळा करण्याबद्दल आणि लोकांना टार्गेट करण्याबद्दल इशारा दिला होता. तेव्हा झुकरबर्गनं त्यांचं ऐकलं नाही. 

3. Glory Seeker: ग्राहकांपेक्षा नफ्याला प्राधान्य देणेजॉर्ज यांच्या म्हणण्यानुसार, झुकरबर्गची आणखी एक वाईट सवय आहे, ज्यामुळे कंपनीचं नुकसान होत आहे. तो संपत्तीच्या मागे धावणारा व्यक्ती आहे. तो त्याच्या ग्राहकांपेक्षा वाढ आणि नफा याला प्राधान्य देतो. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये वॉल स्ट्रीट जर्नलने केलेल्या तपासणीत इन्स्टाग्राम या 'मेटा'च्याच सोशल मीडिया अॅपमधून मुलींना मानसिक त्रास होत असल्याचं आढळून आलं. मात्र, कंपनीने हे आरोप फेटाळून लावले आहेत. कंपन्यांनी अशा समस्या सोडवण्यास सुरुवात केली असताना, कंपनीनं नैतिक जबाबदारी टाळली आहे.

टॅग्स :Mark Zuckerbergमार्क झुकेरबर्गFacebookफेसबुक