शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
2
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
3
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात
4
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
5
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
6
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
7
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
8
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
9
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
10
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
11
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
12
दहशतवाद्यांवर २० लाखांचे बक्षीस, दोन संशयित दहशतवाद्यांची रेखाचित्रे जारी; शेकडो जवानांकडून शोधमोहीम
13
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
14
साधनसंपत्ती तरीही लोक राहिले गरिब; ओडिशात पंतप्रधान माेदींचा हल्लाबाेल
15
कोणत्या भागातून किती लीड मिळते, त्यावर महापालिकेसाठी उमेदवार ठरविले जातील
16
गृहकर्ज थकबाकी वाढली १० लाख कोटी रुपयांनी; रिझर्व्ह बँकेच्या अहवालातून उघडकीस
17
मराठी मते भाजपच्या पारड्यात की काँग्रेसच्या? दोन्ही उमेदवारांना लोकसभा निवडणूक लढवण्याचा अनुभव नाही
18
रशिया अण्वस्त्रांसह लष्करी सराव करणार; अमेरिकेसह पश्चिमी देशांना दिला इशारा
19
न होणाऱ्या प्रवासाची तिकिटे विकली प्रवाशांना; विमान कंपनीला ७.९ कोटी डॉलरचा दंड
20
ऑर्डर्स वाढल्या, नोकऱ्या मिळाल्या; सेवा क्षेत्रात तेजीचा १४ वर्षांचा उच्चांक, खासगी क्षेत्राचाही विस्तार

Asus ZenFone 8 आणि ZenFone 8 Flip भारतीय लाँचसाठी सज्ज; कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिली माहिती

By सिद्धेश जाधव | Published: July 20, 2021 5:30 PM

ASUS ZenFone 8 series India: असूस Zenfone 8 आणि Zenfone 8 Flip या स्मार्टफोन्सचा भारतीय लाँच समीप असल्याची माहिती आसूस इंडिया बिजनेस हेड दिनेश शर्मा यांनी दिली आहे.

यावर्षी मे मध्ये ASUS ने जागतिक बाजारात आपले दोन दमदार स्मार्टफोन्स लाँच केले होते. हे दोन स्मार्टफोन्स Asus ZenFone 8 आणि Asus ZenFone 8 Flip टेक मंचावर सादर करण्यात आले होते. तेव्हाच हे स्मार्टफोन्स भारतात येणार होते परंतु कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे या फोन्सचा भारतीय लाँच पुढे ढकलण्यात आला. आता समोर आलेल्या नवीन रिपोर्टनुसार, असूस लवकरच भारतात आपले हे दोन्ही शक्तिशाली फोन लाँच करणार आहे.  

इंडिया टुडेला आसूस इंडियाचे बिजनेस हेड दिनेश शर्मा यांनी ZenFone 8 आणि ZenFone 8 Flip च्या लाँचची माहिती एका मुलाखतीत दिली आहे. असूस Zenfone 8 आणि Zenfone 8 Flip या स्मार्टफोन्सचा भारतीय लाँच समीप आहे. कंपनी लॉजिस्टिक संबंधित गोष्टींचे निरीक्षण करत आहे आणि एकदा त्या गोष्टी ठरल्या कि कंपनी त्वरित Zenfone 8 series च्या लाँच डेटची घोषणा करेल, अशी माहिती दिनेश शर्मा यांनी दिली आहे.  

ASUS ZenFone 8 स्पेसिफिकेशन्स   

ASUS ZenFone 8 स्मार्टफोनमध्ये 5.9 इंचाचा फुल एचडी+ अ‍ॅमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. फोनमध्ये Snapdragon 888 5G SoC सह Adreno 660 GPU देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन 16GB पर्यंतच्या रॅम आणि 256GB स्टोरेजला सपोर्ट करतो. फोन Android 11 वर आधारित ZenUI 8 कस्टम स्किन वर चालतो. ZenFone 8 मधील ड्युअल कॅमेरा सेटअपमध्ये 64MP चा मुख्य कॅमेरा आणि 12MP चा अल्टा-वाईड अँगल सेन्सर देण्यात आला आहे. हा आसुस फोन 12MP च्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. या फोनमध्ये 4,000mAh ची बॅटरी 30W फास्ट चार्ज सपोर्टसह देण्यात आली आहे.   

ASUS ZenFone 8 Flip चे स्पेसिफिकेशन्स  

ASUS ZenFone 8 Flip मध्ये 6.67 इंचाचा फुल एचडी+ अ‍ॅमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. या फोनमध्ये Snapdragon 888 5G SoC सह Adreno 660 GPU मिळतो. हा 12GB रॅम आणि 256GB स्टोरेजला सपोर्ट करतो. या फोनमध्ये Android 11 आधारित ZenUI 8 आहे. ZenFone 8 Flip मध्ये फ्लिप कॅमेरा मोड्यूलवर ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात 64MP चा मुख्य सेन्सर OIS सपोर्टसह देण्यात आला आहे. त्याचबरोबर 12 मेगापिक्सलची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि 8MP टेलीफोटो कॅमेरा मिळतो. या फोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आहे. ASUS ZenFone 8 Flip मध्ये 5,000mAh ची बॅटरी आणि 30W फास्ट चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे. 

टॅग्स :Asus Phoneअसूस मोबाइलtechnologyतंत्रज्ञानAndroidअँड्रॉईडSmartphoneस्मार्टफोन