शहरं
Join us  
Trending Stories
1
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
2
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
3
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
4
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
5
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
6
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
7
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
8
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
9
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

Asus 8Z Price In India: छोटा पॅकेट बडा धमाका! 8GB रॅम आणि 64MP कॅमेऱ्यासह धुमाकूळ घालण्यासाठी आला ‘हा’ 5G Smartphone 

By सिद्धेश जाधव | Published: February 28, 2022 4:24 PM

Asus 8Z Price In India: Asus 8Z भारतात 64MP कॅमेरा, 8GB RAM  120Hz रिफ्रेश रेट आणि 4000mAh बॅटरीसह उतरवण्यात आला आहे.

Asus नं आपला नवीन ASUS 8Z अखेरीस भारतात सादर केला आहे. हा फोन गेल्यावर्षी मे महिन्यात जागतिक बाजारात लाँच झाला आहे. परंतु कोरोना काळ असल्यामुळे कंपनीनं अनेकदा या मोबाईलचा लाँच पुढे ढकलला होता. हा एक कॉम्पॅक्ट डिजाइन असलेला फ्लॅगशिप स्मार्टफोन आहे. ज्यात 64MP कॅमेरा, 8GB RAM  120Hz रिफ्रेश रेट आणि 4000mAh ची बॅटरी मिळते.  

Asus 8Z Price In India 

ASUS 8Z चा एकच भारतीयांच्या भेटीला आला आहे. कंपनीनं या फोनची किंमत 42,999 रुपये ठेवली आहे. ज्यात 8GB RAM आणि 128GB इंटरनल स्टोरेज मिळते. हा फोन फ्लिपकार्टवरून 7 मार्चपासून विकत घेता येईल. या स्मार्टफोनचे Black आणि Silver कलर ऑप्शन उपलब्ध होतील.  

Asus 8Z स्पेसिफिकेशन्स  

Asus 8Z स्मार्टफोनमध्ये 5.9 इंचाचा फुल एचडी+ अ‍ॅमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. जो HDR10, 120Hz रिफ्रेश रेट, 240Hz टच सॅम्पलिंग रेट आणि 1100nits ब्राईटनेसला सपोर्ट करतो. 20:9 आसपेक्ट रेश्यो असलेल्या डिस्प्लेला गोरिल्ला ग्लास विक्ट्सची सुरक्षा देण्यात आली आहे. तसेच IP68 पाणी आणि धुळीपासून संरक्षण करते. 

फोनमध्ये Qualcomm Snapdragon 888 5G SoC सह Adreno 660 GPU देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन 8GB रॅम आणि 128GB UFS 3.1 स्टोरेजला सपोर्ट करतो. ही स्टोरेज मेमरी कार्डनं वाढवता येते. फोन Android 11 वर आधारित ZenUI 8 कस्टम स्किनवर चालतो. बेसिक कनेक्टिव्हिटी फीचर्ससह सिक्योरिटीसाठी इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे.  

Asus 8Z मधील ड्युअल कॅमेरा सेटअपमध्ये ओआयएस 64MP चा मुख्य Sony IMX686 सेन्सर देण्यात आला आहे. सोबत 12MP चा अल्टा-वाईड अँगल सेन्सर देण्यात आला आहे. हा आसुस फोन 12MP च्या Sony IMX663 फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. या फोनमध्ये 4,000mAh ची बॅटरी 30W फास्ट चार्ज सपोर्टसह देण्यात आली आहे. 

हे देखील वाचा:

टॅग्स :Asus Phoneअसूस मोबाइलSmartphoneस्मार्टफोनAndroidअँड्रॉईडtechnologyतंत्रज्ञान