शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
2
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
3
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
4
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
5
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
6
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
7
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
8
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
9
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
10
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
11
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
12
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
13
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
14
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
15
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
16
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
17
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
18
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
19
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
20
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा

नव्याचे नऊ दिवस; स्वदेशी Arattai ची लोकप्रियता घटली; टॉप 100 Apps च्या यादीतून बाहेर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2025 11:53 IST

Arattai App Ranking: Arattai ची लोकप्रियता कमी झाल्याने Zoho ला मोठा धक्का बसला आहे.

Arattai App Ranking: 'नव्याचे नऊ दिवस' अशी मराठीत म्हण आहे. ही म्हण Atattai ला तंतोतत लागू होते. व्हॉट्सअ‍ॅपला टक्कर देण्यासाठी आलेले भारतीय मेसेजिंग अ‍ॅप Arattai च्या लोकप्रियतेत मोठी घसरण झाली आहे. काही महिन्यांपूर्वी झपाट्याने लोकप्रिय झालेले अ‍ॅप आता Google Play Store आणि Apple App Store या दोन्ही ठिकाणी टॉप 100 अ‍ॅप्सच्या यादीतून बाहेर झाले आहे.

सुरुवातीला "आत्मनिर्भर भारत" उपक्रमामुळे आणि स्थानिक उत्पादने वापरण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनामुळे Arattai ला चांगला प्रतिसाद मिळाला होता. पण आता या अ‍ॅपची लोकप्रियता सतत घसरताना दिसत आहे.

झोहोसाठी मोठा धक्का

हे अ‍ॅप तयार करणारी कंपनी Zoho Corporation साठी ही घसरण मोठा धक्का मानली जात आहे. Arattai ला व्हॉट्सअ‍ॅप आणि टेलिग्रामसारख्या जागतिक दर्जाच्या मेसेजिंग अ‍ॅप्सना स्पर्धा द्यायची होती, परंतु सध्याच्या परिस्थितीत ते आव्हान टिकवणे कठीण झाले आहे.

प्रायव्हसीचा प्रश्न आणि तांत्रिक मर्यादा

युजर्समध्ये या अ‍ॅपच्या गोपनीयतेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. कारण सध्या Arattai मध्ये व्हॉट्सअ‍ॅपसारखे एंड-टू-एंड एन्क्रिप्शन उपलब्ध नाही. कंपनीने सांगितले आहे की, ते या फीचरवर काम करत आहेत, मात्र सध्या हे फिचर नसणे, हेच रँकिंग घसरण्याचे एक प्रमुख कारण ठरत आहे.

Google Play Store रँकिंग

गूगल प्ले स्टोअरवरील "टॉप चार्ट्स" मध्ये Arattai ची रँकिंग टॉप 100 मधून घसरून आता 110 व्या स्थानावर पोहोचली आहे. तर "कम्युनिकेशन" श्रेणीत हे अ‍ॅप सातव्या क्रमांकावर आले आहे.

Apple App Store रँकिंग

Apple App Store मध्येही परिस्थिती काही वेगळी नाही. येथे Arattai 123 व्या क्रमांकावर पोहोचले आहे, तर "सोशल नेटवर्किंग" श्रेणीत त्याचे स्थान आठव्या क्रमांकावर घसरले आहे.

भविष्यातील अपेक्षा

तज्ञांचे मत आहे की, जर कंपनीने लवकरच एंड-टू-एंड एन्क्रिप्शनसारख्या सुरक्षा सुविधा अ‍ॅपमध्ये आणल्या, तर Arattai ची रँकिंग आणि लोकप्रियता पुन्हा वाढू शकते. सध्या मात्र युजर्सचा विश्वास परत मिळवणे झोहोसमोरचे सर्वात मोठे आव्हान आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Arattai App's Popularity Plummets, Exits Top 100 Apps List

Web Summary : Indian messaging app Arattai, once a WhatsApp competitor, has seen a significant decline in popularity. It has fallen out of the top 100 apps on both Google Play Store and Apple App Store due to privacy concerns and technical limitations, posing a challenge for Zoho.
टॅग्स :technologyतंत्रज्ञानWhatsAppव्हॉट्सअ‍ॅपIndiaभारतNarendra Modiनरेंद्र मोदी