शहरं
Join us  
Trending Stories
1
मल्लिकार्जुन खर्गे यांच्या RSS वर बंदी घालण्याच्या मागणीवर अमित शाह यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले
2
एक काेटी वाहनांना नाही ‘हाय सिक्युरिटी नंबरप्लेट’! एकूण ६८.२४ लाख चालकांनी दिला प्रतिसाद
3
इस रात की सुबह नही ! मुंबईतील 'ओलीस नाट्य' म्हणजे आभासी वेडेपणाचे भेसूर प्रतिबिंब
4
कसली थंडी..? आता अनुभवा ‘नोव्हेंबर हीट’! मुंबईसह राज्यभरात अवकाळी पावसाचीही शक्यता
5
दुलारचंद यादव हत्याकांड: नाट्यमय घडामोडींनंतर अनंत सिंह यांना अटक, रात्री पोहोचले पोलीस, त्यानंतर...
6
आजचे राशीभविष्य, ०२ नोव्हेंबर २०२५: हाती पैसा, यश-कीर्ती लाभेल; पण हट्टीपणा सोडावा
7
महिला वर्ल्डकप: आज घडणार इतिहास; प्रथमच जिंकेल भारत किंवा दक्षिण आफ्रिका; उत्सुकता शिगेला
8
कुष्ठरोगाचे निदान झाले रे झाले की, रुग्णनाेंद बंधनकारक; सार्वजनिक आरोग्य विभागाचा निर्णय
9
आयोगाचा सर्व्हर कुणाच्या कार्यालयात? कुणाची नावे काढायची, कुठली टाकायची हा कट सुरू: ठाकरे
10
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभच लाभ, पद-पैसा वाढ; ६ राशींना काहीसा ताप, तुमची रास कोणती?
11
चार हजार ग्राहकांनी वाढवली २२ मेगावॅट क्षमता; २ हजार ४६० औद्योगिक ग्राहकांचाही समावेश
12
मूक आंदोलन करून भाजपने केला पलटवार! ...हा तर मविआचा नवा कट- रवींद्र चव्हाण
13
जय हरी विठ्ठल.. एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक केली विठ्ठल-रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
14
दुबार मतदार दिसताच बडवा; मविआ-मनसेचा महाएल्गार! मतदार यादीतील घोळाबाबत मुंबईत निषेध मोर्चा
15
गाव पोटा.. व्यवसाय शेती अन् वालेगावकर दाम्पत्याला मिळाला उपमुख्यमंत्र्यांसोबत महापूजेचा मान
16
‘तुमच्या विमानात आज १९८४ मद्रास स्टाईल बॉम्ब अटॅक होणार आहे’; मुंबईत इमर्जन्सी लँडिंग
17
२४ मोबाईल खेचणाऱ्या दोन आरोपींना अटक; आचोळेच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांची कामगिरी
18
ठेकेदारांचे कामबंद, हिवाळी अधिवेशन नागपूर की मुंबईत? बांधकाम खाते संभ्रमात
19
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
20
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा

iPhone 14 सिरीजच्या विक्रीआधीच अ‍ॅपलची वेबसाईट हँग झाली; ग्राहक वैतागले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2022 11:34 IST

अॅपल कंपनीची वेबसाईट क्रॅश झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

दिग्गज टेक कंपनी अ‍ॅपलची वेबसाईट हँग झाल्याचा अनुभव जगभरातील युजर्सना येत आहे. भारतासह अनेक देशांमध्ये अ‍ॅपलची वेबसाईट ओपन करण्यास समस्या येत आहे. वेबसाईट ओपन होताना खूप वेळ लागत आहे, परंतू सर्व कंटेंट लोड होत नाहीय. 

अनेकांना 403 forbidden errors हा एरर दिसत आहे. कंपनीने नुकतेच आयफोन १४ सिरीज, अ‍ॅपल वॉच सिरीज ८ आणि AirPods Pro 2 सह अनेक उत्पादने लाँच केली होती. आयफोनची लेटेस्ट रेंज उद्यापासून म्हणजेच १६ सप्टेंबरपासून विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. त्यापूर्वीच कंपनीची वेबसाईट क्रॅश झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. अ‍ॅपलने अद्याप यावर काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही. 

काही वेळापूर्वी अ‍ॅपल स्टोअरचा सर्व्हरही काही भागात डाऊन झाला होता. आयफोन 14 मालिकेची प्री-ऑर्डर सुरू होताच ही समस्या उद्भवली होती. त्यावेळी ग्राहक चेकआउट किंवा ट्रेड-इन प्रक्रिया पूर्ण करू शकले नाहीत. डाउन डिटेक्टरच्या मते, जगभरातील अनेक भागातील लोकांना Apple वेबसाइटवर जाण्यास समस्या येत आहेत. ही समस्या ऍपल वेबसाइटच्या सर्व पेजेसवर येत नसून निवडक पेजेसवरच येत आहे. 

iPhone 14, iPhone 14 Plus, iPhone 14 Pro आणि iPhone 14 Pro Max हे आयफोन उद्यापासून विक्रीला उपलब्ध होणार आहेत. जर तुम्ही आयफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही जुन्या मॉडेल्सचा विचार करू शकता. आयफोन 13 सिरीज आणि इतर मॉडेल्सवर ऑफर मिळत आहेत. फ्लिपकार्टवरील सेलमध्ये, तुम्ही आयफोन १३ हँडसेट आतापर्यंतच्या सर्वात कमी किमतीत खरेदी करू शकणार आहात. हा फोन 50 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत हा फोन डिस्काउंटसह उपलब्ध होण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :Apple Incअॅपल