शहरं
Join us  
Trending Stories
1
Phaltan Doctor Death: रिलेशनशिप, भांडणं, प्रशांतला डेंग्यू झाल्याने पुन्हा आले एकत्र; कॉल्स, मेसेजचे स्क्रीनशॉट्स पोलिसांकडे
2
"फलटणच्या घटनेत माजी खासदाराला मुख्यमंत्र्यांकडून क्लिन चिट म्हणजे कटात सहभाग असल्याचा पुरावाच’’, काँग्रेसचा आरोप 
3
श्रेयस अय्यरला झालेली दुखापत किती गंभीर, आता कशी आहे प्रकृती? बीसीसीआयने दिली महत्त्वाची माहिती
4
युक्रेनचा रशियावर मोठा ड्रोन हल्ला! १९३ ड्रोनमधून गोळीबार, मॉस्कोतील दोन विमानतळ बंद
5
'वॉशिंग्टन पोस्ट'चा अहवाल LIC ने फेटाळला; अदानी समूहात फक्त ४% गुंतवणूक, मग सर्वाधिक पैसा कुठे?
6
Mid-Size SUV: २० लाखांपेक्षा कमी बजेटमध्ये घरी आणा 'या' ५ जबरदस्त मिड- साइज एसयूव्ही कार!
7
Video: घरात अन् महाराष्ट्रात जिथं असाल तिथे मराठीत बोला, नाहीतर...; अजित पवारांचं आवाहन
8
डॉक्टर महिलेच्या हातावरील हस्ताक्षर तिचे नाही, बहिणीने सांगितले...; धनंजय मुंडेंच्या दाव्याने खळबळ
9
८ वर्षाचं नातं क्षणातच विसरली, पत्नीनं केलेल्या कांडामुळे पती झाला शॉक; चिठ्ठी लिहिली अन्...
10
MCX वर आपटले होते, पण सराफा बाजारात सोन्या-चांदीचे दर वाढले, खरेदी करणार असाल तर पाहा लेटेस्ट रेट
11
Mumbai Crime: "शेवटचे दिवस जवळ आलेत", भावेश शिंदे घरातून बाहेर पडला आणि मुंबई लोकलखाली संपवले आयुष्य
12
Desi Jugaad: तरुणांची चपाती फुगवण्याची सीक्रेट ट्रिक व्हायरल; व्हिडीओ पाहून महिलांची उडेल झोप!
13
निष्काळजीपणाचा कळस! रुग्णालयात महिलेला लावलं एक्सपायर्ड ग्लुकोज, तोंडातून फेस आला अन्...
14
बिहार निवडणुकीच्या रणधुमाळीतच भाजपची मोठी कारवाई, चार नेत्यांची पक्षातून हकालपट्टी; करण्यात आले गंभीर आरोप
15
तिकडे ट्रम्प टॅरिफ-टॅरिफ करत बसले, इकडे भारताने मोठा धक्का दिला; चीनच्या सोबतीने तगडा फायदा झाला!
16
“महायुतीचे शेतकरी पॅकेज थोतांड, कर्जमाफी करावी; राज्य दिवाळखोरीत काढले”: हर्षवर्धन सपकाळ
17
EPF खातेधारकांना मोठी भेट! 'फ्री'मध्ये मिळतोय ₹७ लाखांपर्यंतचा जीवन विमा; कुटुंबाला मिळेल मोठा आधार
18
२० वर्षीय भारतीय तरुणीवर ब्रिटनमध्ये बलात्कार, आरोपी सीसीटीव्हीमध्ये कैद; वर्णद्वेषातून कृत्य
19
भारताच्या 'या' राज्यांवर बांगलादेशची नजर; युनूस यांनी पाकिस्तानला सोपवला वादग्रस्त नकाशा

Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2025 23:25 IST

Apple WWDC 2025 Marathi Live: अ‍ॅपलने लिक्विड ग्लास डिझाईनची घोषणा केली आहे. तसेच अ‍ॅपल वॉलेटसह नवीन युआय आणणार असल्याचेही संकेत कंपनीने दिले आहेत. 

जगातील सर्वात मोठी प्रिमिअम स्मार्टफोन कंपनी अ‍ॅपलने दरवर्षीप्रमाणे यंदाचा Apple WWDC 2025 ला सुरुवात केली आहे. यावेळी अ‍ॅपलने लिक्विड ग्लास डिझाईनची घोषणा केली आहे. तसेच अ‍ॅपल वॉलेटसह नवीन युआय आणणार असल्याचेही संकेत कंपनीने दिले आहेत. 

दर्जेदार कंटेंट प्रदान करण्याच्या बाबतीत AppleTV अव्वल स्थानावर असल्याचा दावा टिम कुक यांनी केला. Apple Intelligence वर समर्थित भाषांची संख्या वाढवण्यात आल्याचेही ते म्हणाले. याचबरोबर अ‍ॅपलने ओएसचे व्हर्जन बदलले आहे. iOS, WatchOS सह इतर ऑपरेटिंग सिस्टमची नावे बदलून iOS26, WatchOS 26, tvOS26, MacOS26, VisionOS26, iPadOS 26 अशी केली आहेत. आयओएस 18 नंतर ही थेट २६ वर उडी मारलेली आहे. 

काय काय असणार नवे...सफारी ब्राउझरमध्ये एक नवीन टॅब बार सादर करण्यात आला आहे. स्क्रीनवर संपूर्ण वेब पेज दिसेल, सर्च बार देखील येईल आणि फेसटाइमचा लूक देखील बदलण्यात आला आहे. 

कॅमेरा अ‍ॅपमध्ये मोठे बदल दिसतील. एका क्लिकवर त्यांच्यासमोर व्हिडीओ, फोटोचे पर्याय येणार आहेत. 

अ‍ॅपल इंटेलिजेंसमध्ये लाईव्ह ट्रान्सलेशन फीचर एकत्रित केले जात आहे. ते टेक्स्ट आणि ऑडिओ ट्रान्सलेशनला सपोर्ट करेल. व्हिडीओ कॉलमध्ये देखील वापरता येणार आहे. कॉल दरम्यान लाईव्ह ट्रान्सलेशनचा ऑडिओ देखील ऐकू येईल. आयमेसेज अ‍ॅपमध्ये चॅट दरम्यान मेसेजेसचे भाषांतर करण्यास सक्षम असणार आहे. 

फोन अ‍ॅप देखील अपडेट करण्यात आले असून AI तुमच्यासाठी कॉल तुमच्या ओळखीच्या व्यक्तीचा आहे की दुसऱ्याचा हे सांगणार आहे. व्हॉइस मेलसाठी AI समरी हे वैशिष्ट्य देण्यात आले आहे. म्युझिक अ‍ॅपमध्ये लिरिक्स ट्रान्सलेशन फीचर उपलब्ध केले जाणार आहे. 

अ‍ॅपलने गेम्स अ‍ॅप देखील सादर केले आहे. तुम्ही जे गेम सारखे खेळता ते दिसणार आहेत. तसेच प्ले टुगेदरचा पर्याय देखील असणार आहे. गुगलच्या सर्कल टू सर्चसारखे फिचर अ‍ॅपल देऊ लागणार आहे. व्हिज्युअल इंटेलिजेंस आता कोणत्याही अ‍ॅपवर वापरता येणार आहे. फक्त फरक एवढाच आहे की तुम्हाला आधी स्क्रीनशॉट घ्यावा लागणार आहे. 

टॅग्स :Apple Incअॅपल