शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये मोठा एन्काऊंटर! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
3
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
4
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
5
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
6
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
7
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
8
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
9
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
10
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
11
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
12
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
13
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
14
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
15
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
16
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
17
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
18
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
19
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
20
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान

आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2025 21:04 IST

Apple WWDC 2025 : काही वर्षांपूर्वी मायक्रोसॉफ्टने विंडोज व्हिस्टा नावाचे ऑपरेटिंग सिस्टीम व्हर्जन आणले होते. ते देखील असेच पाणीदार होते.

अ‍ॅपलने डेवलपर कॉन्फरन्समध्ये आयओएसच्या थेट २६ व्या व्हर्जनला लाँच केले. लिक्विड डिस्प्ले अशी या व्हर्जनची ख्यातीही सांगितली. परंतू, आयफोन युजरच या लिक्विड डिस्प्लेवरून अ‍ॅपलला नको नको म्हणत असताना आता नेटकऱ्यांनी शाओमीचे डिझाईन, फिचर्स चोरल्याचा आरोप केला जात आहे. 

काही वर्षांपूर्वी मायक्रोसॉफ्टने विंडोज व्हिस्टा नावाचे ऑपरेटिंग सिस्टीम व्हर्जन आणले होते. ते देखील असेच पाणीदार होते. नेटकऱ्यांनी तर अ‍ॅपलने शाओमीची फिचर्स घेतल्याचे पुराव्यासकट दाखविण्यास सुरुवात केली आहे. iOS 26 मध्ये AI पॉवर्ड इमेज सर्च फीचरबद्दल सांगण्यात आले. युजर आयफोनवरील कोणत्याही स्क्रीनचा स्क्रीनशॉट घेऊ शकतो आणि तो गुगलवर सर्च करू शकतो. Xiaomi फोन वापरणारे लोक हे फीचर बऱ्याच काळापासून वापरत आहेत, असा दावा या नेटकऱ्यांनी केला आहे.

लॉक स्क्रीनवरील घड्याळ कस्टमाइझ करण्यासाठी अ‍ॅपलने नवीन फीचर्स दिले आहेत. हे अगदी Xiaomi च्या HyperOS च्या पहिल्या आवृत्तीसारखेच दिसत आहेत. लॉक स्क्रीनवरील घड्याळ त्याचा आकार बदलू शकते आणि उपलब्ध जागेनुसार दिसू शकते. HyperOS सादर करताना Xiaomi ने पहिल्यांदाच असेच फीचर दिले होते. XiaomiTime नावाच्या वेबसाइटवरील चित्रांसह हा दावा करण्यात आला आहे. शाओमीने अॅपलच्या नव्या लिक्विड ओएसबाबतही असाच दावा केला आहे, शाओमीने अशाच डिस्प्ले थीम याआधीच वापरलेली आहे. 

फोटो अ‍ॅपमध्येही अ‍ॅपलची चोरी नेटकऱ्यांनी पकडली आहे. गॅलरी अ‍ॅपला दोन टॅबमध्ये विभागून वापरता येते, हे शाओमी आपल्या फोन्समध्ये बऱ्याच आधीपासून देत आहे. तेच आता इंटरफेसमध्ये दोन टॅब जोडले आहेत. 

शाओमी सुरुवातीला अ‍ॅपलपासून प्रेरणा घेऊन अ‍ॅपलसारखेच फोन बनवत होती. परंतू आता अ‍ॅपल शाओमीपासून प्रेरणा घेऊन फोन बनवू लागल्याची खिल्ली नेटकरी उडवत आहेत. तसेच नव्या डिस्ल्पेबाबत आयफोन, मॅक युजर्स आपली मते मांडत आहेत. एवढी ट्रान्सपरन्ट स्क्रीन ठेवली तर आपल्याला टेक्स्ट वाचताना त्रास होईल, असेही काहीजण सांगत आहेत. आता अ‍ॅपल काय निर्णय घेते हे पाहणे जगातील सर्वाधिक विकत घेणाऱ्या स्मार्टफोन धारकांकडून पाहिले जात आहे.  

टॅग्स :Apple Incअॅपलxiaomiशाओमी