शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

लई भारी! आता एक क्लिकमध्ये कळणार शरीरातील पाण्याचे प्रमाण; Apple Watch मध्ये मिळू शकतो हायड्रेशन सेन्सर 

By सिद्धेश जाधव | Updated: August 21, 2021 18:52 IST

Apple Hydration Sensor: Apple सध्या एका नव्या हायड्रेशन सेन्सरवर काम करत आहे. हे पेटंट युनाइटेड स्टेट्स पेटंट अँड ट्रेडमार्क ऑफिस (USPTO) वर अ‍ॅप्पलने “Hydration measurement with a watch” नावाने नोंदवले आहे.  

ठळक मुद्देही पद्धत विश्वसनीय आणि सोप्पी आहे, यात युजरच्या घामाचे परीक्षण करण्यात येईल. शारीरिक हालचालीनंतर शरीरातील पाण्याचा स्थर जाणून घेणे उपयुक्त ठरू शकते. 

Apple सध्या एका नव्या हायड्रेशन सेन्सरवर काम करत आहे. या सेन्सरचा वापर अ‍ॅप्पल वॉचसारख्या वेयरेबल डिव्हायसेसमध्ये केला जाईल. ही माहिती PatentlyApple ने एका पेटंटच्या आधारावर दिली आहे. हे पेटंट युनाइटेड स्टेट्स पेटंट अँड ट्रेडमार्क ऑफिस (USPTO) वर अ‍ॅप्पलने “Hydration measurement with a watch” नावाने नोंदवले आहे.  

शरीरातील पाण्याचे प्रमाण तपासण्याच्या पारंपरिक पद्धती त्रासदायक, महाग आणि बेभरवशाच्या आहेत, असे अ‍ॅप्पलचे म्हणणे आहे. या पद्धती सिंगल फ्लूड टेस्ट सॅंपलच्या माध्यमातून पाण्याचे प्रमाण सांगतात. परंतु कंपनीच्या नव्या पद्धतीमध्ये ही प्रक्रिया वापरली जात नाही. अ‍ॅप्पलच्या पेटंटनुसार, कंपनीच्या हायड्रेशन सेन्सरमध्ये नॉन इनवेसिव इलेक्ट्रॉड्स त्वचेवर ठेऊन पाण्याचे प्रमाण सांगितले जाईल.  हे देखील वाचा: सावधान! नुकताच लाँच झालेला स्मार्टफोन होऊ लागलाय Over Heat; व्हिडीओ बनवताना येतेय समस्या

ही पद्धत विश्वसनीय आणि सोप्पी आहे, यात युजरच्या घामाचे परीक्षण करण्यात येईल. पेटंटमध्ये सविस्तरपणे या टेक्नॉलॉजीची माहिती देण्यात आली आहे. ही पद्धत सुखकर, अचूक आणि स्वयंचलित आहे. तसेच पेटंटमध्ये शरीरातील पाण्याचे प्रमाण योग्य राखणे आरोग्यसाठी किती लाभदायक असते हे सांगण्यात आले आहे. व्यायामानंतर किंवा मोठ्या प्रमाणावरील शारीरिक हालचालीनंतर शरीरातील पाण्याचा स्थर जाणून घेणे उपयुक्त ठरू शकते.  याआधी देखील अश्या अनेक पेटंटची माहिती समोर आली आहे, परंतु सर्वच पेटंटेड फीचर्स व्यवसायिकरित्या उपलब्ध होत नाहीत. हे देखील वाचा: iPhone 13 मध्ये मिळणार DSLR सारखा व्हिडीओ पोट्रेट मोड; नवीन कॅमेरा फीचर्स झाले लीक 

टॅग्स :Apple Incअॅपलtechnologyतंत्रज्ञान