अॅपल सारख्या स्मार्टफोन कंपनीने मोठा घपला केला आहे. अॅपल ही कंपनी कधी खोटी माहिती किंवा फसवणूक करत नाही असे मानले जाते. परंतू, ज्या बोलीवर त्यांनी आयफोन १६ विकलेत तीच त्यांना आयफोन १७ यायची वेळ झाली तरी देता आलेली नाहीय. यामुळे अमेरिकेत कंपनीने फसवणूक केल्यावरून खटला दाखल झाला आहे. खोटी जाहिरात करून अॅपलने iphone 16 सीरीज विकल्याचा दावा यात केला आहे.
हे प्रकरण अमेरिकन कोर्टातील असले तरी भारतातही हेच फोन विकले गेले आहेत. अॅपल काही केल्या जे बोललेली ते देऊ शकलेली नाहीय. अॅपल एक मोठे फिचर आणत आहे. त्याचे नाव आहे अॅपल इंटेलिजन्स. ते लोकांसाठी रोलआऊट करण्यात अॅपल फेल ठरत आहे. सतत डेडलाईन दिल्या जात आहेत. मार्च २०२५ पर्यंत तरी ते काही आलेले नाही किंवा येणार नाही. WWDC 2024 मध्ये जूनमध्ये अॅपलने याची घोषणा केली होती, तसेच ही एआय सर्व्हिस iPhone 16 सह नवीन अॅपल डिव्हाईसेसमध्ये दिली जाणार होती.
अॅपल इंटेलिजन्स येणार म्हणून सांगत तशा जाहिराती करत अॅपलने या एआय फिचर्सचे डेमोही दाखविले होते. तसेच यात अधिक इनोव्हेटीव्ह आणि अपडेट सिरी देखील दाखविण्यात आली होती. परंतू, या जाहिराती पाहून अनेकांनी जुने फोन विकून नवीन फोन घेतले होते. परंतू, प्रत्यक्षात या दोन्ही फोनमध्ये काहीच फरक दिसत नाहीय. कारण अॅपल इंटेलिजन्स आलेलेच नाहीय.
अॅपल हे फिचर्स काही देऊ शकली नाही. या प्रोजेक्ट अॅपलने अनिश्चित काळासाठी टाळला आहे. परंतू, असे करताना कंपनीने या फसव्या जाहिराती काही थांबविल्या नाहीत. या फसवणुकीविरोधात अमेरिकेत खटला दाखल करण्यात आला आहे. अमेरिकेतील सॅन होजे येथील अमेरिकन जिल्हा न्यायालयात हा खटला दाखल करण्यात आला आहे. खटल्यात असा दावा करण्यात आला आहे की अॅपलने खोटे दावे करून ग्राहकांची फसवणूक केली. अशा ग्राहकांना भरपाई दिली पाहिजे.
अॅपल कंपनीचा नवा फोन नुकताच लाँच झाला आहे. iPhone 16e मध्ये देखील अॅपल इंटेलिजन्स दिले जाणार असल्याचे कंपनीने सांगितले आहे. हे फीचर आता एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात दिले जाण्याची शक्यता असल्याचा दावा केला जात आहे.