Apple iPhone : Apple आपला iPhone 17 लाँच करणार आहे. कंपनीचा लाँच इव्हेंट 9 सप्टेंबर रोजी होणार आहे. Apple iPhone 17 चे चार व्हरिएंट लाँच करणार आहे. यामध्ये iPhone 17 Pro Max, iPhone 17 Pro, iPhone 17 Air आणि बेसिक iPhone 17 पर्यायांचा समावेश असू शकतो.
या फोनच्या किंमतीचा आतापर्यंत फक्त अंदाजलावला जात होता. आयफोन 17 सिरीजच्या बेस व्हर्जनची सुरुवातीची किंमत ८९,९०० रुपये, एअरची सुरुवातीची किंमत ९५,००० रुपये आणि प्रो मॅक्सची सुरुवातीची किंमत १,६४,९०० रुपये असू शकते. पण, आयफोन बनवण्यासाठी किती पैसे खर्च होतात, याची किंमत लाखोंमध्ये असते आणि आयफोनवर अॅपल किती नफा कमावते? याबद्दल तुम्हीला माहिती आहे का? चला जाणून घेऊया.
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
iPhone 16 Pro बनवण्यासाठी किती रुपये खर्च?
वॉल स्ट्रीट जर्नलच्या अहवालानुसार, 256 GB स्टोरेजसह iPhoe 16 Pro बनवण्यासाठी अॅपलने सुमारे 580 डॉलर म्हणजेच सुमारे ५१,००० रुपये खर्च केले आहेत. यामध्ये A 18 Pro ही चीप ८००० रुपये, रियर कॅमेरा सिस्टम (१११८३ रुपे), डिस्प्ले (३३४४ रुपये) आणि इतर भागांचा समावेश आहे.
त्यानंतर अॅपलने हा फोन १,१९,९०० रुपयांना विकला, म्हणजेच iPhone 16 Pro वर सुमारे ६९००० रुपयांचा एकूण नफा झाला.
एकूण नफ्यात मार्केटिंग, संशोधन, पॅकेजिंग आणि शिपिंग खर्चाचा समावेश आहे.
iPhone 16 Pro मॅक्सवर नफा
अॅपलने iPhone 16 Pro Max बनवण्यासाठी फक्त ५१,००० रुपये खर्च केले, तरीही भारतात त्याची किंमत १,४४,९०० रुपये ठेवण्यात आली. म्हणजेच, कंपनीला प्रत्येक फोनच्या विक्रीवर ९४००० रुपये नफा झाला. अमेरिकेत आयफोनची किंमत भारतापेक्षा थोडी कमी आहे, यामुळे त्याचा नफा तिथे कमी असू शकतो.
फोन अपग्रेड केल्यानंतर कंपनी किंमत थोडी वाढवते. म्हणूनच खर्चात वाढ होऊनही, लॉजिस्टिक्स आणि सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट सारख्या खर्चाचा समावेश केल्यानंतरही, अॅपलचे एकूण नफा सुमारे ७०% राहतो. उत्पादन खर्च आणि किरकोळ किमतीतील हा मोठा फरक अॅपलच्या प्रभावी नफ्याचे मार्जिन दर्शवितो.