जगातील सर्वोत्तम ब्रँडपैकी एक असलेल्या ॲपल कंपनीने अमेरिकेतील कॅलिफोर्नियातील क्युपर्टिनो येथील ॲपल पार्कमधील मेगा इवेंटमध्ये आयफोन १७ लॉन्च करण्यात आला. ५ आकर्षित रंगात iPhone 17, iPhone 17 Air, iPhone 17 Pro आणि iPhone 17 Pro Max या या ४ मॉडेल्सचा समावेश आहे. यावेळी iPhone 17 Air च्या माध्यमातून ॲपल कंपनीने आतापर्यंतच्या आपल्या इतिहासातील सर्वात स्लीम मॉडेल लॉन्च केले आहे. इथं एक नजर टाकुयात चार नव्या मॉडेल्सच्या किंमतीसह बाजारातून ते कधी खरेदी करता येणार त्यासंदर्भातील सविस्तर माहिती.
iPhone 17 लॉन्च झाला, बाजारात कधी येणार?
iPhone 17 च्या नव्या सीरीजमधील सर्वच्या सर्व ४ मॉडेल्स लॉन्चिंगनंतर १२ सप्टेंबरला सकाळी ५ वाजून ३० मिनिटांनी प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध असतील. १९ सप्टेंबरला बाजारातून यापैकी कोणतेही मॉडेल ग्राहकांना खरेदी करता येणार आहे. Apple ने स्पष्ट केलं की हे चारही नवे मॉडेल्स (iPhone 17, iPhone 17 Air, iPhone 17 Pro आणि iPhone 17 Pro Max) सप्टेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात भारतीय बाजारात उपलब्ध होणार हे स्पष्ट करताना त्याच्या किंमतीही सांगितल्या आहेत.
iPhone 17 सीरिजमधील ४ मॉडेल्स त्याची किंमत अन् फीचर्स
iPhone 17 किंमत ८२,९०० रुपयांपासून
- ६.३-इंच ProMotion डिस्प्ले
- A19 चिप
- सुधारित ड्युअल कॅमेरा सिस्टम
- Ceramic Shield संरक्षण
iPhone 17 Air (256GB) - १,१९,९०० रुपये
- आतापर्यंतचा सर्वात स्लीम iPhone (५.६ mm जाडी)
- टायटॅनियम फ्रेम
- प्रीमियम डिझाइन
- Pro स्तराची कामगिरी
iPhone 17 Pro (256GB) – १,३४,९००
- A19 Pro चिप
- 48MP ट्रिपल कॅमेरा सिस्टम
- 8K व्हिडिओ शूटिंग सुविधा
- मोठी बॅटरी, सुधारित कार्यक्षमता
iPhone 17 Pro Max (256GB) – १,४९,९००
- सर्वात मोठा ६.९-इंच डिस्प्ले
- सर्वाधिक बॅटरी क्षमता
- 48MP अल्ट्रा-ॲडव्हान्स्ड कॅमेरा सिस्टम
- AI-आधारित फोटोग्राफी