iPhone 12 घेणं झालं सोपं! Apple नं अचानक कमी केली किंमत, अँड्रॉइड फोन इतकेचे द्यावे लागणार पैसे 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2022 07:38 PM2022-03-29T19:38:45+5:302022-03-29T19:39:06+5:30

Apple iPhone 12 खूप स्वस्तात विकत घेता येत आहे. Apple iStore वर या मॉडेलवर एकूण 28 हजार रुपयांचा डिस्काउंट मिळत आहे.  

Apple iPhone 12 Available At Just Rs 37900 After Price Cut Check Offer Details  | iPhone 12 घेणं झालं सोपं! Apple नं अचानक कमी केली किंमत, अँड्रॉइड फोन इतकेचे द्यावे लागणार पैसे 

iPhone 12 घेणं झालं सोपं! Apple नं अचानक कमी केली किंमत, अँड्रॉइड फोन इतकेचे द्यावे लागणार पैसे 

googlenewsNext

Apple iPhone 12 ची किंमत कंपनीच्या अधिकृत रिसेलर iStore नं कमी केली आहे. जर तुम्ही आयफोनवर अपग्रेड करण्याचा विचार करत असाल तर ही तुमच्यासाठी चांगली संधी ठरू शकते. कारण iPhone 12 वर 28 हजार रुपयांची सूट मिळत आहे. यासाठी तुम्हाला कॅशबॅक आणि एक्सचेंज डिस्काउंट ऑफरचा वापर करावा लागेल. चला जाणून घेऊया नेमकी ऑफर कशी आहे.  

Apple iPhone 12 वरील डिस्काउंट  

Apple iPhone 12 iStore वर 65,990 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. तसेच बँक ऑफर्स अंतर्गत तुम्हाला 5000 रुपयांचा इन्स्टंट डिस्काउंट मिळेल. यासाठी तुम्हाला कोटक आयसीआयसीआय आणि एसबीआय बँकेच्या कार्डस वापर करून ऑर्डर द्यावी लागेल. म्हणजे 5000 रुपयांचा कॅशबॅक मिळेल.  

सर्वात जास्त डिस्काउंट एक्सचेंज ऑफर अंतर्गत दिला जाईल. यासाठी तुम्हाला तुमचा जुना स्मार्टफोन एक्सचेंज करावा लागेल. योग्य स्मार्टफोन असल्यास तुम्ही 18,000 रुपयांपर्यंतची बचत करू शकता. अशाप्रकारे एकूण 28 हजारांचा डिस्काउंट मिळवल्यावर Apple iPhone 12 तुम्ही फक्त 37,900 रुपयांमध्ये घरी आणू शकता.  

iPhone 12 चे स्पेसिफिकेशन्स 

iPhone 12 हा मोबाईल 6.1-इंचाच्या सुपर रेटिना एक्सडीआर डिस्प्लेसह सादर करण्यात आला आहे. ज्यात A14 बायोनिक चिप देण्यात आली आहे. मागे ड्युअल कॅमेरा सेटअप मिळतो. ज्यात दोन्ही सेन्सर्स 12MP चे आहे. फ्रंटला देखील 12MP चा सेल्फी कॅमेरा आहे. हा एक 5G स्मार्टफोन आहे जो ड्युअल सिमला सपोर्ट करतो.   

Web Title: Apple iPhone 12 Available At Just Rs 37900 After Price Cut Check Offer Details 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.