भारतीय फोटोग्राफरच्या फोटोने जिंकले अ‍ॅप्पलच्या सीईओंचे मन...केले ट्विट

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2019 04:15 PM2019-08-20T16:15:13+5:302019-08-20T16:25:03+5:30

टीम कुक यांनी वरुणच्या या फोटोला सुंदर ओळही दिली आहे.

Apple CEO's Tim Cook twit Indian photographer's clicked image | भारतीय फोटोग्राफरच्या फोटोने जिंकले अ‍ॅप्पलच्या सीईओंचे मन...केले ट्विट

भारतीय फोटोग्राफरच्या फोटोने जिंकले अ‍ॅप्पलच्या सीईओंचे मन...केले ट्विट

Next

सॅन फ्रान्सिस्को : अ‍ॅप्पलचे सीईओ टीम कुक यांनी भारतीय फोटोग्राफरने काढलेला एक फोटो ट्विट केला आहे. या फोटोचे त्यांनी कौतुकही केले आहे. वर्ल्ड फोटोग्राफी डेच्या निमित्ताने त्यांनी आयफोनमधून काढलेले पाच फोटो ट्विटर हँडलवर शेअर केले आहेत. यामध्ये भारतीय फोटोग्राफर वरूण आदित्य याचाही फोटो आहे. 


टीम कुक यांनी वरुणच्या या फोटोला सुंदर ओळही दिली आहे. मुळचे भारतीय असलेल्या आदित्य हे वाईल्ड लाईफ फोटोग्राफर आहेत. त्यांचे फोटो आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रदर्शनाला ठेवले जातात. कुक यांनी एक फोटो ट्विटरवर टाकत म्हटले आहे की, आम्हाला दर रोज आमच्या ग्राहकांकडून आयफोनवर काढलेल्या फोटोंमुळे प्रेरणा मिळते. हे फोटो पाहून आनंदही होतो. आदित्य यांनी केनियाच्या एंबोसेलीमध्ये हत्तींसोबत इंद्रधनुष्याचा सुंदर फोटो काढला आहे. 



कुक यांनी आणखी एक ट्विट करत सांगितले की, जगभातील आपल्या आवडीच्या फोटोंवरून एक नजर टाका. 

आयफोन फोटोग्राफी अ‍ॅवॉर्ड
दरम्यान, आयफोन फोटोग्राफी अ‍ॅवॉर्ड (IPPAWARDS) 2019 मध्ये दोन स्वतंत्र फोटोग्राफरना बक्षिस देण्यात आले. यामध्ये महाराष्ट्राची डिंपी भलोटिया हिला सिरीज कॅटेगरीमध्ये द्वितीय स्थान आणि सनसेट कॅटेगरिमध्ये कर्नाटकच्या श्रीकुमार कृष्‍णन यांना पहिल्या क्रमांकाचे बक्षिस मिळाले आहे. 

Web Title: Apple CEO's Tim Cook twit Indian photographer's clicked image

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.