शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
2
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
3
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
4
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
6
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
7
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
8
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
9
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
10
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
11
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
12
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
13
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
14
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
15
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
16
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
17
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
18
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
19
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
20
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका

टीव्हीनंतर ऑनलाईन एंटरटेनमेंट देखील महागणार; Amazon Prime Membership चे दर वाढणार

By सिद्धेश जाधव | Published: October 21, 2021 4:57 PM

Amazon Prime Membership New Plans: अ‍ॅमेझॉन इंडिया देशात प्राइम मेंबरशिप मध्ये दरवाढ करणार आहे. अ‍ॅमेझॉनच्या वेबसाईटनुसार मासिक, तिमाही आणि वार्षिक प्लॅनची किंमत वाढवण्यात येईल.  

याच आठवड्यात बातमी आली होती कि 1 डिसेंबरपासून झी, स्टार, सोनी आणि Viacom18 हे ब्रॉडकास्टींग नेटवर्क काही चॅनल्स आपल्या बुकेतून बाहेर काढणार आहेत. त्यामुळे टीव्ही चॅनल पॅकची किंमत 50 टक्क्यांनी वाढू शकते. या दरवाढीमुळे ग्राहक ऑनलाईन ओटीटी प्लॅटफॉर्म्सकडे वळतील अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. तर तिकडे देखील मेंबरशिप फी वाढवण्याची मालिका सुरु आहे.  

आयपीएल 2021 च्या दुसऱ्या टप्प्याच्या आधी Disney Plus Hotstar ने आपल्या प्लॅन्सची किंमत बदलली होती. तर आता अ‍ॅमेझॉन इंडिया देशात प्राइम मेंबरशिप मध्ये दरवाढ करणार आहे. अ‍ॅमेझॉनच्या वेबसाईटनुसार मासिक, तिमाही आणि वार्षिक प्लॅनची किंमत वाढवण्यात येईल.  

Amazon Prime Membership New Price 

अ‍ॅमेझॉनची मासिक प्राइम मेंबरशिप सध्या 129 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. जी दरवाढीनंतर 179 रुपये करण्यात येईल. तर 3 महिन्यांसाठी आता 329 च्या ऐवजी 459 रुपये द्यावे लागतील. तर वार्षिक मेंबरशिप 1,499 रुपयांमध्ये विकत घेता येईल, जी आधी 999 रुपयांमध्ये उपलब्ध होती. म्हणजे कंपनीने वार्षिक प्लॅनमध्ये 500 रुपयांची वाढ केली आहे. या बदलाची अचूक तारीख कंपनीने सांगितली नाही, लवकरच हे प्लॅन लागू होतील असे सांगण्यात आले आहे.  

याव्यतिरिक्त 18-24 वर्षांच्या ग्राहकांसाठी कंपनीने Prime Young Adult प्लॅनची घोषणा केली आहे. ज्यात या ग्राहकांना उपरोक्त किंमतीवर कॅशबॅक दिला जाईल.  

  • Prime Young Adult Monthly: 89 रुपये (90 रुपये कॅशबॅक)  
  • Prime Young Adult Quarterly: 229 रुपये (230 रुपये कॅशबॅक)  
  • Prime Young Adult Yearly: 749 रुपये (750 रुपये कॅशबॅक)  
टॅग्स :amazonअ‍ॅमेझॉनtechnologyतंत्रज्ञान