Amazon Pay ची नवी ऑफर; रिचार्ज आणि बिल पेमेंट्सवर मिळणार 4 हजारांपर्यंत कॅशबॅक

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2018 10:51 AM2018-12-19T10:51:21+5:302018-12-19T11:02:19+5:30

अॅमेझॉन या प्रसिद्ध ई-कॉमर्स कंपनीने Amazon Pay वर एक नवी ऑफर आणली आहे. 'अब बडा होगा रुपया' असं या नव्या ऑफरचं नाव असून कंपनीकडून युजर्सना 4 हजारांपर्यंत कॅशबॅक मिळणार आहे.

Amazon Pay announces ‘Ab bada hoga rupaiya’ Cashback Offers for Indian users | Amazon Pay ची नवी ऑफर; रिचार्ज आणि बिल पेमेंट्सवर मिळणार 4 हजारांपर्यंत कॅशबॅक

Amazon Pay ची नवी ऑफर; रिचार्ज आणि बिल पेमेंट्सवर मिळणार 4 हजारांपर्यंत कॅशबॅक

Next
ठळक मुद्देअॅमेझॉन या प्रसिद्ध ई-कॉमर्स कंपनीने Amazon Pay वर एक नवी ऑफर आणली आहे.'अब बडा होगा रुपया' असं या नव्या ऑफरचं नाव असून कंपनीकडून युजर्सना 4 हजारांपर्यंत कॅशबॅक मिळणार आहे. मोबाईल रिचार्ज, मुव्ही तिकिट, ट्रॅव्हल बुकींग, बिल पेमेंट्स, औषधं, किराणा सामानावर कॅशबॅक मिळणार आहे.

नवी दिल्ली - अॅमेझॉन या प्रसिद्ध ई-कॉमर्स कंपनीने Amazon Pay वर एक नवी ऑफर आणली आहे. 'अब बडा होगा रुपया' असं या नव्या ऑफरचं नाव असून कंपनीकडून युजर्सना 4 हजारांपर्यंत कॅशबॅक मिळणार आहे. या ऑफरअंतर्गत ग्राहकांना केवळ शॉपिंगच नाही तर मोबाईल रिचार्ज, मुव्ही तिकिट, ट्रॅव्हल बुकींग, औषधं, किराणा सामान आणि बिल पेमेंट्सवर कॅशबॅक मिळणार आहे. 31 डिसेंबरपर्यंत  ही ऑफर चालणार आहे. 

मोबाईल रिचार्ज

अॅमेझॉन पेमधून मोबाईल फोन्सच्या रिचार्जवर टॉकटाइम आणि डेटा प्लान्स मिळवू शकतात. अॅमेझॉनवर जर ग्राहक पेमेंट अंतर्गत रिचार्ज करणार असतील तर 30 टक्क्यांपर्यंत कॅशबॅक मिळवण्याची संधी आहे. परंतु, तेच रिचार्ज अॅमेझॉन पेमधून दुसऱ्यांदा केल्यास ग्राहकांना 30 रुपयांचा कॅशबॅक मिळेल. 

बिल पेमेंट्स

अॅमेझॉन पेमधून बिल पे करून ग्राहक डीटीएच पॅकेज आणि ब्रॉडबँड कनेक्शनला अपग्रेड करू शकतात. कोणत्याही ऑपरेटरकडून डीटीएच सर्विसच्या अॅमेझॉन पेकडून रिचार्ज केल्यानंतर 20 टक्क्यांपर्यंत कॅशबॅक मिळणार आहे. वीज, पोस्टपेड, लँडलाइन, ब्रॉडबँड आणि गॅस कनेक्शनच्या अॅमेझॉन पेवर ग्राहकांना कॅशबॅक मिळणार आहे. 

मुव्ही तिकिट

बूक माय शोवर चित्रपटाचं तिकीट बूक केल्यावर अॅमेझॉन पेमधून बिल पे केल्यास 25 टक्क्यांपर्यंत कॅशबॅक मिळणार आहे.

ट्रॅव्हल बुकींग

मेक माय ट्रीपच्या मदतीने एखाद्या सहलीचं बुकींग  केल्यानंतर अॅमेझॉन पेमधून त्याचं पेमेंट केल्यास 25 टक्क्यांपर्यंत कॅशबॅक मिळणार आहे. तर नवीन युजर्सना 125 रुपयांचा कॅशबॅक मिळणार आहे. तसेच रेडबस या अॅप वरून बस बूक केल्यास 25 टक्क्यांपर्यंत कॅशबॅक मिळणार आहे. 

फूड ऑर्डर

स्विगीवरून फूड ऑर्डर केल्यानंतर अॅमेझॉन पेमधून बिल पे केल्यास 75 रुपयांपर्यंतचा कॅशबॅक मिळणार आहे. तसेच पहिल्यांदा ऑर्डर केल्यास 50 रुपये मिळणार आहे. याशिवाय डॉमिनोज आणि अन्य काही ठिकाणांवरून फू़ड ऑर्डर केल्यास ऑफर्स मिळणार आहेत. 

Web Title: Amazon Pay announces ‘Ab bada hoga rupaiya’ Cashback Offers for Indian users

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.