शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

स्वस्तात मस्त! Redmi Note 10S वर मिळतोय जबरदस्त डिस्काउंट; अ‍ॅमेझॉनने केली ऑफर्सची घोषणा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2021 17:50 IST

Amazon Offers On Xiaomi Redmi Note 10s Phone: अ‍ॅमेझॉन Redmi Note 10S च्या किंमतीवर डिस्काउंट देत आहे. सेल अंतर्गत स्मार्टफोन 12,749 रुपयांपेक्षा कमी किंमतीत विकत घेता येईल.

यावर्षी मार्चमध्ये शाओमीने Redmi Note 10S स्मार्टफोन सादर केला होता. लाँचच्या वेळी या फोनची किंमत 14,999 रुपये ठेवली होती. त्यानंतर कंपनीने या फोनची किंमत 1000 रुपयांनी कमी केली होती. त्यामुळे हा फोन 13,999 मध्ये खरेदीसाठी उपलब्ध झाला होता. आता अ‍ॅमेझॉन Redmi Note 10S च्या किंमतीवर डिस्काउंट देत आहे.  

Redmi Note 10S वरील डिस्काउंट 

अ‍ॅमेझॉन सेल अंतर्गत Redmi Note 10S स्मार्टफोन 12,749 रुपयांपेक्षा कमी किंमतीत विकत घेता येईल. 13,999 रुपयांच्या या स्मार्टफोनवर बँक ऑफर्स अंतर्गत 10 टक्के इन्स्टंट डिस्काउंट देण्यात येईल. यासाठी अ‍ॅक्सिस, इंडसाईंडी आणि सिटी बँकेच्या क्रेडिट किंवा डेबिट कार्डचा वापर करावा लागेल. विशेष म्हणजे ईएमआय ट्रँजॅक्शन्सवर देखील हा डिस्काउंट मिळेल. एकूण 1250 रुपयांची सूट मिळाल्यानंतर हा फोन 12,749 रुपयांमध्ये उपलब्ध होईल.  

Redmi Note 10S चे स्पेसिफिकेशन्स  

रेडमी नोट 10 एसमध्ये 6.43 इंचाचा फुलएचडी प्लस एमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. मात्र, यामध्ये हाय रिफ्रेश रेट देण्यात आलेला नाही. स्क्रीन प्रोटेक्शनसाठी यामध्ये कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 3 देण्यात आली आहे. या स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक हेलिओ जी 95 चिपसेट देण्यात आला आहे. सोबतच या फोनमध्ये 6GB/8GB रॅम आणि 64GB/128GB स्टोरेज देण्यात आली आहे.  

रेडमी नोट 10एसमध्ये कॅमेरा सेटअप हा 64 मेगापिक्सल प्रायमरी आणि 8 मेगापिक्सल सेकंडरी असा आहे. याला अल्ट्रा वाईड अँगल आहे. सोबतच अन्य कॅमेरे हे 2-2 मेगापिक्सलचे आहेत. रिअर कॅमेराने 4K 30fps व्हिडीओ रेकॉर्ड करता येतात. या फोनला 13 मेगा पिक्सल सेल्फी कॅमेरा आहे. Redmi note 10S मध्ये 5000 एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. 33 वॉटचा फास्ट चार्जर देण्यात आला आहे. साइड माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात आला आहे. 

टॅग्स :xiaomiशाओमीamazonअ‍ॅमेझॉनSmartphoneस्मार्टफोनAndroidअँड्रॉईडtechnologyतंत्रज्ञान