काही मिनिटांत कोणत्याही LCD किंवा LED टीव्हीला बनवा स्मार्टटीव्ही; नवीन Amazon Fire TV Stick 4K Max भारतात लाँच  

By सिद्धेश जाधव | Published: September 10, 2021 03:26 PM2021-09-10T15:26:38+5:302021-09-10T15:28:37+5:30

Amazon launches Fire TV Stick 4K Max: Amazon ने भारतात नवीन Fire TV Stick सादर केली आहे. 4K व्हिडीओ क्वॉलिटीसह येणारी ही स्टिक Wi-Fi 6 कनेक्टिव्हिटीसह सादर करण्यात आली आहे.  

Amazon fire tv stick 4k max launched in india  | काही मिनिटांत कोणत्याही LCD किंवा LED टीव्हीला बनवा स्मार्टटीव्ही; नवीन Amazon Fire TV Stick 4K Max भारतात लाँच  

काही मिनिटांत कोणत्याही LCD किंवा LED टीव्हीला बनवा स्मार्टटीव्ही; नवीन Amazon Fire TV Stick 4K Max भारतात लाँच  

googlenewsNext
ठळक मुद्देही फायर टीव्ही स्टिक नियंत्रित करण्यासाठी रिमोटमध्ये व्हॉइस अस्टिटंट Alexa चा सपोर्ट देण्यात आला आहेनव्या फायर टीव्ही स्टिकमध्ये लाईव्ह व्यू आणि पिक्चर-इन-पिक्चर फीड सपोर्ट देखील देण्यात आला आहे.

Amazon ने भारतात नवीन Fire TV Stick सादर केली आहे. जुन्या फायर टीव्ही स्टिकच्या तुलनेत यात काही अपग्रेड करण्यात आले आहेत. नवीन फायर टीव्ही स्टिकमध्ये लेटेस्ट हाय-स्पीड Wi-Fi 6, 4K व्हिडीओ क्वॉलिटी सपोर्ट आणि डॉल्बी व्हिजन सपोर्ट देण्यात आला आहे. या Fire TV Stick चा वापर करून कोणत्याही LCD किंवा LED टीव्हीला तुम्ही स्मार्ट टीव्हीमध्ये रूपांतरित करू शकता.  

Fire TV Stick 4K Max ची किंमत  

अ‍ॅमेझॉनने भारतात Fire TV Stick 4K Max ची किंमत किंमत 6,499 रुपये ठेवली आहे. सध्या ही स्टिक अ‍ॅमेझॉनवर प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध झाली आहे. येत्या काही दिवसांत काही शॉपिंग मॉल्समध्ये ही फायर स्टिक उपलब्ध होईल. या फायर टीव्ही स्टिकची शिपिंग 7 ऑक्टोबरपासून सुरु करण्यात येईल.  

Fire TV Stick 4K Max चे स्पेसिफिकेशन्स 

Fire TV Stick 4K Max मध्ये अ‍ॅमेझॉनने 1.8GHz क्लॉक स्पीड असलेल्या MediaTek MT8696 प्रोसेसरचा वापर केला आहे, तसेच यात 2GB RAM देण्यात आला आहे. कनेक्टिव्हिटीसाठी या स्टिकमध्ये Wi-Fi 6 आणि ब्लूटूथ 5.0 मिळते. तसेच यात HDR10 आणि HDR10+ सपोर्ट देण्यात आला आहे. ही स्टिक डॉल्बी अ‍ॅटमॉस आणि डॉल्बी व्हिजनला सपोर्ट करते.  

ही फायर टीव्ही स्टिक नियंत्रित करण्यासाठी रिमोटमध्ये व्हॉइस अस्टिटंट Alexa चा सपोर्ट देण्यात आला आहे. हा रिमोट बिल्ट-इन Amazon Prime Video, Netflix सारख्या बटन्ससह येतो. तसेच नव्या फायर टीव्ही स्टिकमध्ये लाईव्ह व्यू आणि पिक्चर-इन-पिक्चर फीड सपोर्ट देखील देण्यात आला आहे. अ‍ॅमेझॉनच्या मते जुन्या फायर टीव्ही स्टिकच्या तुलनेत ही Fire TV Stick 4K Max 40 टक्के जास्त वेगवान आहे  

Web Title: Amazon fire tv stick 4k max launched in india 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.