शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

लहान मुलांच्या हातात फोन, टॅब देत आहात ?... तर मग वेळीच सावध व्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2018 09:15 IST

मुलांच्या हातात स्वत:चे मोबाइल, टॅब आणि लॅपटॉप कौतुकानं देणं हा काही स्टेटस सिम्बॉल नाही. ‘आम्ही किती आधुनिक’ म्हणून मिरवण्याचीही गोष्ट नाही.

मुंबई - मुलांच्या हातात स्वत:चे मोबाइल, टॅब आणि लॅपटॉप कौतुकानं देणं हा काही स्टेटस सिम्बॉल नाही. ‘आम्ही किती आधुनिक’ म्हणून मिरवण्याचीही गोष्ट नाही. उलट यामुळं तुमच्या मुलाला याचा फटका बसू शकतो. इंग्लंडमधील डॉक्टरांनी नुकत्याच दिलेल्या अहवालानुसार, जी मुलं फोन किंवा टॅबचा वापर करतात त्यांच्या बोटाच्या मांसपेशींचा विकास व्यवस्थित होत नाही. त्यामुळं त्यांना पेन अथवा पेन्सिल पकडताना त्रास होऊ शकतो.  ब्रिटनमधील हॉर्ट ऑफ इंग्लंड फाउंडेशन एनएचएस ट्रस्टमधील लहान मुलांचा थेरपिस्ट सैली म्हणतात की, सध्या शाळेत शिकत असलेल्या लहान मुलांच्या हाताचे स्नायू तितकेसे मजबूजत नाही जे दहा वर्षांपूर्वींच्या मुलांमध्ये पहायला मिळायचे. पेन, पेन्सिल पकडण्यासाठी आणि लिहण्यासाठी आपल्या बोटाच्या मासपेशीवर आपलं नियंत्रण असावं लागते.

या कौशल्याचा विकास करण्यासाठी मुलांना परिश्रम करावे लागतात. लहान वयामध्ये बोटाचा विकास होणं गरजेच आहे. त्यासाठी तो व्यायाम व्हावा. मोबाइल आणि टॅबच्या वापरामुळं मुलांचे पेन, पेन्सिल वापरण्याचं प्रमाण कमी झालं आहे. त्याचप्रमाणे ते मैदानी खेळही विसरले आहेत.  गार्डियनच्या वृत्तानुसार, मुलांची मानसिक आणि शारीरिक तंदुरुस्ती मिळवण्यासाठी मैदानी खेळ खेळले पाहिजेत. त्यामुळं मासपेक्षीचा विकास चांगल्या प्रकारे होतील. पालकांनी आपल्या मुलांच्या हातात मोबाईल आणि टॅब देण्याऐवजी त्यांना मैदानी खेळ खेळण्यासाठी प्रोत्साहित करावं. 

लहान मुलांचा विकास कसा होतो यावर अभ्यास करणाऱ्या लंडनमधील एका संस्थेच्या प्रूंटी म्हणाल्या की, तंत्रज्ञानाचा आधिकाधिक वापर करणाऱ्या मुलांचे लेखन कौशल्य विकसित होण्यासाठी वेळ लागतो. इतर विद्यार्थांच्या तुलनेत त्यांना लिहताना त्रास होण्याचे प्रमाण आधिक आहे. अमेरिकेत झालेल्या एका संशोधनात स्मार्ट फोन्स, टॅब वापरामुळे अनेकांची स्मृती कमी होत असल्याचे आढळून आले आहे. स्मार्ट फोन्स आणि इंटरनेटमुळे मुलांची स्मरणशक्ती आणि एकाग्रता कमी होत असल्याचे तज्ज्ञ डॉक्टरांचे मत आहे. 

अनेक जण लहान मुलांना विरंगुळा म्हणून स्वत:चे स्मार्ट फोन्स खेळण्यासाठी देतात किंवा शाळेतून घरी येताना मुले एकटीच येतात. त्यांना काही निरोप द्यायचा असल्यास पटकन संपर्क साधता यावा, म्हणून पालकच लहान मुलांना स्मार्ट फोन्स देतात. पण, त्याचा परिणाम त्यांच्या स्मरणशक्तीवर आणि एकाग्रतेवर होताना दिसत आहे. सतत स्मार्ट फोनचा वापर केल्यामुळे नैसर्गिकरीत्या मुलांची इतर गोष्टींत एकाग्रता कमी व्हायला लागते. या मुलांना स्मार्ट फोन दिला नाही, तर ते चिडचिडेपणा करायला लागतात, असेही काही तज्ञांचे मत आहे.

टॅग्स :Healthआरोग्यtechnologyतंत्रज्ञान