शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

एअरटेलची रिलायन्स जिओला तगडी टक्कर, 2500 रूपयात आणणार 4 जी स्मार्टफोन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2017 11:38 IST

देशातील सर्वात मोठी दूरसंचार कंपनी भारती एअरटेल रिलायन्स जिओला तगडी टक्कर देण्याच्या तयारीत आहे. लवकरच ते 2500 ते 2700 रूपयांचा स्मार्टफोन लॉन्च करण्याची तयारी करत आहेत.

ठळक मुद्देलवकरच एअरटेल 2500 ते 2700 रूपयांचा स्मार्टफोन लॉन्च करण्याची तयारी ग्राहकांना जर थोडे जास्त पैसे खर्च करून स्मार्टफोन मिळत असेल तर ते तेवढा खर्च करतील असा एअरटेलचा विचारदिवाळीच्या आधी हा फोन मार्केटमध्ये येण्याची शक्यता

नवी दिल्ली, दि. 12 - देशातील सर्वात मोठी दूरसंचार कंपनी  भारती एअरटेल रिलायन्स जिओला तगडी टक्कर देण्याच्या तयारीत आहे. लवकरच ते 2500 ते 2700 रूपयांचा स्मार्टफोन लॉन्च करण्याची तयारी करत आहेत. याद्वारे रिलायन्स जिओच्या इफेक्टिव्ह किंमत शून्य असलेल्या फोनला टक्कर देण्याचा एअरटेलचा प्रयत्न आहे. जिओच्या या फोनची बुकींग नुकतीच सुरू झाली आहे. 

मात्र, सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार जिओच्या विरूद्ध एअरटेलचा हा फोन स्मार्टफोन असणार आहे. कारण ग्राहकांना जर थोडे जास्त पैसे खर्च करून स्मार्टफोन मिळत असेल तर ते तेवढा खर्च करतील असा एअरटेलचा विचार आहे. दिवाळीच्या आधी हा फोन मार्केटमध्ये येण्याची शक्यता आहे. यामध्ये 4 जी कनेक्शनशिवाय ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी डेटा आणि वॉइस प्लॅनदेखील असणार आहे.  

या ड्युअल सिम 4 जी स्मार्टफोनमध्ये 4 इंचाचा डिस्प्ले, ड्युअल कॅमेरा VolTe कॉलिंग  आणि चांगल्या क्षमतेची बॅटरी असणार आहे. यामध्ये एक जीबी रॅम असेल. मात्र, एअरटेलने याबाबत अजूनपर्यंत अधिकृत माहिती दिलेली नाही.  

एअरटेलनं व्हॉईस ओव्हर लाँग टर्म इव्होल्यूशन (VoLTE) ही सेवाही लाँच केली आहे. मुंबईतून या सेवेला सुरुवात करण्यात आली. VoLTE सेवा देणारी एअरटेल भारतातील दुसरी दूरसंचार कंपनी ठरली आहे. एअरटेलचे 26 कोटींपेक्षा जास्त ग्राहक आहेत. जिओने कंपन्यांसमोर तगडं आव्हान उभं केल्यानंतर ग्राहकांना VoLTE सेवा देण्यासाठी इतर कंपन्यांही सरसावल्या आहेत.

VoLTE सेवा सध्या केवळ मुंबईतील ग्राहकांसाठी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. मार्चपर्यंत ही सेवा देशभरातील ग्राहकांसाठी उपलब्ध करुन देण्यात येईल. या सेवेसाठी ग्राहकांना कोणतंही अतिरिक्त शुल्क देण्याची गरज नाही, असं एअरटेलने म्हटलं आहे.जिओची VoLTE सेवा केवळ 4G नेटवर्कवरच उपलब्ध आहे. मात्र एअरटेलचे 2G आणि 3G ग्राहकही डेटाद्वारे व्हॉईस कॉलिंग करु शकतात. यामुळे ग्राहकांना कनेक्टिव्हिटीची अडचण येणार नाही. ही टेक्निक केवळ एअरटेलकडेच असल्याचा दावा कंपनीने केला आहे.जिओ आणि एअरटेलनंतर व्होडाफोनही लवकरच VoLTE सेवा देण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे. मात्र अद्याप याबाबत अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.काय आहे VoLTE सेवा?VoLTE ही अशी सुविधा आहे, ज्यामुळे डेटाद्वारे व्हॉईस कॉलिंग करता येते. म्हणजेच तुमच्या डेटा पॅकमध्येच तुम्ही कॉलिंगचाही लाभ घेऊ शकता. VoLTE सेवेत ग्राहकांना व्हिडिओ कॉलिंगचीही सुविधा मिळते.