शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

जिओला टक्कर देण्यासाठी एअरटेलचा नवीन प्रीपेड प्लॅन लॉन्च

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2018 19:14 IST

भारतीय टेलिकॉम क्षेत्रात रिलायन्स जिओने पाऊल ठेवल्यापासून मोबाइल रिचार्जच्या किंमतीवरुन बाजारात कंपन्यांची रस्सीखेच चालू आहे.  एअरटेल, आयडिया आणि व्होडाफोन या प्रमुख कंपन्यांनी रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी खास ऑफर बाजारात आणत आहेत.

मुंबई : भारतीय टेलिकॉम क्षेत्रात रिलायन्स जिओने पाऊल ठेवल्यापासून मोबाइल रिचार्जच्या किंमतीवरुन बाजारात कंपन्यांची रस्सीखेच चालू आहे.  एअरटेल, आयडिया आणि व्होडाफोन या प्रमुख कंपन्यांनी रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी खास ऑफर बाजारात आणत आहेत. दरम्यान, आताच एअरटेलने 59 रुपयांचा प्रीपेड रिचार्ज प्लॅन लॉंच केला आहे. यामध्ये 500 एमबी 3जी/4जी डेटा देण्यात आला आहे. तसेच, या प्लॅनची मर्यादा सात दिवसांची आहे.  एअरटेलच्या या 59 रुपयांच्या प्लॅनमध्ये 500 एमबी 3जी/4जी डेटासोबतचं यामध्ये दर दिवसाची डेटा मर्यादा सुद्धा ठेवण्यात आली नाही. तसेच, या प्लॅनमध्ये लोकल, एसटीडी आणि रोमिंगमध्ये अनलिमिटेड कॉलिंगची ऑफर दिली आहे. हा प्लॅन कोणत्याही क्षेत्रापुरता मर्यादित नसून सर्वांसाठी उपलब्ध आहे. दरम्यान, जिओला टक्कर देण्यासाठी एअरटेलने जिओपेक्षा स्वस्त डेटा प्लॅन काही दिवसांपूर्वी केला होता. या प्लॅनमध्ये युजर्सला दररोज 3.5 जीबी इंटरनेट डेटा दिली होता. तसंच लोकल, एसटीडी आणि रोमिंगमध्ये अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा दिली आहे. या प्लॅनची मर्यादा 28 दिवसांची देण्यात आली होती. एअरटेलने लाँच केलेल्या प्लॅनमध्ये युजर्सला 98 जीबी डेटा मिळेल. या प्लॅनची किंमत 799 रूपये असून एअरटेलच्या प्रीपडे युजर्सना हा प्लॅन घेता येईल, असे होते. दुसरीकडे, नव्या वर्षाच्या सुरुवातीला रिलायन्स जिओने आपल्या यूजर्संना जबरदस्त ऑफर आणली. जिओ 399 रुपयांपेक्षा जास्तचा रिचार्ज केल्यावर 3300 रुपयांपर्यंतचा कॅशबॅक देत आहे. पण, या ऑफरचा आजचा शेवटचा दिवस आहे. जिओकडून 400 रुपयांचे माय जिओ कॅशबॅक व्हाऊचर, वॉलेटमध्ये 300 रुपये इंस्टंट कॅश व्हाऊचर आणि ई-कॉमर्स कंपनींचं 2600 रुपयांचे डिस्काऊंट व्हाऊचर मिळत आहेत. याशिवाय, 199 रुपयांच्या प्लानमध्ये ग्राहकांना दिवसाला 1.2 जीबी डेटा मिळत आहे. याची मर्यादा 28 दिवस असणार आहे. म्हणजेच ग्राहकांना दिवसाला 33.6 जीबी डेटा मिळेल. फ्री व्हॉईस कॉलबरोबरच इतर फायदेही या रिचार्जमधून ग्राहकांना मिळणार आहेत.

 

टॅग्स :AirtelएअरटेलReliance Jioरिलायन्स जिओ