शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी वेन्स यांची भेट, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
2
"जो हाल तेरे बाप का हुआ, वही तेरा होगा...!"; झिशान सिद्दीकी यांना जिवे मारण्याची धमकी 
3
पंतप्रधान मोदींनी दिलं खास गिफ्ट, खुश झाली अमेरिकन उपाध्यक्षांची मुलं! बघा VIDEO
4
"राज ठाकरे यांना झुकवून युती होऊ शकते, असे मला वाटत नाही, कारण..."; उदय सामंत स्पष्टच बोलले 
5
सरपंच संतोष देशमुख यांचे नाव देऊन शाळेत पुतळाही उभारणार; शिक्षण संस्थेचा मोठा निर्णय
6
काँग्रेसविरोधात भाजयुमोचे आंदोलन, संवेदनशील भागात तणाव
7
'यंदा कर्तव्य आहे' वाटतं? टॉस वेळी शुबमन गिलला बाउन्सर; हँडसम क्रिकेटरनं असा दिला रिप्लाय (VIDEO)
8
"राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती झाल्यास हत्तीवरून पेढे वाटणार"; ठाकरे गटाच्या नेत्याचा निर्धार
9
GT चा 'ब्लॉकबस्टर शो' जारी; घरच्या मैदानावर खेळणाऱ्या गत चॅम्पियन KKR वर पडले भारी!
10
भाजपला कधी मिळणार नवीन अध्यक्ष? RSS आणि पक्षाच्या उच्च नेतृत्वात विचारमंथन सुरू...
11
40 वर्षांचे प्रेम अन् 80 व्या वर्षी बांधली लगीनगाठ; अनोख्या लग्नाची सर्वत्र चर्चा...
12
IPL 2025 KKR vs GT : रिंकूनं घेतला जबरदस्त कॅच! शुबमन गिलचं शतक हुकलं (VIDEO)
13
"यात मनी लाँडरिंगचा गुन्हा कुठे आहे?"; सोनिया- राहुल गांधींवरील कारवाईवरुन पी. चिदम्बरम यांचा सवाल
14
पत्नीने का उचलले टोकाचे पाऊल? पाहा माजी डीजीपींच्या हत्येची Inside Story...
15
लॉकडाऊन एक फालतू निर्णय होता; व्हाईट हाऊसने कोरोनाची वेबसाईट बदलली, ट्रम्प अन् लॅब लीक...
16
टॅरिफनंतर ट्रम्प यांचा नवा आदेश, ८ मुद्द्यांची 'नॉन-टॅरिफ फ्रॉड' यादी जाहीर
17
राजस्थानचं टेन्शन वाढलं, संजू सॅमसनला दुखापत, आरसीबीविरुद्ध खेळणार नाही!
18
खरी ठरली नॅस्ट्रोडॅमसची भविष्यवाणी? काही शतकांपूर्वी व्हॅटिकन सिटी अन् पोप संदर्भात केलं होतं असं भाकीत
19
'कामाचं बोला' म्हणणाऱ्या एकनाथ शिंदेंना राजू पाटलांनी डिवचलं; पाठवली रखडलेल्या कामांची यादी
20
कौतुकास्पद! रोज फक्त १२० रुपये खर्च करुन कोट्यवधींची बचत; एक, दोन नव्हे तर घेतली ३ घरं

भारतातील पहिले 5G वायरलेस Wi-Fi लाँच, एकाचवेळी 64 डिव्हाईसवर चालणार इंटरनेट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2023 16:59 IST

देशात फायबर वाय-फायची सुविधा नाही अशा ठिकाणी इंटरनेट सेवा देण्यासाठी एअरटेलचे डिव्हाईस मदत करेल.

नवी दिल्ली : भारती एअरटेलने सोमवारी फिक्स्ड वायरलेस एक्सेस (FWA) डिव्हाईस Airtel Xstream AirFiber लाँच केले. हे भारतातील पहिले 5G वायरलेस वाय-फाय डिव्हाईस आहे. देशात फायबर वाय-फायची सुविधा नाही अशा ठिकाणी इंटरनेट सेवा देण्यासाठी एअरटेलचे डिव्हाईस मदत करेल. कंपनीने सांगितले की, डिव्हाईस हे भारतातील ग्रामीण आणि शहरी भागात कनेक्टिव्हिटी प्रदान करेल, जेथे फायबर पायाभूत सुविधा निर्माण करणे एक आव्हान आहे.

फायबरच्या मदतीने घर-ऑफिसमध्ये वाय-फायच्या माध्यमातून चांगली इंटरनेट सेवा मिळते. दरम्यान, जिथे फायबर लाइन टाकण्यात आलेली नाही, तेथे जलद इंटरनेट कनेक्टिव्हिटी मिळणे कठीण होते. एअरटेल एक्स्ट्रीम एअरफायबर उपकरणाच्या मदतीने तुम्ही जलद इंटरनेटच्या सुविधेचा लाभ घेऊ शकता. तसेच, एअरटेलच्या विशेष सेवेने फायबर आणि नॉन-फायबर क्षेत्रांमधील अंतर कमी केले आहे.

देशातील आघाडीच्या टेलिकॉम कंपनीने आज एक्स्ट्रीम एअरफायबर सादर केले आहे. सध्या ही सेवा फक्त दिल्ली आणि मुंबई या दोन शहरांसाठी सुरू करण्यात आली आहे. यानंतर कंपनी देशभरातील अधिकाधिक शहरांमध्ये एक्स्ट्रीम एअरफायबर कनेक्टिव्हिटी सुरू करेल. एअरटेलने सांगितले की, 'मेक इन इंडिया मिशन' अंतर्गत सर्व एक्स्ट्रीम एअरफायबर डिव्हाईस भारतात बनवले जातील.

काय आहे एक्स्ट्रीम एअरफायबर?एक्स्ट्रीम एअरफायबर हे इन-बिल्ट Wi-Fi 6 टेक्नॉलॉजीने सुसज्ज असलेले एक प्लग-अँड-प्ले डिव्हाईस आहे. एअरटेलचे लेटेस्ट वाय-फाय डिव्हाइस एका वेळी 64 पर्यंत डिव्हाइस कनेक्ट करू शकते आणि इंटरनेट चालवू शकते.

या ठिकाणी खरेदी करू शकताएक्स्ट्रीम एअरफायबर फक्त दिल्ली आणि मुंबईसाठी लाँच करण्यात आले आहे. तुम्ही ते दोन्ही शहरांतील निवडक एअरटेल स्टोअरमधून खरेदी करू शकता. हे डिव्हाईस खरेदी केल्यानंतर फोनमध्ये एक्स्ट्रीम एअरफायबर अॅप डाउनलोड करावे लागेल. डिव्हाईस सेटअप फक्त येथून होईल. यानंतर, ग्राहक फोनवरील QR कोड स्कॅन करून किंवा पासवर्ड टाकून वाय-फायशी कनेक्ट होऊ शकतात आणि इंटरनेटचा पुरेपूर आनंद घेऊ शकतात.

काय आहे किंमत?एक्स्ट्रीम एअरफायबर 799 रुपये प्रति महिना प्लॅनसह उपलब्ध आहे. हे तुम्हाला 100 Mbps चा इंटरनेट स्पीड देते. हा प्लॅन तुम्ही 2,500 सिक्युरिटी डिपॉझिटसह (वन-टाइन रिफंडेबल) 4,435 रुपयांत सहा महिन्यांसाठी देखील निवडू शकता. मात्र, 18 टक्के जीएसटी लागू केल्यानंतर, या प्लॅनची ​​किंमत 7,733 रुपये असणार आहे. 

टॅग्स :technologyतंत्रज्ञानAirtelएअरटेल