शहरं
Join us  
Trending Stories
1
Breaking: मोठी बातमी! शिक्षक, पदवीधर विधान परिषद निवडणूक पुढे ढकलली
2
सध्याचे चित्र बघून मोदींचा चेहरा काळा पडलाय, शाह यांची दाढी जळाली; शिंदेंवरही राऊतांचा मोठा गौप्यस्फोट
3
भीषण! इंडोनेशियामध्ये नवी आपत्ती... Cold Lava चा कहर; 52 जणांचा मृत्यू, 249 घरं उद्ध्वस्त
4
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रस्तावक होणारे ते चार लोक कोण? राम मंदिरासोबत आहे कनेक्शन!
5
सत्तेच्या हॅटट्रिकसाठी भाजपाची नजर सायलेंट वोटरवर; २०२४ निवडणुकीत करणार करिष्मा?
6
Monsoon Update : आनंदाची बातमी! वेळेआधीच दाखल होणार मान्सून; महाराष्टात कधी बरसणार?
7
'भिडू' शब्दावर जग्गूदादाचा कॉपीराईट ? अभिनेता जॅकी श्रॉफ यांची दिल्ली हायकोर्टात धाव!
8
पंतप्रधान मोदींनी वाराणसीतून तिसऱ्यांदा दाखल केला उमेदवारी अर्ज, शाह-राजनाथ यांच्यासह हे दिग्गज होते उपस्थित
9
रानू मंडलसोबत गौरव मोरेची तुलना; रंगरुपावरुन ट्रोल झाल्यानंतर म्हणाला, 'चकर मारा फिल्टरपाड्याला मग..'
10
Haldiram's वर ब्लॅकस्टोनसह 'या' दिग्गज कंपन्यांची नजर, हजारो कोटींची होणार डील
11
IPL 2024 : रिंकू सिंगचा अतिउत्साही चाहता; चेंडू अशा ठिकाणी लपवला की पोलिसही गोंधळले
12
कोरेगाव भीमा प्रकरणः गौतम नवलखा यांना जामीन, प्रक्षोभक भाषणाच्या आरोपावरून होते नजरकैदेत
13
"दिल्लीच्या 'त्या' बैठकीत मोदींनी ठाकरेंना पुन्हा एकत्र येण्याची ऑफर दिली होती"
14
...म्हणून शरद पवार आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करतील, मोदींनी पुन्हा एकदा डिवचले
15
T20 World Cup 2024 साठी बांगलादेशचा तगडा संघ; २२ वर्षीय खेळाडूला संधी!
16
सोनं -चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर! दुसऱ्या दिवशीही दर कोसळले; वाचा आजचे दर
17
Fact Check: PM मोदींच्या विजयावर शंका घेणारा नितीश कुमारांचा व्हायरल व्हिडिओ जुना; पाहा, सत्य
18
4 जूनला किती वेळ राहिलाय, थोडा धीर...; पृथ्वीराज चव्हाणांच्या अंदाजावर भुजबळांचा सल्ला
19
'तू आई होऊ शकत नाहीस'; डॉक्टरांनी रुपाली गांगुलीला दिला होता IVF चा सल्ला, पण..
20
Fact Check : हैदराबादमध्ये मोदींनी AIMIM ला पाठिंबा दिल्याच्या Video दिशाभूल करणारा; जाणून घ्या 'सत्य'

Airtel- Vodafone Idea Free OTT Plan : वर्षभर व्हॅलिडिटी, मोफत हॉटस्टार आणि अनलिमिटेड कॉलिंगचा रिचार्ज प्लॅन; जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2022 3:50 PM

Airtel and Vi Top Prepaid Plans with OTT Benefits : 499 रुपयांच्या एअरटेल प्लॅनची ​​व्हॅलिडिटी 28 दिवसांची आहे. या प्रीपेड प्लॅनमध्ये दररोज 100 एसएमएस मिळतात.

व्होडाफोन-आयडिया ( Vodafone Idea) आणि एअरटेलकडे ( Airtel) काही प्रीपेड प्लॅन आहेत, त्यामध्ये OTT सब्सक्रिप्शन मिळते. रिलायन्स जिओने (Reliance Jio) अलीकडेच OTT सबस्क्रिप्शन देणारे 1499 आणि  4199 रुपयांचे प्रीपेड प्लॅन बंद केले आहेत. म्हणजेच, आता तुम्हाला असे प्रीपेड प्लॅन हवे असतील, ज्यामध्ये OTT सुविधा देखील उपलब्ध असेल, तर तुम्हाला Airtel किंवा Vodafone Idea (Vi) यापैकी एक निवडावा लागेल. आम्ही तुम्हाला Airtel आणि Vodafone Idea च्या रिचार्ज पॅकबद्दल सांगत आहोत, जे OTT सब्सक्रिप्शन देतात.

  • Airtel Prepaid Plans

499 रुपयांच्या एअरटेल प्रीपेड प्लॅन499 रुपयांच्या एअरटेल प्लॅनची ​​व्हॅलिडिटी 28 दिवसांची आहे. या प्रीपेड प्लॅनमध्ये दररोज 100 एसएमएस मिळतात. या प्लॅनमध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि दररोज 2 जीबी इंटरनेट उपलब्ध आहे. याशिवाय, एअरटेलच्या या प्रीपेड प्लॅनमध्ये, Apollo 24|7 Circle, Wynk Music आणि Free Hello Tunes व्यतिरिक्त FASTag रिचार्ज सारख्या सुविधा उपलब्ध आहेत. 

विशेष म्हणजे एअरटेलच्या या प्लॅनमध्ये 149 रुपयांमध्ये 3 महिन्यांसाठी डिस्ने + हॉटस्टार मोबाइल सबस्क्रिप्शन मोफत मिळते. एअरटेलच्या या प्लॅनमध्ये डिस्ने + हॉटस्टार मोबाईल सबस्क्रिप्शन 1 वर्षासाठी मोफत दिले जाते. याशिवाय, Prime Video Mobile Edition चा मोफत अॅक्सेस 1 वर्षासाठी उपलब्ध आहे. Wynk Music आणि Hello Tunes ची सुविधाही मोफत उपलब्ध आहे.

  • Vi Prepaid Plans

399 रुपयांचा Vodafone-Idea (Vi) प्रीपेड प्लॅन399 रुपयांच्या Vi प्रीपेड प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉल्स आणि दररोज 2.5 GB डेटा मिळतो. या प्लॅनमध्ये 100 एसएमएस फ्री आहेत. Vi च्या या प्लॅनमध्ये Binge All-Night, Weekend Data Rollover, Vi Movies & TV आणि Data Delight ची सुविधा देखील देण्यात आली आहे. या प्लॅनची व्हॅलिडिटी 28 दिवसांची आहे. Vi देखील आपल्या ग्राहकांना Disney + Hotstar मोफत सबस्क्रिप्शन 3 महिन्यांसाठी ऑफर करते.

499 रुपयांच्या Vi प्रीपेड प्लॅन499 रुपयांच्या Vi प्रीपेड प्लॅनमध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉल ऑफर केले जातात. या प्लॅनची व्हॅलिडिटी 28 दिवसांची आहे. व्होडाफोनआयडियाच्या या प्रीपेड प्लॅनमध्ये दररोज 2 जीबी डेटा उपलब्ध आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज 100 एसएमएस मोफत मिळतात. याशिवाय व्होडाफोनच्या या प्लॅनमध्ये Binge all-night, Weekend Data Rollover, Vi Movies and TV आणि Data Delight सारखे फायदे देखील दिले जातात. तसेच, व्होडाफोनचा हा प्रीपेड पॅक रिचार्ज करणार्‍या ग्राहकांना डिस्ने + हॉटस्टार मोबाईलवर 1 वर्षासाठी मोफत अॅक्सेस मिळेल.

1066 रुपयांचा Vi प्रीपेड प्लॅन1066 रुपयांच्या Vi प्रीपेड प्लॅनमध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉल मोफत मिळणार आहे. या प्लॅनमध्ये दररोज 2 जीबी डेटा दिला जातो. या प्लॅनची व्हॅलिडिटी 84 दिवसांची आहे. व्होडाफोन आयडियाच्या या प्लॅनमध्ये सुद्धा 499 रुपये आणि 399 रुपयांच्या प्लॅनमधील सर्व सुविधा मिळतात. दैनंदिन डेटा मर्यादा संपल्यानंतर वेग 64Kbps पर्यंत कमी होतो.

टॅग्स :MobileमोबाइलVodafoneव्होडाफोनVodafone Ideaव्होडाफोन आयडिया (व्ही)Ideaआयडियाtechnologyतंत्रज्ञानAirtelएअरटेल