शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

Infosys अन् L&T नंतर आता Google चा आपल्या कर्मचाऱ्यांना 60 तास काम करण्याचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2025 15:05 IST

गेल्या काही काळापासून अनेक कंपन्यांच्या प्रमुखांनी जास्त तास काम करण्याबाबत वक्तव्ये केली आहेत.

गेल्या काही काळापासून जगभरात आर्टिफिशियल इंटेलिजन्स (Ai) तंत्रज्ञानाची वेगाने वाढ होत आहे. जवळपास प्रत्येक क्षेत्रात कमी-अधिक प्रमाणात या Ai तंत्रज्ञानाचा वापर केला जातोय. या Ai च्या स्पर्धेत पुढे राहण्यासाठी प्रत्येक टेक कंपन्या काम करत आहे. Goole देखील या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी वेगाने वाटचाल करत आहे. अशातच, कंपनीचे सह-संस्थापक सेर्गे ब्रिन यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना आठवड्यातून 60 तास काम करण्याचा आणि दररोज कार्यालयात येण्याचा सल्ला दिला आहे. 

काही दिवसांपूर्वीच इन्फोसिसचे सह-संस्थापक नारायण मूर्ती यांनी दर आठवड्याला 70 तासांपेक्षा जास्त काम केले पाहिजे, असे वक्तव्य केले होते. तर, एलअँडटीचे अध्यक्ष एसएन सुब्रमण्यन यांनी तर 90 तास काम करण्याचा सल्ला दिला होता. सोशल मीडियावर या मुद्द्यावरुन जोरदार चर्चा झाली. काहींनी त्यांच्यावर टीका केली, तर काहींना त्यांचे समर्थन केले. दरम्यान, आता टेक जायंट Goolge नेदेखील आपल्या कर्मचाऱ्यांना 60 तास काम करण्याचा सल्ला दिला आहे.

रोज ऑफिसला येण्याचा सल्लागुगलचे सह-संस्थापक सेर्गे ब्रिन यांनी एका अंतर्गत मेमोमध्ये सांगितले की, Google Ai शर्यत जिंकू शकते. मात्र यासाठी कर्मचाऱ्यांना पूर्वीपेक्षा जास्त मेहनत करावी लागणार आहे. ब्रिनने आपल्या कर्मचाऱ्यांना दररोज ऑफिसमध्ये येऊन काम करण्याचा सल्ला दिला. तसेच, कर्मचाऱ्यांनी 60 तास काम केले तर बरे होईल, असे म्हटले. काही कर्मचारी कमी काम करत आहेत, ज्यामुळे उर्वरित टीमच्या मनोबलावर परिणाम होऊ शकतो. टीम अथवा कंपनीसाठी हे योग्य नाही, असेही ते म्हणाले. 

Ai च्या शर्यतीत पुढे राहण्याचा प्रयत्नगुगलची एआय डेव्हलपमेंट टीम Gemini Ai वर काम करत आहे. ब्रिनच्या म्हणण्यानुसार, जर कर्मचाऱ्यांनी त्यांच्या बाजूने अधिक प्रयत्न केले, तर Google Ai जगात आघाडीवर राहू शकते. एआयची अंतिम शर्यत सुरू झाली आहे, ही जिंकण्यासाठी Google सर्वतोपरी प्रयत्न करेल. दरम्यान, ब्रिनच्या सल्ल्यावरुन एक गोष्ट स्पष्ट होते की, आता टेक कंपन्या हायब्रीड वर्क पॉलिसीपासून मागे हटत आहेत. ते त्यांच्या कर्मचाऱ्यांना पूर्णवेळ कार्यालयात आणण्याचा प्रयत्न करत आहेत. याआधी अनेक कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांचे कामाचे तास वाढवण्याचे धोरण स्वीकारले आहे.

टॅग्स :googleगुगलInfosysइन्फोसिसtechnologyतंत्रज्ञानArtificial Intelligenceआर्टिफिशिअल इंटेलिजन्स