शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
2
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
3
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
4
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
5
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
6
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
7
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
9
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
10
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
11
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
12
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
13
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
14
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
15
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
16
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
17
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
18
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
19
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
20
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर

पब्जीसह २७५ चिनी अ‍ॅप्सवर बंदी? सरकार चीनला पुन्हा दणका देण्याच्या तयारीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2020 14:28 IST

भारत सरकार आता अ‍ॅप्ससाठी नियम व कायदे तयार करीत आहे, यामुळे बंदी घालण्यासंदर्भात विचार केला जाऊ शकतो.

ठळक मुद्देगेल्या काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने सर्वात लोकप्रिय टिकटॉकसह ५९ चिनी अ‍ॅप्सवर बंदी घातली आहे.

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपूर्वी भारताने चिनी अ‍ॅप्सवर बंदी घातली आहे. तसेच, आता सरकारने पुन्हा  आणखी २७५ चिनी अ‍ॅप्सची यादी तयार केली आहे. यामध्ये गेमिंग अ‍ॅप पब्जी देखील आहे. एका अंदाजानुसार, भारतातचीनी इंटरनेट कंपन्यांचे सुमारे ३०० कोटी युनिक युजर्स आहेत. हे अ‍ॅप्स कोणत्याही प्रकारे राष्ट्रीय सुरक्षेसाठी किंवा लोकांच्या गोपनीयतेसाठी धोकादायक आहेत का? याबाबत सरकार एक यादी तयार करून, हे तपासत आहे. 

यामध्ये जर काही अनियमितता आढळल्यास चीनच्या बंदी अ‍ॅप्सची यादी आणखी लांब होण्याची शक्यता आहे. चीन आणि भारत यांच्यातील लडाख सीमेवरील तणावामुळे हे सर्व घडत आहे. सीमेवरील तणावामुळे दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये संघर्ष झाला होता. यामध्ये भारताचे २० सैनिक शहीद झाले होते. तेव्हापासून चीनबद्दल भारतातील लोकांमध्ये संताप आहे.

सरकारने तयार केलेल्या नवीन यादीमध्ये टेंसेंट कंपनीच्या लोकप्रिय गेम पब्जीचा समावेश आहे. या व्यतिरिक्त, शाओमीची जिली, ई-कॉमर्स दिग्गज अलिबाबाची अलीएक्सप्रेस आणि टिकटॉकच्या मालकीची कंपनी बाईटडन्सचा रेसो आणि यूलाइक्स अ‍ॅप्सचा समावेश आहे. या डेव्हलपमेंटमधील संबंधित व्यक्तीने सांगितले की, सरकार या सर्व २७५ अ‍ॅप्स किंवा त्यामधील काही अ‍ॅप्सवर बंदी घालू शकते. मात्र, कोणतीही अनियमितता आढळली नाही, तर अ‍ॅप्सवर बंदी घातली जाणार नाही.

गृह मंत्रालयाने अद्याप यावर प्रतिक्रिया दिली नाही. मात्र, संबंधित एका अधिकृत सुत्रांनी सांगितले की, चीनच्या अ‍ॅप्सचा सतत आढावा घेण्यात येत आहे आणि त्यांना कोठून अर्थसहाय्य मिळत आहे याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, काही अ‍ॅप्स राष्ट्रीय सुरक्षतेसाठी धोकादायक असल्याचे दिसून आले. तर काही अ‍ॅप्स डेटा वाटप आणि गोपनीयता नियमांचे उल्लंघन करीत आहेत.

भारत सरकार आता अ‍ॅप्ससाठी नियम व कायदे तयार करीत आहे, यामुळे बंदी घालण्यासंदर्भात विचार केला जाऊ शकतो. एका वरिष्ठ अधिकाऱ्यांने सांगितले की, सायबर सुरक्षा अधिक बळकट करणे आणि भारतीय नागरिकांच्या डेटाला सुरक्षा पुरवणे ही सरकारची एक मोठी योजना आहे. या नियमांमध्ये आणि मार्गदर्शकतत्त्वांमध्ये अ‍ॅपला काहीही करण्याची परवानगी नाही.

माध्यमांच्या वृत्तानुसार, भारताने टिकटॉकवर बंदी घातल्यानंतर फेसबुकचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकरबर्ग यांची चिंता वाढली आहे. जर भारत सरकार २० कोटी युजर्स असलेल्या टिकटॉकवर मोठे कारण नसताना बंदी घालू शकते, तर फेसबुकवरही भारतात बंदी घातली जाऊ शकते, असे मार्क झुकरबर्ग यांनी आपल्या फेसबुकच्या कर्मचाऱ्यांसोबत चिंता व्यक्त केली आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने सर्वात लोकप्रिय टिकटॉकसह ५९ चिनी अ‍ॅप्सवर बंदी घातली आहे. यामध्ये यूसीवेब, हॅलो, शेअराईट आणि वीचॅटसारखे अ‍ॅप्स आहेत. याशिवाय लाइकी, कवई, व्हीटोजा सारख्या शॉर्ट व्हिडिओ मेकिंग अ‍ॅप्सवरही बंदी घातली आहे. 

आणखी बातम्या...

"हा दिवस म्हणजे, भविष्याची रूपरेषा निश्चित करण्याची संधी", वाढदिवसानिमित्त नरेंद्र मोदींचे उद्धव ठाकरेंना पत्र

'लालू-कवच' असताना सुशीलकुमार मोदींनी कोरोनाला घाबरू नये - राबडी देवी    

आपले प्रेरणादायी शब्द उज्वल भविष्यासाठी मार्गदर्शक ठरतील, उद्धव ठाकरेंनी मानले नरेंद्र मोदींचे आभार    

'ये दोस्ती... हम नही तोडेंगे...', संजय राऊतांकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा!    

'हत्ती' vs. 'हात'; सरकारच्या विरोधात मतदान करा; बसपाच्या व्हिपने वाढवली काँग्रेसची डोकेदुखी    

टॅग्स :Chinese Appsचिनी ऍपIndiaभारतchinaचीनindia china faceoffभारत-चीन तणावtechnologyतंत्रज्ञान